Samsung Galaxy Fold 2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Aug 2020 11:03:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 अनोख्या डिजाइन सह लॉन्च झाला Samsung Galaxy Z Fold 2 5G, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-fold-2-launched-with-4-camera-2-screen-and-5g-support-know-price-and-full-specification-sale-date/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-fold-2-launched-with-4-camera-2-screen-and-5g-support-know-price-and-full-specification-sale-date/#respond Thu, 06 Aug 2020 11:03:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7750 Samsung Galaxy Z Fold 2 5G स्मार्टफोन दोन स्क्रीन आणि स्लिम बेजल्स सह सादर केला गेला आहे

The post अनोख्या डिजाइन सह लॉन्च झाला Samsung Galaxy Z Fold 2 5G, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने काल आपल्या दुसऱ्या Galaxy Unpacked इवेंट मध्ये गॅलेक्स नोट 20 सीरीज सोबत Galaxy Z Fold 2 5G पण सादर केला आहे. आहे. याआधी वर्षाच्या सुरवातीला कंपनीने Galaxy Unpacked Event 2020 मध्ये Galaxy S20 सीरीज आणि Z Flip फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला होता. Samsung Galaxy Z Fold 2 5G फोनचा आउटर डिस्प्ले मागच्या मॉडेलच्या तुलनेत खूप मोठा आहे. चला जाणून घेऊया या फोनच्या डिजाइन, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती.

डिजाइन

Samsung Galaxy Z Fold 2 5G स्मार्टफोन दोन स्क्रीन आणि स्लिम बेजल्स सह सादर केला गेला आहे, यावेळी फोनची फ्रंट स्क्रीन जास्त मोठी वाटते. फोन मध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी आतील उजव्या स्क्रीन वर सेंट्रल होल-पंच कटआउट देण्यात आला आहे. फर्स्ट जनरेशन Galaxy Fold स्मार्टफोन मध्ये यापेक्षा छोटा कवर डिस्प्ले होता, ज्यात खूप मोहटे बेजल्स होते. या फोन मध्ये बॉटम आणि टॉप दोन्ही बाजूंना स्पीकर ग्रिल मिळेल. तसेच डिवाइसच्या बॉटमला टाइप सी चार्जिंग पोर्ट आहे. इतकेच नव्हे तर फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, जो फ्लॅश सह कॅमेरा मॉड्यूल मध्ये आहेत.

स्पेसिफिकेशन्स

सॅंमसंगच्या घडी करता येणाऱ्या फोन गॅलेक्सी फोल्ड 2 मध्ये 7.6-इंचाचा मोठा इनफिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120Hz रिफ्रेश रेट सह येतो. हा आतील डिस्प्लेचा आकार आहे. बाहेरच्या बाजूला तरफ कंपनीने 6.2-इंचाचा AMOLED इनफिनिटी-ओ डिस्प्ले दिला आहे. याचा अर्थ असा कि फोनच्या आत आणि बाहेर दोन्ही बाजूंना पंच होल कटआउट मिळेल.

कंपनीने या फोनच्या कॅमेरा डिटेल, प्रोसेसर आणि रॅम व स्टोरेज बाबत कोणतीही माहिती दिली नाही. पण फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. कंपनीचा नवीन फोल्डेबल फोन Mystic Black आणि Mystic Bronze कलर ऑप्शन मध्ये येतो . कंपनीनुसार ते फॅशन हाउसच्या मदतीने एक लिमिटेड गॅलेक्सी झेड फोल्ड 2 थॉम ब्राउन वर्जन पण सादर करणार आहेत. सॅमसंगने अजूनतरी गॅलेक्सी झेड फोल्ड 2 ची किंमत आणि उपलब्धतेची घोषणा केली नाही, पण कंपनी सप्टेंबर मध्ये पुढील माहिती देणार आहे.

याव्यतिरिक्त कंपनीने आज झालेल्या इवेंट मध्ये Samsung Galaxy Note 20, Galaxy Note 20 Ultra, Samsung Galaxy Tab S7+, Galaxy Tab S7, Samsung Galaxy Buds आणि Samsung Galaxy Watch 3 सादर केला आहे. गॅलेक्सी नोट 20 सीरीज कंपनीने 5G वर्जन सह LTE वर्जन माडेच पण सादर केली आहे.

The post अनोख्या डिजाइन सह लॉन्च झाला Samsung Galaxy Z Fold 2 5G, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-fold-2-launched-with-4-camera-2-screen-and-5g-support-know-price-and-full-specification-sale-date/feed/ 0