Samsung Galaxy J4 (2018) - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 27 Aug 2018 12:09:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सणासुदीच्या काळात सॅमसंग-वीवो ची भेट, या स्मार्टफोन्स च्या किंमती केल्या कमी https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-vivo-v9-vivo-y83-samsung-galaxy-j4-price-drop-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-vivo-v9-vivo-y83-samsung-galaxy-j4-price-drop-india-in-marathi/#respond Mon, 27 Aug 2018 12:08:16 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1825 या प्राइस कट च्या लिस्ट मध्ये कंपनी ने हाईएंड डिवाईस पासून स्वस्त लो बजेट वाल्या स्मार्टफोन चा समावेश केला आहे.

The post सणासुदीच्या काळात सॅमसंग-वीवो ची भेट, या स्मार्टफोन्स च्या किंमती केल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशात सणासुदीचे दिवस सुरू आहेत. हे दिवस लोकांसाठी अजून खास बनवण्यासाठी मोबाईल कंपन्या पण काही ना काही ऑफर्स घेऊन येत असतात. या फेस्टिवल सीजन च्या सुरवातीला दोन मोठे ब्रँड सॅमसंग आणि वीवो ने आपल्या खास स्मार्टफोन्स च्या किंमती कमी करून आपल्या फॅन्सना भेट दिली आहे. या प्राइस कट च्या लिस्ट मध्ये कंपनी ने हाईएंड डिवाईस पासून स्वस्त लो बजेट वाल्या स्मार्टफोन चा समावेश केला आहे. जर तुम्ही पण वीवो किंवा सॅमसंग चा नवीन फोन घेण्याचा प्लान करत असाल तर कंपनी ने स्वस्त केलेल्या स्मार्टफोन्सची खालील यादी तुमच्या कमी येईल.

वीवो
वीवो ने आपल्या हाईएंड डिवाईस एक्स21 ची किंमत 4,000 रुपयांनी कमी केली आहे. कंपनी ने मे महिन्यात हा स्मार्टफोन भारतात 35,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. विशेष म्हणजे वीवो एक्स21 जगातील पहिला फोन आहे ज्यात ​स्क्रीन खाली फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फोन मध्ये 6.28-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 6जीबी रॅम आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. किंमत कमी झाल्यानंतर हा फोन 31,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

तसेच वीवो इंडिया ने देशात लॉन्च केलेल्या पहिल्या नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन वीवो वी9 ची किंमत 2,000 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर आता पर्यंत 20,990 रुपयांमध्ये मिळणार शानदार फोन 18,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचबरोबर कंपनी च्या सर्वात स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन्स पैकी एक वीवो वाय83 ची किंमत पण 1,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. 14,990 रुपयांमध्ये लॉन्च झालेला हा फोन आता 13,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सॅमसंग
आपल्या फॅन्सना भेट देत सॅमसंग इंडिया ने कंपनी द्वारा लो बजेट मध्ये लॉन्च केलेल्या गॅलेक्सी जे4 ची किंमत कमी केली आहे. सॅमसंग चा हा 4जी फोन 2जीबी रॅम आणि 3,000एमएएच ची बॅटरी सह बाजारात आला होता. कंपनी ने या फोनची किंमत 9,999 रुपये ठेवली होती पण आता सॅमसंग ने या फोन ची किंमत पण 1,000 रुपयानी कमी केली आहे. म्हणजे 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला गॅलेक्सी जे4 आता फक्त 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post सणासुदीच्या काळात सॅमसंग-वीवो ची भेट, या स्मार्टफोन्स च्या किंमती केल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-vivo-v9-vivo-y83-samsung-galaxy-j4-price-drop-india-in-marathi/feed/ 0
सॅमसंग पुन्हा देईल शाओमी ला टक्कर, 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला सॅमसंग गॅलेक्सी जे4 स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-launched-price-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-launched-price-feature-specifications-in-marathi/#respond Thu, 31 May 2018 14:05:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=723 रिपोर्ट नुसार गॅलेक्सी जे4 चा हा नवीन वर्जन 9,999 रुपयांमध्ये आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून विकत घेता येईल.

The post सॅमसंग पुन्हा देईल शाओमी ला टक्कर, 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला सॅमसंग गॅलेक्सी जे4 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्स ने कालच एक एक्सक्लूसीव बातमी दिली होती की सॅमसंग लवकरच भारतीय बाजारात आपल्या गॅलेक्सी सीरीज चा स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी जे4 लॉन्च करू शकते. त्या नुसार कंपनी ने हा स्मार्टफोन रिटेल स्टोर्स वर उपलब्ध केला आहे. महेश टेलीकॉम च्या ट्वीटर हँडल वरून मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी जे4 भारतीय आॅफलाईन बाजारात सादर करण्यात आला आहे. भारतात हा फोन 9,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 1280 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.5-इंचाच्या एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित आहे तसेच 1.4गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह एक्सनॉस 7570 ​चिपसेट वर चालतो. ग्राफिक्स साठी या फोन मध्ये माली-टी720 जीपीयू आहे.

कंपनी ने हा फोन को 2जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केला आहे. या फोन मध्ये 16जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे जो एलईडी फ्लॅश सह येतो.

सॅमसंग गॅलेक्सी जे4 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. रिपोर्ट नुसार गॅलेक्सी जे4 चा हा नवीन वर्जन 9,999 रुपयांमध्ये आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून विकत घेता येईल.

The post सॅमसंग पुन्हा देईल शाओमी ला टक्कर, 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला सॅमसंग गॅलेक्सी जे4 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-launched-price-feature-specifications-in-marathi/feed/ 0