Samsung Galaxy J6 (2018) - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 18 May 2018 16:50:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंग गॅलेक्सी जे6 इनफिनिटी डिस्प्ले सह भारतात होत आहे लॉन्च, 22 मे पासून होईल सेल, रिटेल स्टोर्स वर होईल उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-launching-on-21-may-with-infinity-display-sale-start-by-22-may-on-offline-retail-stores-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-launching-on-21-may-with-infinity-display-sale-start-by-22-may-on-offline-retail-stores-in-india-in-marathi/#respond Fri, 18 May 2018 16:50:12 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=547 सॅमसंग ने ट्वीट मध्ये गॅलेक्सी जे6 चा वीडियो शेयर केला आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी जे6 इनफिनिटी डिस्प्ले सह भारतात होत आहे लॉन्च, 22 मे पासून होईल सेल, रिटेल स्टोर्स वर होईल उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने काही दिवसांपूर्वी ही घोषणा केली आहे की कंपनी येणार्‍या 21 मे ला भारतात नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. सॅमसंग ने मीडिया इन्वाईट पण पाठवले आहेत ज्यात सांगण्यात आले आहे की कंपनी चे आगामी स्मार्टफोन इनफिनिटी डिस्प्ले सह येतील. सॅमसंग ने लॉन्च होणार्‍या स्मार्टफोन्स ची नावे सांगितली नाहीत पण कंपनी चा एक आगामी स्मार्टफोन गॅलेक्सी जे6 रिटेल स्टोर्स दिसला आहे. बाजारात होर्डिंग लावून तसेच सॅमसंग इंडिया ने पण आपल्या आॅफिशियल ट्वीटर हँडल वरून या फोन ची माहिती दिली आहे.

सॅमसंग ने ट्वीट मध्ये गॅलेक्सी जे6 चा वीडियो शेयर केला आहे. तसेच राजधानी मध्ये रिटेल स्टोर्स च्या बाहेर या फोन चे होर्डिंग पण लागले आहेत. हे स्पष्ट झाले आहे की सॅमसंग गॅलेक्सी जे6 येणार्‍या 21 मे भारतात लॉन्च केला जाईल तसेच 22 मे पासून आॅफलाईन प्लॅटफार्म वर सेल साठी उपलब्ध होईल. कंपनी ने गॅलेक्सी जे6 च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती दिली नाही पण फोटो वरून समजले आहे की हा फोन बेजल लेस इनफिनिटी डिस्प्ले वर लॉन्च होईल. फोन बद्दल आलेले लीक्स पाहता यात 5.6-इंचाचा एचडी+ एमोलेड डिस्प्ले मिळेल जो 1480 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल.

सॅमसंग गॅलेक्सी जे6 बद्दल बोलले जात आहे की कंपनी हा फोन 2जीबी, 3जीबी तसेच 4जीबी च्या तीन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च करू शकते तसेच हा फोन आॅक्टा-कोर प्रोसेसर सह एक्सनॉस 7870 चिपसेट वर चालेल. त्याचबरोबर फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा तर 8-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी जे6 मध्ये बाईक मोड, अल्ट्रा डाटा सेविंग मोड व सॅमसंग मॉल ​मिळू शकतात.

सॅमसंग या फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देऊ शकते. विशेष म्हणजे सॅमसंग कडून हा 21 मे ला लॉन्च केला जात आहे त्यादिवशी कंपनी एका पेक्षा जास्त डिवाईस सादर करू शकते. त्यामुळे असे वाटते की गॅलेक्सी जे6 सोबत कंपनी गॅलेक्सी ए सीरीज मध्ये पण नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल जो इनफिनिटी डिस्प्ले सह येईल. पण गॅलेक्सी जे6 ची किंमत आणि ठोस स्पेसिफिकेशन्स साठी पण 21 मे ला फोन लॉन्च ची वाट बघितली जात आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी जे6 इनफिनिटी डिस्प्ले सह भारतात होत आहे लॉन्च, 22 मे पासून होईल सेल, रिटेल स्टोर्स वर होईल उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-launching-on-21-may-with-infinity-display-sale-start-by-22-may-on-offline-retail-stores-in-india-in-marathi/feed/ 0