Samsung Galaxy J7 pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 06 Jun 2018 09:26:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 2,000 रुपयांनी स्वस्त झाला सॅमसंग चा दमदार स्मार्टफोन गॅलेक्सी जे7 प्रो https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j7-pro-price-cut-by-rs-2000-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j7-pro-price-cut-by-rs-2000-in-marathi/#respond Wed, 06 Jun 2018 09:26:02 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=789 गॅलेक्सी जे7 प्रो ची सर्वात मोठी खासियत फोन मधील सॅमसंग पे इंटिग्रेशन आहे.

The post 2,000 रुपयांनी स्वस्त झाला सॅमसंग चा दमदार स्मार्टफोन गॅलेक्सी जे7 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने यावर्षी मार्च मध्ये आपल्या बेस्ट स्मार्टफोंस पैकी ए​​क गॅलेक्सी जे7 प्रो च्या किंमतीत 2,000 रूपयांची कपात केली होती. या कपातीनंतर सॅमसंग चा हा स्मार्टफोन 18,900 रुपयांना सेल साठी उपलब्ध होता. आता आपल्या फॅन्सना अजून एक भेट देत सॅमसंग ने या फोन ची किंमत पुन्हा एकदा 2,000 रुपयांनी कमी केली आहे. या कपातीनंतर सॅमसंग चा हा स्मार्टफोन 16,900 रुपयांच्या किंमतीत विकत घेता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी जे7 प्रो मध्ये झालेल्या या प्राइस कट नंतर शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर हा स्मार्टफोन 16,900 रुपयांमध्ये सेल साठी लिस्ट झाला आहे तर दुसर्‍या ईकॉमर्स साइट अमेजॉन इंडिया वर हा फोन 16,990 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही बातमी लिही पर्यंत सॅमसंग च्या आॅफिशियल वेबसाइट वर नवीन किंमत अपडेट झाली नाही आणि तिथे गॅलेक्सी जे7 प्रो ची किंमत 18,900 रुपये दिसत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे7 प्रो पाहता कंपनी ने हा फोन 5.5-इंचाच्या फुलएचडी एमोलेड डिस्प्ले सह सादर केला आहे. हा फोन एंडरॉयड नुगट आधारित आहे तर 1.6गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर एक्सनोस 7870चिपसेट वर चालतो. सॅमसंग चा हा फोन 3जीबी रॅम सह बाजारात आणला गेला आहे. फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते.

सॅमसंग गॅलेक्सी जे7 प्रो मध्ये फोटोग्राफी साठी फोन च्या बॅक आणि फ्रंट दोन्ही पॅनल वर फ्लॅश सह 13-मेगापिक्सल चे कॅमेरा देण्यात आले आहेत. हा फोन गोल्ड आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल. गॅलेक्सी जे7 प्रो ची सर्वात मोठी खासियत फोन मधील सॅमसंग पे इंटिग्रेशन आहे.

The post 2,000 रुपयांनी स्वस्त झाला सॅमसंग चा दमदार स्मार्टफोन गॅलेक्सी जे7 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j7-pro-price-cut-by-rs-2000-in-marathi/feed/ 0