Samsung Galaxy M Prime - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 07 Oct 2020 13:45:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6000mAh बॅटरी असलेला Samsung Galaxy M31 Prime एडिशन लवकरच करेल भारतात एंट्री, चिनी ब्रँड्सची होईल का सुट्टी? https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m-prime-launch-soon-with-6000mah-battery-64mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m-prime-launch-soon-with-6000mah-battery-64mp-camera/#respond Wed, 07 Oct 2020 13:45:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8425 Samsung Galaxy M Prime मध्ये 6,000mAh ची बॅटरी 15W फास्ट चार्जिंग सह मिळेल.

The post 6000mAh बॅटरी असलेला Samsung Galaxy M31 Prime एडिशन लवकरच करेल भारतात एंट्री, चिनी ब्रँड्सची होईल का सुट्टी? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन स्मार्टफोन निर्माता कंपनी Samsung ने काही दिवसांपूर्वी भारतात आपली M-सीरीज वाढवत 7000एमएएच बॅटरी असलेला Galaxy M51 लॉन्च केला होता. आता समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी भारतात एम-सीरीज मध्ये अजून नवीन फोन जोडणार आहे, ज्याचे नाव Samsung Galaxy M Prime असेल. अमेझॉन इंडिया वर समोर आलेल्या लिस्टिंग मध्ये गॅलेक्सी एम प्राइमच्या स्पेसिफिकेशन्स आणि लुकची माहिती मिळाली आहे. लॉन्च डेट बद्दल मात्र माहिती मिळाली नाही.

Amazon India वर हा नवीन स्मार्टफोन ‘coming soon’ टॅग सह लिस्ट आहे आणि कदाचित 17 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या Amazon Great Indian Festival विक्री मध्ये हा फोन सादर केला जाईल. तसेच Samsung Galaxy M प्राइमच्या चिपसेट, कॅमेरा आणि बॅटरीची माहिती समोर आली आहे. स्पेसिफिकेशन्स बघून वाटत आहे कि हा एक मिड-रेंज स्मार्टफोन असेल जो कि काही प्रमाणात Samsung Galaxy M31 सारखा वाटत आहे.

Galaxy M Prime च्या किंमतीचा खुलासा अमेझॉन सेल मध्ये होईल. लिस्टिंगनुसार Samsung Galaxy M Prime मध्ये Infinity-U डिस्प्ले असेल. डिस्प्लेसाठी AMOLED आणि LCD पॅनलचा वापर केला जाईल किंवा नाही हे अजून स्पष्ट झाले नाही. रियर पॅनल वर रेक्टेंगुलर क्वाड कॅमेरा सेटअप आणि फिंगरप्रिंट सेंसर असेल. फोनची संपूर्ण डिजाइन Samsung Galaxy M31 सारखी असेल.

Samsung Galaxy M Prime रियर कॅमेरा पाहता यात 64MP प्राइमरी कॅमेरा सेंसर, 8MP वाइड-अँगल लेंस, 5MP मॅक्रो आणि 5MP डेप्थ सेंसर असेल. तसेज फ्रंटला 32MP फ्रंट-फेसिंग सेंसर असेल, त्यात स्लो-मोशन, 4K वीडियो रेकॉर्डिंग AR Doodle आणि इत्यादी फीचर्स असतील.

तसेच Samsung Galaxy M Prime मध्ये 6,000mAh ची बॅटरी 15W फास्ट चार्जिंग सह मिळेल. फोन मध्ये 2.3GHz Exynos 9611 चिपसेट असेल. Samsung 8 ऑक्टोबरला आपला नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी एफ41 भारतात लॉन्च करेल. संध्याकाळी 5.30 वाजता होणाऱ्या एका इवेंट मध्ये Samsung Galaxy F41 सादर केला जाईल. कंपनीने आतापर्यंत डिवाइसच्या डिस्प्ले, कॅमेरा आणि बॅटरी संबंधित माहिती सांगितली आहे. या सीरीजचा पहिला फोन Galaxy F41 असेल. ऑफिशल टीजर्स पाहता नवीन फोन दिसायला कंपनीच्या M सीरीजच्या फोन्स सारखा दिसत आहे. आगामी गॅलेक्सी एफ41 मध्ये मागे एक फिंगरप्रिंट सेंसर आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम51 वीडियो

The post 6000mAh बॅटरी असलेला Samsung Galaxy M31 Prime एडिशन लवकरच करेल भारतात एंट्री, चिनी ब्रँड्सची होईल का सुट्टी? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m-prime-launch-soon-with-6000mah-battery-64mp-camera/feed/ 0