Samsung Galaxy M14 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 18 Apr 2023 04:14:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 13 हजारांच्या रेंजमध्ये Samsung Galaxy M14 5G लाँच; यात आहे 50MP Camera आणि 6,000mAh बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m14-5g-price-in-india-and-specifications-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m14-5g-price-in-india-and-specifications-details-in-marathi/#respond Tue, 18 Apr 2023 04:14:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20303 सॅमसंगनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन 5जी फोन सादर केला आहे. कंपनीनं Samsung Galaxy M14 5G भारतात लाँच केला आहे ज्याची किंमत फक्त 13,490 रुपयांपासून सुरु होते. पुढे तुम्ही या स्वस्त सॅमसंग फोनची किंमत व सेल सोबतच याच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचू शकता. सॅमसंग गॅलेक्सी एम14 5जीची किंमत Samsung Galaxy M14 […]

The post 13 हजारांच्या रेंजमध्ये Samsung Galaxy M14 5G लाँच; यात आहे 50MP Camera आणि 6,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy M14 5G फोनमध्ये 13 5G Bands चा सपोर्ट देण्यात आला आहे.
  • हा फोन 2 वर्षांच्या अँड्रॉइड आणि 4 वर्षांच्या सिक्योरिटी अपडेट ह येतो.
  • या सॅमसंग मोबाइलमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंगनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन 5जी फोन सादर केला आहे. कंपनीनं Samsung Galaxy M14 5G भारतात लाँच केला आहे ज्याची किंमत फक्त 13,490 रुपयांपासून सुरु होते. पुढे तुम्ही या स्वस्त सॅमसंग फोनची किंमत व सेल सोबतच याच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचू शकता.

सॅमसंग गॅलेक्सी एम14 5जीची किंमत

Samsung Galaxy M14 5G फोन दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे ज्यात 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅम देण्यात आला आहे. दोन्ही मॉडेल 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतात. किंमत पाहता फोनच्या 4जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 13,490 रुपये आहे तर 6जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 14,490 रुपये आहे. या सॅमसंग फोनची विक्री 21 एप्रिलपासून सुरु होईल जो अ‍ॅमेझॉन इंडिया व रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल. हा फोन Berry Blue, Smoky Teal आणि Icy Silver कलरमध्ये उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम14 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ FHD+ Display
  • 90Hz refresh rate

Samsung Galaxy M14 5G फोन 6.6 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे जो फुलएचडी+ रिजोल्यूशनवर चालतो. ही स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाईलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 नं प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

  • Samsung Exynos 1330
  • Android 13

सॅमसंग गॅलेक्सी एम14 5जी फोन अँड्रॉइड ओएसवर लाँच झाला आहे जो वनयुआयसह चालतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 1330 ऑक्टा-प्रोसेसर देण्यात आला आहे जो 5नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे. तसेच हा चिपसेट 13 5जी बँड्सला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन 2 वर्षांच्या ओएस अपडेट आणि 4 वर्षांच्या सिक्योरिटी अपडेटसह सादर करण्यात आला आहे.

  • 50MP Rear Camera
  • 13MP Selfie Camera

Samsung Galaxy M14 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्ससह चालतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

  • 25W Fast Charging
  • 6,000mAH Battery

पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy M14 5G फोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी सॅमसंगनं 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली आहे. सॅमसंगचा दावा आहे की एकदा फुल चार्ज केल्यावर हा फोन 58 तास टॉकटाइम किंवा 27 तास इंटरनेट सर्फिंग किंवा 25 तास व्हिडीओ प्लेबॅक टाइम देऊ शकतो.

The post 13 हजारांच्या रेंजमध्ये Samsung Galaxy M14 5G लाँच; यात आहे 50MP Camera आणि 6,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m14-5g-price-in-india-and-specifications-details-in-marathi/feed/ 0
17 एप्रिलला येतोय Samsung Galaxy M14 5G भारतात; मिळेल 50MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m14-5g-will-launch-in-india-on-17-april/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m14-5g-will-launch-in-india-on-17-april/#respond Fri, 14 Apr 2023 03:58:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20270 सॅमसंग भारतात आपला आणखी एक 5जी फोन घेऊन येत आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की येत्या 17 एप्रिलला नवीन Samsung Galaxy M14 5G फोन भारतात लाँच केला जाईल. गॅलेक्सी ‘एम’ सीरीजमधील या स्वस्त मोबाइलचे अनेक स्पेसिफिकेशन्स अधिकृतपणे शेयर करण्यात आले आहेत. त्यानुसार या फोनमध्ये 50MP चा कॅमेरा आणि 6000mAh ची मोठी बॅटरी मिळणार आहे. इतर […]

The post 17 एप्रिलला येतोय Samsung Galaxy M14 5G भारतात; मिळेल 50MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy M14 5G ची किंमत 13 हजारांच्या आसपास असेल.
  • हा सॅमसंग मोबाइल 13 5G Bands ना सपोर्ट करेल.
  • या फोनमध्ये 2 वर्ष अँड्रॉइड आणि 4 वर्ष सिक्योरिटी अपडेट मिळेल.

सॅमसंग भारतात आपला आणखी एक 5जी फोन घेऊन येत आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की येत्या 17 एप्रिलला नवीन Samsung Galaxy M14 5G फोन भारतात लाँच केला जाईल. गॅलेक्सी ‘एम’ सीरीजमधील या स्वस्त मोबाइलचे अनेक स्पेसिफिकेशन्स अधिकृतपणे शेयर करण्यात आले आहेत. त्यानुसार या फोनमध्ये 50MP चा कॅमेरा आणि 6000mAh ची मोठी बॅटरी मिळणार आहे. इतर माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

सॅमसंग गॅलेक्सी एम14 5जी लाँच व प्राइस

Samsung Galaxy M14 5G फोन 17 एप्रिलला भारतीय बाजारात एंट्री करेल. त्याच दिवशी दुपारी 12 वाजता कंपनी या स्मार्टफोनच्या किंमत व सेल डिटेल्सचा खुलासा करेल. कंपनीनं प्रोडक्ट पेजच्या माध्यमातून टीज केलं आहे की हा मोबाइल 13 हजारांच्या बजेटमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. आशा आहे की गॅलेक्सी ए14 5जीची प्रारंभिक किंमत 13,999 रुपये असू शकते.

सॅमसंग गॅलेक्सी एम14 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • Exnos 1330
  • 13 5G Bands
  • Android 13

Samsung Galaxy M14 5G फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी कंपनचा एक्सनॉस 1330 प्रोसेसर दिला जाईल. हा चिपसेट 5नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे जो 13 5जी बँड्सला सपोर्ट करतो.

हा सॅमसंग मोबाइल अँड्रॉइड 13 वर लाँच होईल जो सॅमसंग वन युआयसह चालेल. कंपनी हा स्मार्टफोन 2 वर्ष अँड्रॉइड ओएस अपडेट आणि 4 वर्ष सिक्योरिटी अपडेटसह मार्केटमध्ये आणेल.

  • 25W Charging
  • 6,000mAh Battery
  • 50MP Triple Camera

सॅमसंग गॅलेक्सी एम14 5जीची बॅटरी शक्तिशाली असेल. या मोबाइल फोनमध्ये 6,000एमएएचची बॅटरी दिली जाईल जी कंपनीच्या दाव्यानुसार एकदा फुल चार्ज केल्यावर 2 दिवसांपर्यंत सतत वापरता येईल. त्याचबरोबर यात 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील दिली जाईल.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M14 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल ज्यात प्रायमरी सेन्सर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल सेन्सर असेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

The post 17 एप्रिलला येतोय Samsung Galaxy M14 5G भारतात; मिळेल 50MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m14-5g-will-launch-in-india-on-17-april/feed/ 0