Samsung Galaxy M50 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 11 Nov 2019 09:12:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Exclusive: नोव्हेंबर मध्ये लॉन्च होईल Samsung चा नवीन M सीरीज फोन, नाव असू शकते Galaxy M50 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m50-to-launch-in-november/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m50-to-launch-in-november/#respond Mon, 11 Nov 2019 09:12:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5736 इंडस्ट्री मधील एका दुसऱ्या सोर्सने जो सॅमसंग सोबत अनेक वर्ष काम करत आहे त्यांनी सांगितले कि “कंपनी हा Samsung Galaxy M50 नावाने लॉन्च करणार आहे.

The post Exclusive: नोव्हेंबर मध्ये लॉन्च होईल Samsung चा नवीन M सीरीज फोन, नाव असू शकते Galaxy M50 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगने 2019 च्या सुरवातीला Galaxy M सीरीजच्या फोन्सची सुरवात केली होती. या अंतर्गत कंपनीने सर्वात आधी Samsung Galaxy M20 सादर केला होता. त्यानंतर M10, M30 आणि M40 सारखे मॉडेल सादर करण्यात आले. तसे पाहता गॅलेक्सी M सीरीज खासकरून ऑनलाइनसाठी होती नंतर Galaxy M40 मॉडेल कंपनीने ऑफलाइन पण उपलब्ध केला. अलीकडेच यांचे अपग्रेड वर्जन Galaxy M30S आणि Galaxy M10S कंपनीने लॉन्च केले जे चर्चेत आहेत. आता 91mobiles ला Samsung च्या अजून एका M सीरीज फोनची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे. नुकताच कंपनीने या मॉडेल बद्दल आपल्या पार्टनर्सना मेसेज केला आहे आणि हाच मेसेज आमच्या हाती आला आहे.

मेसेज मध्ये सॅमसंग टीमने आपल्या रिटेल पार्टनर्सना सांगितले आहे कि “आम्ही लवकरच एम सीरीजचा फोन लॉन्च करणार आहोत आणि हा फोन ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही जागी एक साथ एका किंमतीती उपलब्ध होईल. आम्ही असे प्लानिंग करू ज्याने ग्राहकांसोबतच चॅनेल पार्टनर्स आणि रिटेल पार्टनर्सना पण फायदा होईल.”

कंपनीने या मेसेज मध्ये नावाचा उल्लेख नाही आणि लॉन्च डेटची पण माहिती नाही. आशा आहे कि हा फोन Galaxy M40s असू शकतो. कारण M40 मॉडेल आधी पण ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी उपलब्ध झाला आहे. परंतु आम्हाला इंडस्ट्री मधील एका दुसऱ्या सोर्सने जो सॅमसंग सोबत अनेक वर्ष काम करत आहे त्यांनी सांगितले कि “कंपनी हा Samsung Galaxy M50 नावाने लॉन्च करणार आहे. हा फोन 15 नोव्हेंबर नंतर सादर केला जाऊ शकतो.” किंमतीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Samsung Galaxy M सीरीज

वर सांगितल्याप्रमाणे Samsung ने गॅलेक्सी एम सीरीजची सुरवात याचवर्षी केली आहे. आता पर्यंत एम सीरीजचे फोन 7,000 ते 20,000 रुपयांच्या बजेट मध्ये उपलब्ध आहेत. गॅलेक्सी एम10 मॉडेल 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये उपलब्ध आहे. तर एम20 आणि एम30 सीरीजचे फोन 10—15 हजार रुपयांच्या बजेट मध्ये सादर केले गेले आहेत. त्याचप्रमाणे एम40 मॉडेल 20,000 रुपयांमध्ये येतो आणि आशा आहे कि जर कंपनीने एम50 लॉन्च केला तर तो 20 हजारांपेक्षा जास्त बजेट येईल. एम सीरीजच्या फोन मध्ये चांगल्या स्पेसिफिकेशन सह मोठी बॅटरी असते.

Samsung Galaxy M30s

अलीकडेच सॅमसंगने गॅलेक्सी एम30एस मॉडेल सादर केला होता. या फोन मध्ये तुम्हाला 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशनची 6.4-इंचाची फुलएचडी+ सुपर एमोलेड स्क्रीन मिळेल. तसेच हा फोन सॅमसंगच्या एक्सनॉस 9611 चिपसेट वर चालतो आणि यात 4जीबी आणि 6जीबी रॅम देण्यात आला आहे. सोबत 64जीबी आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

Samsung Galaxy M30s मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमारी सेंसर देण्यात आला आहे. 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि 8-मेगापिक्सलचा तिसरा सेंसर देण्यात आला आहे. फ्रंटला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी यात मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने हा 6,000 एमएएच च्या बॅटरी सह सादर केला आहे आणि यात 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. डेटा साठी 4जी सह यूएसबी Type-C पोर्ट देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम30एस 128जीबी वीडियो

The post Exclusive: नोव्हेंबर मध्ये लॉन्च होईल Samsung चा नवीन M सीरीज फोन, नाव असू शकते Galaxy M50 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m50-to-launch-in-november/feed/ 0
सर्वात आधी भारतात येईल सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज, जानेवारी मध्ये लॉन्च होतील तीन फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-launch-galaxy-m-series-in-january-in-india-as-global-launch-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-launch-galaxy-m-series-in-january-in-india-as-global-launch-feature-specifications-in-marathi/#respond Thu, 27 Dec 2018 15:43:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3229 आईएएनएसच्या रिपोर्ट नंतर अशा आहे कि लवकरच सॅमसंग इंडिया नवीन फोनच्या लॉन्च संबंधित बातमी देऊ शकते.

The post सर्वात आधी भारतात येईल सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज, जानेवारी मध्ये लॉन्च होतील तीन फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगच्या गॅलेक्सी एम सीरीज बद्दल अनेक दिवसांपासून लीक्स येत आहेत. काही दिवसांपूर्वीच 91मोबाईल्स ने आपल्या एक्सक्लूसिव बातमीत सांगितले होते कि सॅमसंग ने भारतात नोएडा मधील प्लांट मध्ये आपल्या गॅलेक्सी एम सीरीजचे स्मार्टफोन्सची निर्मिती पण सुरु केली आहे. आता न्यूज एजेंसी आईएएनएस कडून बातमी आली आहे कि कोरियन कंपनी सॅमसंग पुढल्या महिन्यातच भारतात आपली गॅलेक्सी एस स्मार्टफोन सीरीज आणेल.

आईएएनएस ने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे कि जानेवारी मध्ये सॅमसंग कंपनी भारतात आपली गॅलेक्सी एम सीरीज लॉन्च करेल. आईएएनएस ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे कि त्यांना हि माहिती इंडस्ट्रीशी संबंधित सूत्रांकडून मिळाली आहे. आईएएनएस च्या रिपोर्टनुसार सॅमसंग आपली गॅलेक्सी एम सीरीज सर्वात आधी भारतातच लॉन्च करेल. हि सीरीज पुढल्याच महिन्यात भारतीय बाजारात येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजची सुरवात भारतातून ग्लोबल मंचावर करेल. रिपोर्ट नुसार या सीरीज मध्ये गॅलेक्सी एम50, गॅलेक्सी एम30 आणि गॅलेक्सी एम20 स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. पण तुम्ही फोन एक साथ लॉन्च केले जातील कि वेगवेगळ्या दिवशी याची माहिती एजेंसी ने दिली नाही.

साहजिकच गॅलेक्सी एम सीरीज सॅमसंग साठी खास असणार आहे. या सीरीज सोबतच सॅमसंग आपली रणनीती बदलणार आहे. सॅमसंग एकीकडे गॅलेक्सी एम सीरीज आणणार आहे तर दुसरीकडे गॅलेक्सी जे सीरीज तसेच गॅलेक्सी ऑन सीरीज कंपनी द्वारा बंद केली जाईल. अनेक रिर्पोट्स मध्ये असे पण बोलले जात आहे कि सॅमसंग आपल्या गॅलेक्सी एम सीरीजचे स्मार्टफोन्स गॅलेक्सी एम5, गॅलेक्सी एम3 आणि गॅलेक्सी एम2 नावाने लॉन्च करू शकते.

सॅमसंग ने अजूनतरी गॅलेक्सी एम सीरीजच्या इंडिया लॉन्च बद्दल कोणतीही माहिती दिली नाही किंवा कंपनीने या सीरीजच्या कोणत्याही स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स व किंमतीचा खुलासा केलेला नाही. आईएएनएसच्या रिपोर्ट नंतर अशा आहे कि लवकरच सॅमसंग इंडिया नवीन फोनच्या लॉन्च संबंधित बातमी देऊ शकते.

तुम्हाला तर माहीतच आहे 91मोबाईल्स ने आधीपण गॅलेक्सी एम सीरीज संबंधित एक्सक्लूसिव बातम्या दिल्या आहेत. गॅलेक्सी एम20 बद्दल आम्ही अशीच सांगितले आहे कि गॅलेक्सी एम20 स्मार्टफोन मध्ये डुअल कॅमेरा, नॉच डिस्प्ले, 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाइप-सी सपोर्ट मिळेल. आम्ही रिपोर्ट मध्ये या फोनच्या बॅक पॅनलचा फोटो शेयर केला होता. तसेच या फोन मध्ये रियर फिंगर​प्रिंट सेंसर पण दिला जाईल. हा फोन 5,000 एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च होईल.

The post सर्वात आधी भारतात येईल सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज, जानेवारी मध्ये लॉन्च होतील तीन फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-launch-galaxy-m-series-in-january-in-india-as-global-launch-feature-specifications-in-marathi/feed/ 0