Samsung Galaxy Note 20 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 27 Nov 2020 13:24:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लाखो रुपयांचे iPhone आणि Samsung चे फोन बनतात हजारांमध्ये, जाणून घ्या कसे https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-20-and-iphone-12-pro-real-manufacturing-price-and-market-price-compared/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-20-and-iphone-12-pro-real-manufacturing-price-and-market-price-compared/#respond Fri, 27 Nov 2020 13:24:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9099 जापानी टियरडाउन फर्म Fomalhaut Techno Solutions ने दोन्ही नवीन iPhone 12 सीरीज मॉडेलसाठी BoM च्या किंमतींचा खुलासा केला आहे.

The post लाखो रुपयांचे iPhone आणि Samsung चे फोन बनतात हजारांमध्ये, जाणून घ्या कसे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऍप्पलच्या आयफोन आणि सॅमसंगची फ्लॅगशिप गॅलेक्सी नोट सीरीज विकत घेण्यासाठी तुम्ही लाखो रुपये खर्च करता. पण एक रिपोर्ट समोर आला आहे, जो बघून तुम्ही हैराण व्हाल ज्या स्मार्टफोनसाठी तुम्ही लाखो रुपये देता तो बनवण्यासाठी कंपनी फक्त काही हजार रुपये खर्च करते. रिपोर्ट मध्ये काही महिन्यांपूर्वी सादर केले गेलेल्या iPhone 12, iPhone 12 Pro, Samsung Galaxy Note 20 आणि Galaxy Note 20 Ultra 5G च्या कॉस्टचा खुलासा झाला आहे. या रिपोर्ट मध्ये सॅमसंग आणि ऍप्पलच्या या या फोन्स मधील सर्व पार्ट्सच्या किंमतीच्या आधारावर फोनच्या कॉस्टचा अंदाज लावला गेला आहे. रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि फोनची कॉस्ट याच्या किंमतीच्या जवळपास एक त्रितीयांश इतकी कमी आहे.

Apple iPhone 12 आणि iPhone 12 Pro पाहता ज्या किंमतीत हे विकले जातात, त्यापेक्षा कितीतरी स्वस्त आहेत, आयफोन 12 आणि 12 प्रो मध्ये वापरल्या जाणाऱ्या कंपोनेंट्सच्या किंमतीचा खुलासा बिल ऑफ मटिरियल्सच्या रिपोर्ट मध्ये झाला आहे. iPhone 12 प्रो बनवण्यसाठी BoM $ 406 आहे, जी जवळपास 30,000 रुपये आहे. iPhone 12 Pro ची किंमत अमेरीकेत 999 डॉलर आणि भारतात 1,19,900 रुपये आहे. तर iPhone 12 ची BoM $ 373 आहे, जी जवळपास 27,500 रुपये आहे.

जापानी टियरडाउन फर्म Fomalhaut Techno Solutions ने दोन्ही नवीन iPhone 12 सीरीज मॉडेलसाठी BoM च्या किंमतींचा खुलासा केला आहे. कंपनीने खुलासा केला कि iPhone 12 सीरीजच्या फोन मध्ये वापरला जाणारा सर्वात महाग कंपोनंट म्हणजे सॅमसंग द्वारे बनवण्यात आलेला OLED डिस्प्ले आणि नवीन iPhone मॉडेल वर 5G कनेक्टिविटी सक्षम करण्यासाठी क्वालकॉम X50 5G मॉडेम यांचा समावेश आहे. पहिल्या कंपोनंटचा अंदाज $ 70 प्रति यूनिट आहे तर 5G मॉडेमची किंमत जवळपास $ 90 आहे.

तसेच सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 सीरीज पाहता Galaxy Note 20 Ultra 5G बनवण्यात कंपनी द्वारे फक्त 40,400 रुपये खर्च केले जातात. तसेच हा फोन कंपनी द्वारे 1,04,000 रुपयांमध्ये विकला जातो.

Galaxy Note 20 Ultra 5G बनवण्यात कंपनी द्वारे 39,000 रुपये खर्च केले जातात, तर हा फोन कंपनी द्वारे 86,999 रुपयांमध्ये विकला जातो. या फोन्सच्या सर्व पार्ट्सची कॉस्ट जोडली तरी पण पण सेलिंग प्राइस खूप जास्त वाटते. पण या किंमतीत मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक आणि R&D ची किंमत जोडलेली नाही.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रा 5जी व्हिडीओ

The post लाखो रुपयांचे iPhone आणि Samsung चे फोन बनतात हजारांमध्ये, जाणून घ्या कसे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-20-and-iphone-12-pro-real-manufacturing-price-and-market-price-compared/feed/ 0
108MP कॅमेरा आणि 50x झूम सह येत आहे सॅमसंगचा नवीन फोन, शाओमीला देईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-20-plus-ultra-camera-details-bluetooth-certification-launch-soon-with-108mp/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-20-plus-ultra-camera-details-bluetooth-certification-launch-soon-with-108mp/#respond Thu, 04 Jun 2020 10:27:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7304 लीक्स्टरने वीबो अकाउंट वर याची माहिती दिली आहे कि गॅलेक्सी S20+ मध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर असेल.

The post 108MP कॅमेरा आणि 50x झूम सह येत आहे सॅमसंगचा नवीन फोन, शाओमीला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगच्या अपकमिंग गॅलेक्सी नोट 20 सीरीज बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. दक्षिण कोरियन टेक दिग्गज कंपनीने अजूनतरी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. पण आता एका टिपस्टरने माहिती दिली आहे कि गॅलेक्सी नोट 20+ स्मार्टफोन मध्ये एक 108-मेगापिक्सेल आईएसओसीएल ब्राइट एचएम 1 सेंसर असेल आणि कंपनी टीओएफ सेंसरच्या ऐवजी एक लेजर फोकस सेंसरचा उपयोग करेल. तसेच सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 अल्ट्राला ब्लूटूथ एसआईजी सर्टिफिकेशन मिळाले आहे असे बोलले जात आहे, जो फोनच्या मॉडेल नंबर सह दिसत आहे. गेल्या अनेक रिपोर्ट्स मध्ये याची माहिती समोर आली होती कि सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 सीरीज ऑगस्ट मध्ये सादर केली जाईल.

Samsung Galaxy Note 20 सीरीजच्या स्मार्टफोन्सचे लीक्स येण्यास सुरवात झाली आहे. आता प्रसिद्ध लीक्स्टर IceUniverse ने Galaxy Note 20+ च्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्स बाबत महत्वाची माहिती दिली आहे.

लीक्स्टरने वीबो अकाउंट वर याची माहिती दिली आहे कि गॅलेक्सी S20+ मध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर असेल. पोस्टनुसार फोन मध्ये आता टाइम-ऑफ- फ्लाइट सेंसरच्या जागी लेजर फोकस सेंसर दिला जाईल जो मेन कॅमेऱ्याला असिस्ट करेल. फोनची सर्वात मोठी खासियत असेल कि हा 50x झूम सपॉर्ट सह येईल.

तसेच गॅलेक्सी नोट 20+ मध्ये PDAF सह 12 मेगापिक्सलची ISOCELL फास्ट 2L3 अल्ट्रावाइड अँगल लेंस मिळेल, जिचा आकार 1/2.55” असेल. त्याचबरोबर कॅमेरा सेटअप मध्ये 3 मेगापिक्सलची सॅमसंग स्लिम 3M5 पेरिस्कोप टेलिफोटो लेंस पण दिली जाऊ शकते.

गॅलेक्सी नोट 20+ मध्ये 4,370mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच एप्रिल मध्ये फोन एक गीकबेंच लिस्टिंग वर दिसला होता, तिथे याचा मॉडेल नंबर SM-N986U होता. असा अंदाज लावला जात होता कि फोन मध्ये एक ओक्टा-कोर क्वालकॉम प्रोसेसर सह येईल, ज्यात 8 जीबी रॅम आणि एंड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम असेल.

अशी असेल डिजाइन

काही दिवसांपूर्वी CAD रेंडर मध्ये गॅलेक्सी नोट 20+ दिसला होता. यात फोनची झलक दिसली होती. त्यानुसार फोन सेंट्रल पंच-होल डिजाइन सह सादर केला जाऊ शकतो. अजूनतरी डिजाइन आणि लॉन्च डेट बद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.

The post 108MP कॅमेरा आणि 50x झूम सह येत आहे सॅमसंगचा नवीन फोन, शाओमीला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-20-plus-ultra-camera-details-bluetooth-certification-launch-soon-with-108mp/feed/ 0
Corona चा परिणाम होणार नाही Samsung Galaxy Note 20 सीरीजच्या लॉन्च वर, लवकरच येईल बाजारात https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-20-series-launch-not-canceled-due-to-coronavirus/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-20-series-launch-not-canceled-due-to-coronavirus/#respond Fri, 10 Apr 2020 12:33:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7056 Korea Herald च्या रिपोर्टनुसार Samsung ने आतापासूनच Galaxy Note 20 लॉन्च इवेंटची तयारी सुरु केली आहे.

The post Corona चा परिणाम होणार नाही Samsung Galaxy Note 20 सीरीजच्या लॉन्च वर, लवकरच येईल बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy Note 20 सीरीज बद्दल अनेक दिवसांपासून बातमी समोर येत आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोना वायरस महामारीमुळे या सीरीजच्या लॉन्च वर कोणताही परिणाम होणार नाही. बोलले जात आहे कि कंपनी गॅलेक्सी नोट 20 ठरलेल्या वेळी लॉन्च करेल.

हि सीरीज यावर्षी ऑगस्ट मध्ये लॉन्च होणार आहे. तर दुसरीकडे मार्च आणि एप्रिल मध्ये लॉन्च होणाऱ्या काही स्मार्टफोन्सची लाँन्च डेट पुढे ढकलण्यात आली आहे किंवा COVID-19 पाहता कंपन्यां आपले फोन्स ऑनलाइन प्लॅटफॉम वर लॉन्च करत आहेत.

Korea Herald च्या रिपोर्टनुसार Samsung ने आतापासूनच Galaxy Note 20 लॉन्च इवेंटची तयारी सुरु केली आहे. हा लॉन्च इवेंट ऑगस्ट मध्ये आयोजित केला जाऊ शकतो, ज्यात Samsung Galaxy Fold 2 स्मार्टफोन पण लॉन्च केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रिपोर्ट मध्ये इंसाइडर सूत्रांकडून माहिती मिळाली आहे कि कंपनी आपल्या अपकमिंग सॅमसंग गॅलेक्सी नोट सीरीजच्या लॉन्चची तयारी करत आहे. कंपनीने अजूनतरी या फोनची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. तसेच आता पर्यंत लॉन्च डेट बाबत पण कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर Galaxy Note 20 Plus 5G दिसला होता. वेबसाइट वर फोन मॉडेल नंबर SM-N986U सह दिसला होता. या मॉडेल नंबर वरून बोलले जात आहे कि हा Galaxy Note 20+ असेल कारण Galaxy Note 10+ 5G चा मॉडेल नंबर SM-N976U होता.

लिस्टिंगनुसार सॅमसंगचा हा फोन एंडरॉयड 10 सह येईल. तसेच डिवाइस मध्ये 8GB रॅम आणि ऑक्टा-कोर क्वालकॉमचा प्रोसेसर असेल. गीकबेंच वर फोनला सिंगल-कोर मध्ये 985 स्कोर मिळाला आहे. मल्टी-कोर मध्ये याचा स्कोर 3220 आहे. तसेच याच्या मदरबोर्डचे नाव Kona असल्याचे बोलले जात आहे.

The post Corona चा परिणाम होणार नाही Samsung Galaxy Note 20 सीरीजच्या लॉन्च वर, लवकरच येईल बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-20-series-launch-not-canceled-due-to-coronavirus/feed/ 0