Samsung Galaxy Note10 Lite - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 06 Jan 2020 12:57:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy Note10 Lite लॉन्च, बघा फोनचे पावरफुल स्पेसिफिकेशन्स, OnePlus ला देईल थेट टक्कर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note10-s10-lite-officially-launched-features-specifications-price-s-pen/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note10-s10-lite-officially-launched-features-specifications-price-s-pen/#respond Mon, 06 Jan 2020 12:57:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6196 हा डिवाईस पण नोट 10 सीरीजच्या फोन्सप्रमाणे एडवांस S Pen सह लॉन्च झाला आहे

The post Samsung Galaxy Note10 Lite लॉन्च, बघा फोनचे पावरफुल स्पेसिफिकेशन्स, OnePlus ला देईल थेट टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बद्दल गेल्या काही दिवसांपासून बातम्या येत आहेत कि कंपनी जानेवारी मध्ये Galaxy Note 10 Lite आणि Galaxy S10 Lite डिवाईस लॉन्च करेल. वेगवेगळ्या लीक्स मध्ये या दोन्ही स्मार्टफोन्सच्या अनेक स्पेसिफिकेशन्सचा खुलासा पण झाला होता. तर आज या लीक्स समोर पूर्णविराम देत Samsung ने अधिकृतपणे Samsung Galaxy Note 10 Lite आणि Galaxy S 10 Lite लॉन्च केले आहेत. कंपनीने हे डिवाईस आज ग्लोबल मार्केट मध्ये सादर केले आहेत जे आगामी काळात जगातील इत्तर बाजारांत सेलसाठी उपलब्ध होतील. गॅलेक्सी नोट 10 लाइटच्या माध्यमातून सॅमसंगने आपल्या नोट सीरीज मध्ये अजून एक पावरफुल आणि स्वस्त डिवाईस जोडला आहे.

लुक व डिजाईन

Samsung Galaxy Note10 Lite कंपनीने फुलव्यू बेजल लेस पंच-होल डिस्प्ले सह लॉन्च केला आहे. फोन डिस्प्लेच्या तीन कडा साईड ऐजेजच्या जवळ आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. पंच-होल फोन डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मधोमध देण्यात आला आहे, या मध्ये सेल्फी कॅमेरा आहे. Galaxy Note10 Lite कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप वर लॉन्च केला आहे जो बॅक पॅनल वर उजवीकडे आहे. सॅमसंगने या फोनचा रियर कॅमेरा सेटअप ‘चौकोनी’ आकाराचा बनवला आहे. फोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट सोबतच स्पीकर ग्रिल, 3.5एमएम ऑडियो जॅक आणि S Pen डॉक देण्यात आला आहे.

कॅमेरा सेग्मेंट

Samsung Galaxy Note10 Lite चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सॅमसंगने फक्त सॉफ्टवेयर नाही तर बाहेरील लुकच्या बाबतीत पण फोनचा कॅमेरा डिपार्टमेंट खास बनवला आहे. बॅक पॅनल वर चौकोनी आकाराचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एफ/2.2 अचर्पर असलेला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/1.7 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आहे. तसेच फ्रंट पॅनल वरील पंच-होल मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Note10 Lite कंपनीने 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे, जो कंपनीने सिनेमॅटिक इनफिनिटी डिस्प्लेचे नाव दिले आहे. गॅलेक्सी नोट 10 लाइट इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो जो फास्ट फोन अनलॉकिंग टेक्नॉलॉजी सह येतो. Galaxy Note10 Lite सॅमसंग 2.0 यूआई आधारित एंडरॉयडच्या एडवांस ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो सॅमसंगच्या 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या एक्सनॉस 9810 चिपसेट वर चालतो.

ग्लोबल मार्केट मध्ये Samsung Galaxy Note10 Lite दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला आहे ज्यात 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅमचा समावेश आहे. हे दोन्ही वेरिएंट्स 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 1 टीबी पर्यंत वाढवता येते. गॅलेक्सी नोट 10 लाइट एनएफसी व सॅमसंग पे सारख्या फीचर्स सह येतो तसेच पावर बॅकअपसाठी या डिवाईस मध्ये सुपर फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा डिवाईस पण नोट 10 सीरीजच्या फोन्सप्रमाणे एडवांस S Pen सह लॉन्च झाला आहे जो Aura Glow, Aura Black आणि Aura Red कलर मध्ये लॉन्च केला जाईल.

The post Samsung Galaxy Note10 Lite लॉन्च, बघा फोनचे पावरफुल स्पेसिफिकेशन्स, OnePlus ला देईल थेट टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note10-s10-lite-officially-launched-features-specifications-price-s-pen/feed/ 0