Samsung Galaxy On8 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 01 Aug 2018 08:06:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला सॅमसंग गॅलेक्सी आॅन8, 6 ऑगस्ट पासून फ्लिपकार्ट वर होईल सेल https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-on8-launch-in-india-features-specifications-price-sale-on-flipkart-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-on8-launch-in-india-features-specifications-price-sale-on-flipkart-in-marathi/#respond Wed, 01 Aug 2018 08:06:35 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1484 सॅमसंग ने गॅलेक्सी आॅन8 स्मार्टफोन 16,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो 6 ऑगस्ट पासून सॅमसंग आॅनलाईन शॉप सह ईकॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

The post 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला सॅमसंग गॅलेक्सी आॅन8, 6 ऑगस्ट पासून फ्लिपकार्ट वर होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग बद्दल गेल्या आठवड्यात आम्ही बातमी दिली होती की कपंनी ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात आपल्या गॅलेक्सी आॅन सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन म्हणून गॅलेक्सी आॅन8 लॉन्च करू शकते. त्यानुसार आज सॅमसंग इंडिया ने हा फोन समोर आणला आहे आणि गॅलेक्सी आॅन8 भारतीय बाजारात सादर केला आहे. सॅमसंग ने गॅलेक्सी आॅन8 स्मार्टफोन 16,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो 6 ऑगस्ट पासून सॅमसंग आॅनलाईन शॉप सह ईकॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी आॅन8 बद्दल बोलायचे तर हा फोन पॉलीकार्बोनेट यूनिबॉडी डिजाईन वर बनला आहे हा 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या इनफिनिटी डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये तुम्हाला 6-इंचाची एचडी+ सुपर एमोलेड स्क्रीन मिळू शकते. हा फोन एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित आहे तसेच आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन ​ 450 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने गॅलेक्सी आॅन8 मध्ये 4जीबी रॅम दिला आहे. फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी आॅन8 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एफ/1.7 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/1.9 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेकेंडी कॅमेरा सेंसर आहे.

सॅमसंग ने सेल्फी साठी गॅलेक्सी आॅन8 मध्ये एफ/1.9 अपर्चर वाला 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. सॅमसंग चा हा फोन डुअल सिम सोबत 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक ​कनेक्टिविटी फीचर्स सह फोन च्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी आहे.

सॅमसंग गॅलेक्सी आॅन8 ब्लू आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये 16,990 रुपयांमध्ये 6 ऑगस्ट पासून विकत घेता येईल. फ्लिपकार्ट या स्मार्टफोनला नो कॉस्ट ईएमआई, स्पेशल डेटा आॅफर आणि अनेक आर्कषक डील सह सेल साठी लिस्ट करेल.

The post 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला सॅमसंग गॅलेक्सी आॅन8, 6 ऑगस्ट पासून फ्लिपकार्ट वर होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-on8-launch-in-india-features-specifications-price-sale-on-flipkart-in-marathi/feed/ 0
4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी आॅन8, 3 ऑगस्ट पासून फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-on8-might-launch-on-8th-august-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-on8-might-launch-on-8th-august-in-india-in-marathi/#respond Mon, 30 Jul 2018 13:46:50 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1458 हा फोन गॅलेक्सी जे8 चा आॅनलाईन वेरिएंट असेल जो शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल

The post 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी आॅन8, 3 ऑगस्ट पासून फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग बद्दल बातमी आली होती की कंपनी ने​ गॅलेक्सी सीरीज च्या दोन नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी जे8 आणि गॅलेक्सी जे6 च्या रेकॉर्ड सेल मुळे इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये पहिले स्थान मिळवले आहे. सॅमसंग ने शाओमी ला मागे टाकत नंबर वन पॉजिशन मिळवली आहे. दीर्घकाळानंतर मिळवलेले हे यश सॅमसंग ला गमवायचे नाही आणि याच प्रयत्नांत कंपनी भारतीय बाजारात अजून एक स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. सॅमसंग येत्या 3 ऑगस्ट ला भारतात ईवेंट चे आयोजन करणार आहे त्यातून कंपनी चा नवीन प्रोडक्ट भारतात येईल.

सॅमसंग ने 3 ऑगस्ट च्या ईवेंट साठी मीडिया इन्वाईट पाठवणे सुरू केले आहे. कंपनी ने सांगितले नाही की 3 ऑगस्ट ला कोणता डिवाईस लॉन्च केला जाईल, पण बोलले जात आहे की त्यादिवशी कंपनी आपल्या गॅलेक्सी सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन आणत गॅलेक्सी आॅन8 (2018) लॉन्च करेल. चर्चा सुरू होत आहे की हा फोन गॅलेक्सी जे8 चा आॅनलाईन वेरिएंट असेल जो शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी आॅन8 (2018) बद्दल बोलले जात आहे की हा फोन जवळपास 18,000 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल हा फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. फोन चे स्पेसिफिकेशन्स पाहता मीडिया रिपोर्ट्स नुसार या फोन मध्ये 4जीबी रॅम मेमरी देण्यात आली आहे तसेच फोन 64जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च होईल.

गॅलेक्सी आॅन8 (2018) मध्ये 6-इंचाचा एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. एंडरॉयड ओरियो आधारित हा फोन आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन ​450 चिपसेट वर चालेल. फोटोग्राफी साठी गॅलेक्सी आॅन8 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो ज्यात 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे कॅमेरा सेंसर असतील. तर सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी आॅन8 (2018) मध्ये बेसिक ​कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटी साठी रियर फिंगर​प्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो तर पावर बॅकअप साठी यात 3,500एमएएच ची बॅटरी मिळू शकते. आधी सांगितल्याप्रमाणे सॅमसंग ने अजून पर्यंत 3 ऑगस्ट ला लॉन्च होणार्‍या प्रोडक्ट ची माहिती दिली आहे, त्यामुळे गॅलेक्सी आॅन8 च्या ठोस माहितीसाठी 3 ऑगस्ट ला लॉन्च ईवेंट ची वाट बघावी लागेल.

The post 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी आॅन8, 3 ऑगस्ट पासून फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-on8-might-launch-on-8th-august-in-india-in-marathi/feed/ 0