Samsung Galaxy S4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 12 Jun 2018 05:37:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 चालत्या गाडीत सॅमसंग गॅलेक्सी एस8 मध्ये लागली आग, थोडक्यात वाचली महिला https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-and-s4-caught-fire-blasted-in-a-car-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-and-s4-caught-fire-blasted-in-a-car-in-marathi/#respond Mon, 11 Jun 2018 13:43:23 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=862 फायर विभाग ने या आगीचे कारण स्मार्टफोनच आहे असे सांगितले आहे.

The post चालत्या गाडीत सॅमसंग गॅलेक्सी एस8 मध्ये लागली आग, थोडक्यात वाचली महिला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग बद्दल काही दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती ज्यात गॅलेक्सी नोट 2 ला आग लागल्याची बाब समोर आली होती. ही घटना मुंबईत घडली होती, त्या नंतर स्मार्टफोन यूजर्स खुप घाबरले आहेत. या बातमीला अजून एक आठवडा पण झाला नाही की पुन्हा एकदा सॅमसंग स्मार्टफोन मध्ये आग लागल्याची बातमी येत आहे. यावेळी प्रसंग इतका गंभीर होता ज्यात स्मार्टफोन च्या आगीने कार ला पण आग लागली.

सॅमसंग स्मार्टफोन मध्ये आग लागण्याची ही घटना अमेरिकेतील आहे. अमेरिकन मीडिया नुसार एक महिलेच्या सॅमसंग स्मार्टफोन मध्ये तेव्हा आग लागली जेव्हा ती कार चालवत होती. आगीच्या ज्वाला बघून महिला समझदारी दाखवत कार मधून उतरली पण फोन मध्ये लागलेली आग इतकी भयानक होती की तिने थोड्या वेळेत संपूर्ण कार ताब्यात घेतली आणि जाळून राख केली.

मीडिया रिपोर्ट नुसार महिले कडे सॅमसंग चे 2 स्मार्टफोन होते. यात गॅलेक्सी एस8 आणि गॅलेक्सी एस4 यांचा समावेश होता. जेव्हा महिला कार चालवत होती त्यावेळी हे दोन्ही स्मार्टफोन महिलेच्या कार मध्ये होते. दोन्ही फोन मध्ये अचानक आग लागली. महिले नुसार ती लवकरच कार थांबवून बाहेर पडली होती पण थोड्याच वेळात आग पूर्णपणे गाडीत पसरली होती.

महिले चे म्हणणे आहे की जर तिची कार ट्रॅफिक मध्ये अडकलेली असती तर तिला कार मधून बाहेर निघणे जमले नसते आणि तिचा जीव वाचला नसता. या घटने वर सॅमसंग ने सांगितले की त्यांचे डिवाईस संपूर्ण प्रशिक्षणानंतर विकले जात आहेत त्यामुळे अशी घटना घडणे अशक्य वाटते. तर दुसरीकडे फायर विभाग ने या आगीचे कारण स्मार्टफोनच आहे असे सांगितले आहे.

या घटनेत महिले चा जीव वाचला पण दोन्ही स्मार्टफोन आणि कार सह पीडित महिलेचे खुप नुकसान झाले आहे. याचा तपास पोलिस करत आहेत. तर दुसरीकडे रोजची गरज असणार्‍या स्मार्टफोंस मुळे अशा प्रकारचे प्रसंग घडणे आणि लोकांचा जीव धोक्यात येणे मोबाईल कंपन्यांच्या कार्य पद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. तसेच एका सामन्य यूजर च्या जिवाशी होणार्‍या खेळाचे गांभीर्य इथे स्पष्ट दिसते.

The post चालत्या गाडीत सॅमसंग गॅलेक्सी एस8 मध्ये लागली आग, थोडक्यात वाचली महिला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s8-and-s4-caught-fire-blasted-in-a-car-in-marathi/feed/ 0