Samsung Tab S6 Lite - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 01 Apr 2020 15:24:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy Tab S6 Lite प्री-ऑर्डरसाठी झाला उपलब्ध, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s6-lite-now-available-for-pre-booking-on-amazon-know-price-specification-sale-detail/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s6-lite-now-available-for-pre-booking-on-amazon-know-price-specification-sale-detail/#respond Wed, 01 Apr 2020 15:24:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6967 Samsung चा अपकमिंग डिवाइस Galaxy Tab S6 Lite जर्मनी मध्ये प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे आणि यूजर्स हा Amazon वर प्री-बुक करू शकतात.

The post Samsung Galaxy Tab S6 Lite प्री-ऑर्डरसाठी झाला उपलब्ध, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने अलीकडेच Galaxy Tab A 8.4 (2020) लॉन्च केला होता जो मोठ्या बॅटरी आणि शानदार स्पेसिफिकेशन्स सह आला होता. आता साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगचा नवीन टॅब Galaxy Tab S6 Lite लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. लॉन्चच्या आधी हा टॅबलेट ई-कॉमर्स साइट अमेझॉन वर किंमत आणि स्पेसिफिकेशन्स सह दिसला आहे.

कंपनीने अजूनतरी अधिकृतपणे हा लॉन्च केला नाही पण रिपोर्ट नुसार यूजर्स यांचाही प्री-बुकिंग करू शकतात. Slashleaks च्या रिपोर्ट मध्ये माहिती देण्यात आली आहे कि Samsung चा अपकमिंग डिवाइस Galaxy Tab S6 Lite जर्मनी मध्ये प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे आणि यूजर्स हा Amazon वर प्री-बुक करू शकतात.

तसेच Samsung Galaxy TAB S6 Lite च्या Wi-Fi-only वर्जनची किंमत आणि रेंडर्स समोर आले आहेत. हे रेंडर्स टेक वेबसाइट प्राइसबाबा वर इंडियन टिपस्टर ईशान अग्रवालने शेयर केले आहेत. या वेरिएंटची यूरोपियन मार्केट मध्ये किंमत जवळपास 33,211 रुपये असेल.

किंमतीबाबत बोलायचे तर अमेझॉननुसार या टॅबलेटच्या LTE वर्जनची किंमत 430 Euros (जवळपास 35,800 रुपये) आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या हा फक्त जर्मनी मधेच उपलब्ध करण्यात आला आहे. जरी याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण आशा आहे कि या आठवड्यात कंपनी हा टॅब अधिकृतपणे लॉन्च करू शकते.

स्पेसिफिकेशन्स

अमेझॉनच्या लिस्टिंग नुसार Samsung Galaxy Tab S6 Lite मध्ये 10.4 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे आणि हा एंडरॉयड 10 ओएस सह वन यूआई 2.0 कस्टम स्किन वर चालेल. सोबतच डिवाइस मध्ये 4GB रॅम देण्यात आला आहे. या डिवाइस मध्ये यूजर्सना S Pen स्टायलसची सुविधा मिळेल. यात AKG ट्यूनिंग आणि डॉल्बी एटमॉस सपोर्ट सह ड्यूल स्पीकर देण्यात आले आहेत.

टॅबलेट मध्ये Exynos 9611 SoC आणि 64GB स्टोरेज असेल. तसेच डिवाइसची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येईल. इतकेच नव्हे तर Samsung Galaxy Tab S6 Lite मध्ये सिंगल 8MP रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा असेल. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 7,040mAh ची बॅटरी दिली जाईल.

The post Samsung Galaxy Tab S6 Lite प्री-ऑर्डरसाठी झाला उपलब्ध, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s6-lite-now-available-for-pre-booking-on-amazon-know-price-specification-sale-detail/feed/ 0