Smartisan - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 21 Oct 2020 13:34:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 16GB रॅम आणि 108MP क्वॉड कॅमेऱ्यासह लॉन्च झाला हा पावरफुल स्मार्टफोन, Xiaomi ला देईल मात https://www.91mobiles.com/marathi/smartisan-nut-r2-officially-launched-16-gb-ram-108-mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/smartisan-nut-r2-officially-launched-16-gb-ram-108-mp-camera/#respond Wed, 21 Oct 2020 13:34:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8610 Smartisan Nut R2 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो स्मार्टीसन ओएस 8.0 सह चालतो.

The post 16GB रॅम आणि 108MP क्वॉड कॅमेऱ्यासह लॉन्च झाला हा पावरफुल स्मार्टफोन, Xiaomi ला देईल मात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्हाला माहित असेल कि TikTok भारतात बॅन होण्याआधी चर्चा सुरु झाली होती कि टिकटॉक आपला स्मार्टफोन पण लॉन्च करेल. टिकटॉकची ओनर कंपनी ByteDance ने आपला हा फोन ग्लोबल मार्केट मध्ये Nut Pro 3 नावाने सादर केला होता आणि याची निर्मिती चीनी कंपनी Smartisan शी भागेदारी करून झाली होती. हीच टेक कंपनी Smartisan आता आपला अजून एक नवीन स्मार्टफोन घेऊन आली आहे जो Smartisan Nut R2 नावाने लॉन्च केला गेला आहे. हा फोन भारतीय बाजारात एणार नाही, पण याची चर्चा आहे कारण हा 16 जीबी पावरफुल रॅम सह फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये लॉन्च केला गेला आहे.

Smartisan Nut R2

थेट नट आर2 स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन बेजल लेस पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. फोनची स्क्रीन चारही बाजूंनी साईड पॅनलला मिळाली आहे तसेच डिस्प्लेच्या वर डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला छोटा होल देण्यात आला आहे. Smartisan Nut R2 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

Smartisan Nut R2 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो स्मार्टीसन ओएस 8.0 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा पावरफुल स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 16 जीबी की पावरफुल रॅम सह लॉन्च झाला आहे जो 512 जीबी च्या मोठ्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन LPDDR5 RAM आणि UFS 3.1 इंटरनल स्टोरेज टेक्नॉलॉजी सह येतो. कंपनीने हा फोन डुअल-मोड 5जी कनेक्टिविटी सह बाजारात आणला आहे.

हे देखील वाचा : Nokia ने आणला अजून एक स्वस्त 4G स्मार्टफोन, किंमत फक्त 6,500 रुपयांच्या आसपास

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या े बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 108 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच आहे फोन 13 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 8 मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेंस आणि 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. हा फोन 3x optical zoom आणि 30x hybrid zoomला सपोर्ट करतो. तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Smartisan Nut R2 मध्ये एलएफसी आणि वाई-फाई 6 सारख्या कनेक्टिविटी फीचर्स सोबतच डीटीएस ओडियो सपोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी Smartisan Nut R2 मध्ये 55वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,510एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. चीनी बाजारात हा फोन Black, White आणि Green कलर मध्ये लॉन्च झाला आहे.

वेरिएंट व किंमत

Smartisan Nut R2 चार वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 4,499 युआन (जवळपास 49,500 रुपये), 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 4,799 युआन (जवळपास 53,000 रुपये) आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 5,299 युआन (जवळपास 58,500 रुपये) मध्ये आला आहे. तसेच फोनच्या सर्वात मोठ्या 16 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,499 युआन म्हणजे 71,500 रुपयांच्या आसपास आहे.

The post 16GB रॅम आणि 108MP क्वॉड कॅमेऱ्यासह लॉन्च झाला हा पावरफुल स्मार्टफोन, Xiaomi ला देईल मात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/smartisan-nut-r2-officially-launched-16-gb-ram-108-mp-camera/feed/ 0
सादर झाला TikTok वाल्यांचा स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स बघून सांगा विकत घ्याल का हा मोबाईल https://www.91mobiles.com/marathi/tiktok-bytedance-smartisan-jianguo-nut-pro-3-smartphone-launched-12gb-ram-quad-rear-camera-launched-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/tiktok-bytedance-smartisan-jianguo-nut-pro-3-smartphone-launched-12gb-ram-quad-rear-camera-launched-specifications-price/#respond Mon, 04 Nov 2019 14:07:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5675 फोनच्या किंमतीची सुरवात 2899 युआन म्हणजे 29,000 रुपयांपासून होईल.

The post सादर झाला TikTok वाल्यांचा स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स बघून सांगा विकत घ्याल का हा मोबाईल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
TikTok बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या कि या म्यूजिक मेकिंग ऍपच पॅरेन्ट कंपनी ByteDance आपला स्वतःचा स्मार्टफोन पण बाजारात आणणार आहे. अनेक गॉसिप्स आणि बातम्यानंतर अखेरीस TikTok चा हा स्मार्टफोन समोर आला आहे. ByteDance ने आधीच स्पष्ट केले होते कि हा फोन टेक कंपनी Smartisan शी भागेदारी करून बनवला जाईल आणि या फोनचा TikTok शी कोणताही संबंध नसेल. तसेच आज कंपनीने हा स्मार्टफोन Jianguo Pro 3 नावाने अधिकृत केला आहे.

Jianguo Pro 3

हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केट मध्ये Nut Pro 3 नावाने प्रेजेंट केला जाईल. थेट फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता Jianguo Pro 3 म्हणजे Nut Pro 3 वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे जो बेजल लेस डिस्प्ले सह ‘यू’ शेप नॉचला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 6.39 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन सिक्योरिटी व अनलॉकिंग साठी Jianguo Pro 3 इन-डिस्प्ले टेक्नॉलॉजी सह येतो.

Jianguo Pro 3 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो Smartisan OS 3.0 सह चालतो. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये क्वालकॉमचा सर्वात पावरफुल आणि लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस आहे. चीनी बाजारात हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 256 जीबी मेमरी आणि सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

क्वॉड कॅमेऱ्याची ताकद

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nut Pro 3 / Jianguo Pro 3 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.75 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा Sony IMX586 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. सोबत फोन 13 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड सेंसर, 8 मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेंस आणि 5 मेगापिक्सलच्या सुपर मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Jianguo Pro 3 / Nut Pro 3 मध्ये पावर बॅकअप साठी 18वॉट फास्ट चार्जिंग फीचर असलेली 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी क्विक चार्ज 4 टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करते. खास बाब अशी कि या फोन वर स्क्रीन अनलॉक न करता TikTok उघडून वापरतफ येईल. चीन मध्ये TikTok ला Duoyin म्हटले जाते. किंमतीबद्दल बोलायचे तर फोनच्या किंमतीची सुरवात 2899 युआन म्हणजे 29,000 रुपयांपासून होईल.

The post सादर झाला TikTok वाल्यांचा स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स बघून सांगा विकत घ्याल का हा मोबाईल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tiktok-bytedance-smartisan-jianguo-nut-pro-3-smartphone-launched-12gb-ram-quad-rear-camera-launched-specifications-price/feed/ 0