SmartphoneVirus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 25 Mar 2020 14:45:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 CoronaVirus मुळे स्मार्टफोन इंडस्ट्रीला धक्का, Samsung, Vivo, Xiaomi आणि इतर कंपन्यांची विक्री घटली https://www.91mobiles.com/marathi/coronavirus-effect-smartphone-company-sales-down-oppo-vivo-samsung-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/coronavirus-effect-smartphone-company-sales-down-oppo-vivo-samsung-smartphone/#respond Wed, 25 Mar 2020 14:45:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6900 COVID-19 संक्रमणामुळे फेब्रुवारी मध्ये स्मार्टफोन शिपमेंट्स मध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.

The post CoronaVirus मुळे स्मार्टफोन इंडस्ट्रीला धक्का, Samsung, Vivo, Xiaomi आणि इतर कंपन्यांची विक्री घटली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीन मध्ये सुरु झालेल्या CoronaVirus ने सध्या संपूर्ण जगाला प्रभावित केले आहे. कोरोना वायरसचा परिणाम सूर्य इंडस्ट्रीज सोबतच स्मार्टफोन इंडस्ट्री वर दिसत आहे. COVID-19 संक्रमणामुळे फेब्रुवारी मध्ये स्मार्टफोन शिपमेंट्स मध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.

38 टक्के घसरण झाली

समोर आलेल्या एका रिपोर्ट नुसार गेल्यावर्षी फेब्रुवारी मध्ये स्मार्टफोन मार्केटच्या परफॉर्मेंसच्या तुलनेत यावर्षी स्मार्टफोन्सची विक्री खूप कमी झाली आहे आणि याचे कारण कोरोना वायरस असल्याचे बोलले जात आहे. रिपोर्टनुसार ग्लोबल शिपमेंट फेब्रुवारी मध्ये 6.1 कोटी यूनिट्स होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत विक्री मध्ये 38 टक्क्यांची कमतरता दिसली आहे.

फेब्रुवारी 2019 बद्दल बोलायचे तर 9.9 कोटी स्मार्टफोन्स विकले गेले होते. स्मार्टफोन मार्केट मधील या स्थितीला COVID-19 जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. या वायरसमुळे स्मार्टफोन कंपन्या पण नवीन डिवाइस लॉन्च इवेंट्स करण्याऐवजी ऑनलाइन लॉन्च करत आहेत.

स्मार्टफोन्सची सेल डेट पुढे ढकलण्यात आली

याव्यतिरिक्त कंपन्यांनी आपल्या फोन्सची सेल डेटस पुढे ढकलल्या आहेत. यात शाओमी आणि रियलमी सारख्या कंपन्यांचा पण समावेश आहे. तसेच वीवोने भारतात लॉन्च होणाऱ्या वीवो वी19 चा लॉन्च रद्द केला आहे. हा लॉन्च 26 मार्चला भारतात ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर होणार होता.

2019 होता चांगला

जानेवारी मध्ये चीन मध्ये स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंग बंद करण्यात आली होती. याचा परिणाम मोठ्या कंपन्यांच्या सप्लाई चेन वर झाला होता. ग्लोबल मार्केट मध्ये ऍप्पल आणि शाओमी सारख्या कंपन्या 2019 च्या शेवटपर्यंत चांगल्या परफॉर्म करत होत्या, 2020 च्या सुरवातीला त्याच्या विक्री वर पण परिणाम होऊ लागला आहे.

भारतात बंद झाले मान्यफॅक्चरिंग प्लांट

भारतात पण अनेक कंपन्यांनी आपले मान्यफॅक्चरिंग प्लांट बंद केले आहेत. साउथ कोरियन टेक कंपनी सॅमसंगने आपल्या नोयडा मधील सर्वात मोठा प्लांट काही दिवस शट डाउन केला आहे.

भारत झाला लॉकडाउन

सॅमसंग व्यतिरिक्त भारतात ओप्पो, वीवो आणि एलजी चे पण प्लांट आहेत, जे कंपन्यांनी काही दिवसांसाठी बंद केले आहेत. दुसरीकडे सरकारने आज म्हणजे 25 मार्च पासून 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. हा लॉकडाउन संपूर्ण देशात लागू झाला आहे.

The post CoronaVirus मुळे स्मार्टफोन इंडस्ट्रीला धक्का, Samsung, Vivo, Xiaomi आणि इतर कंपन्यांची विक्री घटली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coronavirus-effect-smartphone-company-sales-down-oppo-vivo-samsung-smartphone/feed/ 0