Snapdragon 865Xiaomi - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Feb 2020 14:57:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि 4,700mAh बॅटरी सह येईल Redmi K30 Pro, समोर आली माहिती https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30-pro-come-with-pop-up-selfie-camera-and-oled-display/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30-pro-come-with-pop-up-selfie-camera-and-oled-display/#respond Thu, 06 Feb 2020 14:57:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6533 चीनी टिपस्टर Digital Chat Station ने अशी माहिती दिली आहे कि Redmi K30 Pro मध्ये पावर बॅकअपसाठी 4,700mAh ची बॅटरी दिली जाईल.

The post पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि 4,700mAh बॅटरी सह येईल Redmi K30 Pro, समोर आली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये आपल्या घरच्या मार्केट मध्ये Redmi K30 स्मार्टफोन सादर केला होता. पण तेव्हा कंपनीने डिवाइसचा प्रो वेरिएंट सादर केला नव्हता. अनेक दिवसांपासून अफवा समोर येत आहे कि कंपनी Redmi K30 Pro यावर्षी मार्च मध्ये सादर करेल. तसेच डिवाइस बाबत लीक्स पण येत आहेत. आता रेडमी के30 प्रो ची नवीन माहिती समोर आली आहे. चीनी माइक्रोब्लागिंग वेबसाइट वर समोर आली आहे.

चीनी टिपस्टर Digital Chat Station ने अशी माहिती दिली आहे कि Redmi K30 Pro मध्ये पावर बॅकअपसाठी 4,700mAh ची बॅटरी दिली जाईल. या आधी कंपनीने रेडमी के20 प्रो मध्ये 4,000mAh ची बॅटरी दिली होती. तसेच रेडमी के30 प्रो 33 वॉट फास्ट चार्जिंग सह येईल. तसेच टिप्सटरने माहिती दिली आहे कि फोन कर्व्ड स्क्रीन डिस्प्ले सह येईल.

लीकनुसार Redmi K30 मध्ये एलसीडी पॅनलच्या जागी OLED डिस्प्ले असेल. तसेच फोन मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. तसेच काही दिवसांपूर्वी शाओमी रेडमी के30 प्रो गीकबेंच वर क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल आणि एडवांस चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 सह दिसला होता.

विशेष म्हणजे रेडमी के30 प्रो शाओमीचा पहिला फोन असू शकतो जो या ताकदवान चिपसेट वर लॉन्च होईल. तसेच या फोन मध्ये एंडरॉयडचा नवीन ओएस एंडरॉयड 10 मिळेल. गीकबेंच वर Redmi K30 Pro 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह दिसला आहे जो 8 जीबी च्या दमदार रॅम सह येईल. तसेच स्कोरिंग बद्दल बोलायचे तर रेडमी के30 प्रो ला सिंगल-कोर मध्ये 903 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये 3362 स्कोर मिळाला आहे.

रेडमी के30

शाओमी रेडमी के30 पाहता हा डिवाइस M2001G7AI मॉडेल नंबर सह ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड वर सर्टिफाइड केला गेला आहे. Redmi K30 दोनदा बीआईएस वर लिस्ट झाला आहे. डिसेंबर मध्ये लिस्ट झालेला फोन Redmi K30 चा 4G मॉडेल होता तर 9 जानेवारीला लिस्ट झालेला फोन Redmi K30 चा 5G मॉडेल असल्याचे बोलले जात आहे. भारतात अजूनही 5G सर्विस अधिकृतपणे लॉन्च करण्यात आलेली नाही, अजूनही टेस्टिंग स्टेज वर आहे. पण जर Xiaomi Redmi K30 5G भारतात लॉन्च झाला तर हा भारतातील पहिला 5जी स्मार्टफोन बनेल.

सोर्स

शाओमी रेडमी के30 प्रो वीडियो

The post पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि 4,700mAh बॅटरी सह येईल Redmi K30 Pro, समोर आली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30-pro-come-with-pop-up-selfie-camera-and-oled-display/feed/ 0