Swadeshi Samriddhi Sim Card - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 29 May 2018 10:43:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आला आहे पतंजली सिम कार्ड, बाबा रामदेव देत आहेत भरपूर डाटा व वॉयस कॉल सह अनेक फायदे https://www.91mobiles.com/marathi/patanjali-bsnl-plan-2gb-data-and-unlimited-voice-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/patanjali-bsnl-plan-2gb-data-and-unlimited-voice-in-marathi/#respond Tue, 29 May 2018 10:43:51 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=676 ज्या ग्राहकांना जास्त वॅलिडिटी चे प्लान्स हवे आहेत त्यांच्यासाठी पण 792 रुपये आणि 1584 रुपयांचे प्लान पण सादर करण्यात आले आहेत

The post आला आहे पतंजली सिम कार्ड, बाबा रामदेव देत आहेत भरपूर डाटा व वॉयस कॉल सह अनेक फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशातील टेलीकॉम इं​डस्ट्री ची स्वरूप बदलणारी रिलायंस जियो आज देशातील मोठ्या हिस्स्यावर राज्य करत आहे. जियो आल्यामुळे अन्य टेलीकॉम कंपन्यांनी पण आपल्या टॅरिफ प्लान्स बदल केले आणि आज खुप कमी किंमतीत भरपूर डाटा सह फ्री वॉयस कॉल देत आहेत. टेलीकॉम कंपन्यांच्या या शर्यतीत आज अजून एक नाव जोडले गेले आहे. हे नाव आहे भारताचे योग गुरु बाबा रामदेव चे. तमाम देशी विदेशी कंपन्यांमध्ये बाबा रामदेव ने पण आपल्या पतंजली ब्रँड सह टेलीकॉम बाजारात एंट्री घेतली आहे.

पतंजली योग गुरु बाबा रामदेव ने ‘स्वदेशी समृद्धी सिम कार्ड्स’ ची घोषणा केली आहे. पतंजली चे नाव जगभर केल्या नंतर बाबा रामदेव चा हा नवीन सिम बाजारात येणार आहे आणि आपल्या या नवीन ब्रांड ची सुरवात बाबा रामदेव ने सरकारी कंपनी भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) सोबत केली आहे. ​प​तंजली ने बीएसएनएल सह पार्टनरशिप करून स्वदेशी समृद्धी सिम कार्ड सादर केले आहे.

बाबा रामदेव ने आपले सिम बीएसएनएल पतंजली प्लान अंतर्गत सादर केले आहेत. हे सिम टेलीकॉम सेवा सह अनेक सुविधा पण देतात. स्वदेशी समृद्धी सिम कार्ड्स विकत घेणार्‍या ग्राहकांना 5 लाख रुपयांचा जीवन विमा आणि 2.5 लाख रुपयांचा स्वास्थ्य विमा कवर पण दिला जाईल. तसेच पतंजली सिम वापरणाऱ्या ग्राहकांना पतंजली ब्रँड चे कोणतेही सामान विकत घेताना 10 टक्क्यांची अतिरिक्त सूट पण मिळेल.

पतंजली च्या या नव्या सिम ला बीएसएनएल च्या 144 रुपयांच्या प्लान सह सादर करण्यात आले आहे ज्याला बीएसएनएल पतंजली प्लान असे नाव देण्यात आले आहे. हा प्लान 30 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. यात यूजर्सना 2जीबी इंटरनेट डाटा मिळेल. तसेच संपूर्ण देशात अनलिमिटेड वॉयस कॉल मिळतील. तसेच प्लान मध्ये 100 एसएमएस पण देण्यात आले आहेत.

ज्या ग्राहकांना जास्त वॅलिडिटी चे प्लान्स हवे आहेत त्यांच्यासाठी पण 792 रुपये आणि 1584 रुपयांचे प्लान पण सादर करण्यात आले आहेत जे क्रमश: 180 दिवसांच्या तसेच 365 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतात. ।

विशेष म्हणजे सध्या पतंजली आणि बीएसएनएल ची ही नवीन सिम सेवा फक्त पतंजली च्या कर्मचारी आणि इतर अधिकार्‍यांना देण्यात आली आहे जी आगमी काही दिवसांमध्ये सामन्य जनतेसाठी बाजारात येईल.

The post आला आहे पतंजली सिम कार्ड, बाबा रामदेव देत आहेत भरपूर डाटा व वॉयस कॉल सह अनेक फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/patanjali-bsnl-plan-2gb-data-and-unlimited-voice-in-marathi/feed/ 0