Tech In Marathi - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 12 Jun 2018 12:22:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 च्या लॉन्च डेट चा झाला खुलासा, जाणून घ्या कधी समोर येईल हा सर्वात ताकदवान स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-9-will-launch-in-august-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-9-will-launch-in-august-in-marathi/#respond Tue, 12 Jun 2018 06:41:24 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=866 गॅलेक्सी नोट 9 दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो

The post सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 च्या लॉन्च डेट चा झाला खुलासा, जाणून घ्या कधी समोर येईल हा सर्वात ताकदवान स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 बद्दल काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्स ने एक्सक्लूसिव रेंडर ईमेज आणि 360डिग्री वीडियो शेयर केला होता. या वीडियो मुळे सॅमसंग च्या आगामी फ्लॅगशिप फोन च्या डिजाईन आणि लुक ची माहिती मिळाली होती. आता गॅलेक्सी नोट 9 च्या लॉन्च बद्दल महत्वपूर्ण बातमी आली आहे. एका रिपोर्ट मध्ये खुलासा करण्यात आला आहे की सॅमसंग आपला हा नेक्स्ट हाईएंड डिवाईस ऑगस्ट महिन्यात येणार आहे आणि कंपनी न्यूयार्क सिटी मध्ये ईवेंट आयोजित करून गॅलेक्सी नोट 9 जगासमोर ठेवेल.

मी​डिया रिपोर्ट मधून माहिती मिळाली आहे की सॅमसंग ऑगस्ट महिन्यात न्यूयार्क सिटी मध्ये एका मोठ्या ईवेंट चे आयोजन करण्याची तयारी करत आहे आणि या ईवेंट च्या मंचावरून कंपनी चा आगामी हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस गॅलेक्सी नोट 9 अंर्तराष्ट्रीय टेक बाजारात सादर केला जाईल. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की 2 तारखेला किंवा 9 ऑगस्ट ला सॅमसंग या ईवेंट आयोजन करणार आहे. या माहितीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी कंपनी च्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक नुसार हा डिवाईस 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या क्यूएचडी+ डिसप्ले सह सादर केला जाऊ शकतो. 161.9 x 76.3एमएम डायमेंशन सह या फोन ची जाडी 8.8एमएम असू शकते तसेच फोन 6.3-इंचाच्या स्क्रीन सह सादर केला जाईल. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 बद्दल बोलले जात आहे की हा फोन वेगवेगळ्या बाजारांमध्ये एक्सनॉस 9810 किंवा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल.

गॅलेक्सी नोट 9 दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो ज्यात 8जीबी तसेच 6जीबी रॅम आॅप्शन उपलब्ध होतील. तसेच फोन मध्ये 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते. पावर बॅकअप साठी गॅलेक्सी नोट 9 मध्ये 3,850एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. गॅलेक्सी नोट 9 च्या लॉन्च पर्यंत या फोन बद्दल इतर बातम्या पण येत राहतील ज्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.

The post सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 च्या लॉन्च डेट चा झाला खुलासा, जाणून घ्या कधी समोर येईल हा सर्वात ताकदवान स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-9-will-launch-in-august-in-marathi/feed/ 0