Tech News In Marathi Telecom - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 14 Jun 2018 13:30:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ईद च्या निमित्ताने बीएसएनएल ची भेट, 786 रुपयांमध्ये 150 दिवसांपर्यंत रोज 2जीबी डाटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉल मोफत https://www.91mobiles.com/marathi/bsnl-eid-mubarak-pack-786-rs-plan-for-150-days-2gb-data-daily-unlimited-voice-call-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-eid-mubarak-pack-786-rs-plan-for-150-days-2gb-data-daily-unlimited-voice-call-in-marathi/#respond Thu, 14 Jun 2018 13:30:30 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=910 कंपनी ने हा प्लान संपूर्ण देशात रोलआउट केला आहे.

The post ईद च्या निमित्ताने बीएसएनएल ची भेट, 786 रुपयांमध्ये 150 दिवसांपर्यंत रोज 2जीबी डाटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉल मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम कंपन्या बाजारात चालू असलेल्या प्राइस वॉर मुळे जास्तीत जास्त यूजर्सना आकर्षित करू इच्छित आहे. कमी किंमतीत जास्त बेनिफिट देऊन प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नवीन नवीन प्लान काढले जातात. रमजान च्या निमित्ताने आपल्या यूजर्सना नवीन भेट देत सरकारी टेलीकॉम कंपनी भारतीय संचार ​निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने 786 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे. बीएसएनएल चा हा प्लान मोठया वॅलिडिटी वाल्या प्लान्स मध्ये चांगले फायदे देते.

बीएसएनएल ने 786 रुपयांचा ईद मुबारक पॅक प्रीपेड यूजर्स साठी सादर केला आहे. हा प्लान 150 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. बीएसएनएल आपल्या कस्टमर्सना या प्लान मध्ये रोज 2जीबी इंटरनेट डाटा देत आहे. रोज 2जीबी इंटरनेट डाटा च्या हिशोबाने ग्राहकांना 150 दिवसांमध्ये एकूण 300जीबी डाटा मिळेल. जास्त वॅलिडिटी मुळे बीएसएनएल चा हा प्लान ग्राहकांना भरपूर बेनिफिट देतो.

इंटरनेट डाटा सह या प्लान मध्ये रोज 100एसएमएस मिळतील. 150 दिवसांच्या हिशोबाने यूजर्सना एकूण 15,000 एसएमएस मिळतील ज्यांचा वापर लोकल व एसटीडी नंबर्स वर केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे लोकल व एसटीडी आॅननेटवर्क तसेच आॅफनेटवर्क वर बीएसएनएल अनलिमिटेड वॉयस कॉलिंग ची सुविधा देत आहे. हे वॉयस कॉल रोमिंग मध्ये पण पूर्णपणे फ्री असतील.

बीएसएनएल ने हा 786 रुपयांचा प्लान रमजान च्या निमित्ताने ईदी म्हणून सादर करण्यात आला आहे. हा प्लान मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. बीएसएनएल ग्राहक 26 जून पर्यंत या आॅफर चा लाभ घेऊ शकतील आणि या तारखेच्या आधी 786 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. कंपनी ने हा प्लान संपूर्ण देशात रोलआउट केला आहे.

The post ईद च्या निमित्ताने बीएसएनएल ची भेट, 786 रुपयांमध्ये 150 दिवसांपर्यंत रोज 2जीबी डाटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉल मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-eid-mubarak-pack-786-rs-plan-for-150-days-2gb-data-daily-unlimited-voice-call-in-marathi/feed/ 0