Tech News Marathi - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 08 Feb 2019 13:24:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह येईल 3 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी एम30, स्पेसिफिकेशन्स आले समोर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30-specification-image-leaked-5000mah-battery-6gb-ram-triple-rear-camera-in-display-fingerprint-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30-specification-image-leaked-5000mah-battery-6gb-ram-triple-rear-camera-in-display-fingerprint-in-marathi/#respond Fri, 08 Feb 2019 13:23:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3586 लीकनुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल

The post 6जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह येईल 3 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी एम30, स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने अलीकडेच भारतीय बाजारात आपल्या गॅलेक्सी एम सीरीजची सुरवात करत गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 स्मार्टफोन लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन देशात सेल साठी उपलब्ध झाले आहेत तसेच आपल्या पहिल्या फ्लॅश सेल मध्ये हिट झाले आहेत. गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 संपूर्ण जगात फक्त भारतीय बाजारात सादर करण्यात आले आहेत जे येत्या काळात इतर देशांमध्ये एंट्री घेतील. आता याच सीरीजच्या अजून एका स्मार्टफोन गॅलेक्सी एम30 चे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एम30 आधीच चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे जिथे फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला होता. तसेच एका नव्या लीक मध्ये गॅलेक्सी एम30 चे फुल स्पेसि​फिकेशन्सची माहिती समोर आली आहे. गॅलेक्सी एम सीरीजच्या आधीच्या डिवाईसेज प्रमाणे हा स्मार्टफोन पण ‘वी’ शेप वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला जाईल. लीकनुसार गॅलेक्सी एम30 मध्ये 2220 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.38-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला जाईल जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड असेल.

लीकनुसार गॅलेक्सी एम30 कंपनी द्वारा 6जीबी रॅम सह सादर केला जाऊ शकतो. या फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते जी माइक्रोएसडी कार्ड द्वारे वाढवता येईल. बोलले जात आहे ​कि गॅलेक्सी एम30 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाईल तसेच 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या कोर्टेक्स ए73 तसेच 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या कोर्टेक्ट ए53 सह सॅमसंग एक्सनॉस 7904 चिपसेट वर चालेल. विशेष म्हणजे हाच चिपसेट सॅमसंग गॅलेक्सी एम20 मध्ये पण देण्यात आला आहे.

गॅलेक्सी एम30 चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. तसेच रियर कॅमेरा सेटअप मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा वाईड सेंसर तसेच एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळू शकतो. त्याचबरोबर सेल्फी साठी गॅलेक्सी एम30 मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

एक्सक्लूसिव : ओपो एफ11 प्रो 32-एमपी पॉप-अप सेल्फी आणि 48-एमपी डुअल रियर कॅमेऱ्यासह होईल लॉन्च

सॅमसंग गॅलेक्सी एम30 डुअल सिम फोन असेल जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करेल. फोनच्या लीक फोटो मध्ये फोनच्या डिस्प्ले वर फिंगरप्रिंट सेंसर दाखवण्यात आला आहे. बॅटरी बद्दल बोलायचे झाल्यास लीकनुसार गॅलेक्सी एम30 मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 5,000एमएएच ची पावरफुल बॅटरी दिली जाऊ शकते जी क्विक चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. सध्या गॅलेक्सी एम30 चे हे स्पेसिफिकेशन्स तोपर्यंत ठोस म्हणता येणार नाहीत जोपर्यंत सॅमसंग स्वतः फोनची घोषणा करत नाही.

The post 6जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह येईल 3 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी एम30, स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30-specification-image-leaked-5000mah-battery-6gb-ram-triple-rear-camera-in-display-fingerprint-in-marathi/feed/ 0