Tech Tips and Tricks - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 12 Jun 2023 03:56:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 PDF Files एडिट करण्याची सोपी पद्धत; दोन फाइल मर्जही करता येणार https://www.91mobiles.com/marathi/editing-pdf-files-is-easy-follow-these-steps/ https://www.91mobiles.com/marathi/editing-pdf-files-is-easy-follow-these-steps/#respond Mon, 12 Jun 2023 03:30:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20611 पीडीएफ फाइल्स (PDF Files) च्या माध्यमातून कोणतीही माहिती शेयर करणं सोपं आहे. परंतु या फाइल्स बाबत एक गोष्ट जास्त खटकते ती म्हणजे काही चूक असल्यास किंवा बदल करायचे असल्यास एडिट करण्याचा पर्याय सहज मिळत नाही. जर पीडीएफ फाइल एडिट करण्यासाठी तुम्ही अडोबी अ‍ॅक्रोबेट डीसी (Adobe Acrobat DC) वर पैसे खर्च करू इच्छित नसाल तर तुम्ही […]

The post PDF Files एडिट करण्याची सोपी पद्धत; दोन फाइल मर्जही करता येणार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पीडीएफ फाइल्स (PDF Files) च्या माध्यमातून कोणतीही माहिती शेयर करणं सोपं आहे. परंतु या फाइल्स बाबत एक गोष्ट जास्त खटकते ती म्हणजे काही चूक असल्यास किंवा बदल करायचे असल्यास एडिट करण्याचा पर्याय सहज मिळत नाही. जर पीडीएफ फाइल एडिट करण्यासाठी तुम्ही अडोबी अ‍ॅक्रोबेट डीसी (Adobe Acrobat DC) वर पैसे खर्च करू इच्छित नसाल तर तुम्ही काही फ्री टूल्सच्या मदतीनं देखील हे काम करू शकता. इथे सहज पीडीएफ फाइल्स (PDF Files) एडिट आणि मर्ज करता येतात.

PDF Files एडिट करण्यासाठी फॉलो करा या स्टेप

पीडीएफ फाइल्स एडिट करण्यासाठी कोणतंही सॉफ्टवेयर डाउनलोड करण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाइन देखील हे काम सहज करू शकता.

  • यासाठी https://www.pdfescape.com साइटची मदत घेता येईल. इथे तुम्हाला ज्या पीडीएफ फाइल्स एडिट करायच्या असतील त्या ड्रॅग अँड ड्रॉपच्या माध्यमातून किंवा फाइल सिलेक्ट करून अपलोड करू शकता.
  • काही सेकंदांच्या प्रॉसेसिंगनंतर फाइल (Files) एडिटसाठी उपलब्ध होईल. इथे डावीकडील पॅनलवर तुम्हाला एडिटिंग संबंधित टूल्स मिळतील, ज्यांच्या मदतीनं पीडीएफ फाइल्ससह टेक्स्ट (Text) जोडणे सोपं होईल. तसेच इथे तुम्हाला खाली व्हाइट बॉक्स देखील मिळेल, ज्याच्या मदतीनं पीडीएफ फाइल्सवर गोष्टी लपवता येतील. तुम्ही पीडीएफ फाइल्ससह कमेंट्स देखील जोडू शकता.
  • एकदा एडिटिंग पूर्ण झाली की पुन्हा सेव्ह अँड डाउनलोड (Save And Download) बटनवर क्लिक करा. फाइल तुमच्या डिवाइसवर लोकली सेव्ह (Local save) देखील करता येईल.
  • PDF Files अशा करा मर्ज

    वेगवेगळ्या PDF Files एकत्र मर्ज करणे देखील सोपं आहे.

  • सर्वप्रथम https://smallpdf.com साइट ओपन करा.
  • ही फ्री आणि प्रो व्हर्जनसह येते.
  • या साइटवर पीडीएफ फाइल्स (PDF Files) अपलोड करून मर्ज करता येतात.
  • जर तुमच्याकडे बऱ्याच पीडीएफ फाइल्स असतील आणि सर्व फाइल्स एकत्र मर्ज करायच्या असतील तर ते देखील ही वेबसाइट करू शकते.
  • इथे तुम्हाला पीडीएफ फाइल कंवर्ट करण्याची सुविधा देखील मिळते.
  • The post PDF Files एडिट करण्याची सोपी पद्धत; दोन फाइल मर्जही करता येणार first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/editing-pdf-files-is-easy-follow-these-steps/feed/ 0
    या सोप्प्या टिप्स वापरून ऑनलाइन चेक करा पीएफ बॅलेंस https://www.91mobiles.com/marathi/how-to-check-pf-balance-online-in-simple-steps-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-check-pf-balance-online-in-simple-steps-in-marathi/#respond Thu, 03 Jan 2019 12:19:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3281 पीएफ अकाउंट मध्ये किती पैसे जमा आहेत हे नियमितपणे बघणे केव्हाही चांगलेच.

    The post या सोप्प्या टिप्स वापरून ऑनलाइन चेक करा पीएफ बॅलेंस first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    जर तुम्हीही जॉब करत असाल आणि तुमची कंपनी पगारातून पीएफ (प्रोविडेंट फंड) कापत असेल तर त्याची माहिती ठेवणे आता खूप सोप्पे झाले आहे. आता तुम्ही घर बसल्या ऑनलाइन यावर नजर ठेऊ शकता कि तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये किती पैसे जमा झाले आहेत. पीएफ अकाउंट मध्ये जमा पैसा रिटायरमेंट च्या आधी न काढलेले बरे. पीएफ अकाउंट मध्ये किती पैसे जमा आहेत हे नियमितपणे बघणे केव्हाही चांगलेच. ऑनलाइन याबद्दल माहिती घेता येते. यासाठी तुम्हला काही स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

    ऑनलाइन अशाप्रकारे चेक करा प्रोविडेंट फंड बॅलेंस

    -तुमच्या प्रोविडेंट फंड मध्ये किती पैसा जमा झाले आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी ईपीएफओ च्या वेबसाइट वर लॉग इन करावे लागेल.
    -वेबसाइट वर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आधी रजिस्टर (रजिस्टर केले नसेल तर) करावे लागेल.

    -यासाठी तुमचे नाव, मेल आईडी, फोन नंबर आणि यूएएन नंबर हवा.

    -एकदा रजिस्टर केल्यानंतर तुमच्या फोनवर एक ओटीपी (वन टाइम पासवर्ड) येईल, तो सबमिट करा.
    -यानंतर तुमच्या फोन नंबरवर पीएफ अकाउंट चा पासवर्ड येईल.
    -पासवर्ड आल्यानंतर तुम्ही यूएएन नंबरने लॉग इन करू शकता. 

    -साइट वर रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही खात्याचे पासबुक बघू शकता आणि हवा असल्यास तो डाउनलोड पण करू शकता. तुमच्याकडून आणि कंपनीकडून किती पैसे पीएफ अकाउंट मध्ये ट्रांसफर केले जात आहेत हे देखील तुम्ही बघू शकता. 
    लक्षात असू दे कि पासबुक अपडेट व्हायला काही दिवस लागू शकतात. त्यानंतर तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंटचा बॅलेंस चेक करू शकाल.
    तुम्ही तुमचा यूएएन म्हणजे यूनिवर्सल अकाउंट नंबर तुमच्या ऑफिसच्या अकाउंट डिपार्टमेंट किंवा तुमच्या सॅलरी स्लीप वरून घेऊ शकता. ईपीएफओ ने साल 2014 मध्ये यूएएन ची सुरवात केली होती. यूएएन च्या माध्यमातून पीएफ संबंधित सर्व माहिती मिळवू शकता तेही अगदी सहज.

    The post या सोप्प्या टिप्स वापरून ऑनलाइन चेक करा पीएफ बॅलेंस first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/how-to-check-pf-balance-online-in-simple-steps-in-marathi/feed/ 0