Tecno Camon 16 Premier - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 13 Jan 2021 12:43:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8GB रॅम, 48MP डुअल सेल्फी आणि 64MP क्चॉड रियर कॅमेर्‍यासह भारतात लाॅन्च झाला हा शानदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-16-premier-8gb-ram-48mp-dual-selfie-64mp-rear-camera-launch-in-india-price-rs-16999/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-16-premier-8gb-ram-48mp-dual-selfie-64mp-rear-camera-launch-in-india-price-rs-16999/#respond Wed, 13 Jan 2021 12:43:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9654 Tecno Camon 16 Premier चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20.5ः9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.85 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो.

The post 8GB रॅम, 48MP डुअल सेल्फी आणि 64MP क्चॉड रियर कॅमेर्‍यासह भारतात लाॅन्च झाला हा शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Tecno ने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवा स्मार्टफोन Tecno Camon 16 Premier लाॅन्च केला आहे. हा स्मार्टफोन स्टाईलिश लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह 6 कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. टेक्नो कॅमोन 16 प्रीमियर कंपनीने 16,999 रुपयांमध्ये लाॅन्च केला गेला आहे जो 16 जानेवारी पासून शाॅपिंग साइट फ्लिपकार्ट वर आणि येत्या काही दिवसांत आफलाईन रिटेल स्टोर्स वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

कॅमेर्‍याची कमाल

सर्वप्रथम फोनचा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता टेक्नो कॅमोन 16 प्रीमियर क्वाॅड रियर कॅमेरा आणि डुअल फ्रंट कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. सेल्फी आणि वीडियो काॅलिंगसाठी फोनच्या फ्रंट पॅनल वर दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. या सेटअप मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर 105 डिग्री क्षमता असलेला 8 मेगापिक्सलची सेकेंडरी अल्ट्रा वाइड एंगल लेंस आहे.

Camon 16 Premier च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX686 सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची सुपर वाइड एंगल लेंस, 2 मेगापिक्सल डेफ्थ सेंसर आणि अजून एक 2 मेगापिक्सल लेंस आहे. फोनचा कॅमेरा 30fps 4K वीडियो आणि 960fps सुपर स्लो-मोशन वीडियो रिकाॅर्ड करू शकतो.

स्पेसिफिकेशन्स

Tecno Camon 16 Premier चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20.5ः9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.85 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. टेक्नोचा हा नवा फोन एंडराॅयड 10 ओएस वर लाॅन्च झाला आहे जो 2.5 गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हीलियो जी90टी चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली जी76 जीपीयू देण्यात आला आहे.

कॅमोन 16 प्रीमियर भारतात 8 जीबी रॅम वर लाॅन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी Tecno Camon 16 Premier 18वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी असलेल्या 4,500एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन Glacier Silver कलर मध्ये विकत घेता येईल.

The post 8GB रॅम, 48MP डुअल सेल्फी आणि 64MP क्चॉड रियर कॅमेर्‍यासह भारतात लाॅन्च झाला हा शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-16-premier-8gb-ram-48mp-dual-selfie-64mp-rear-camera-launch-in-india-price-rs-16999/feed/ 0
कमी किंमतीत 6 कॅमेरे, 8GB रॅम आणि 4500mAh बॅटरी सह आला हा फोन, Xiaomi-Realme ला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-16-premier-launched-with-48mp-dual-selfie-cameras-know-full-specification-and-price/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-16-premier-launched-with-48mp-dual-selfie-cameras-know-full-specification-and-price/#respond Fri, 04 Sep 2020 11:14:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7990 Tecno Camon 16 Premier मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फी कॅमेऱ्यासाठी फ्रंटला दोन सेंसर आहेत.

The post कमी किंमतीत 6 कॅमेरे, 8GB रॅम आणि 4500mAh बॅटरी सह आला हा फोन, Xiaomi-Realme ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Tecno ने टेक मंचावर अखेरीस आपला बहूप्रतिक्षीत स्मार्टफोन Camon 16 Premier लॉन्च केला आहे. स्मार्टफोनची यूएसपी एक क्वाड-कॅमेरा सेटअप आणि 90 हर्ट्ज डिस्प्ले असे फीचर्स आहेत. इतकेच नव्हे तर हँडसेट एका टॉप-एंड गेमिंग प्रोसेसर सह येतो जो गेमिंगचा चांगला अनुभव देतो. याआधी ट्रांजिशन इंडियाने या आठवड्यात आपला नवीन आणि स्वस्त हँडसेट Tecno Spark Go 2020 लॉन्च केला होता. हा फोन भारतात सादर कधी उपलब्ध होईल याची माहिती देण्यात आलेली नाही.

डिजाइन

Camon 16 Premier कंपनीने खास डिजाइन सह सादर केला आहे. फोनच्या फ्रंटला पिल-शेप्ड डुअल सेल्फी होल-पंच डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या टॉप लेफ्टला होल-पंच आहे, ज्यात दोन सेल्फी कॅमेरा सेंसर एकमेकांपासून थोड्या अंतरावर आहेत. तसेच फोनच्या फ्रंटला टॉप आणि बॉटमला बारीक बेजल्स दिसतील. पण डाव्या आणि उवा बाजूला कमी बेजल्स आहेत. डिवाइसच्या बॉटमला टाइप-सी पोर्ट, स्पीकर ग्रिल आणि माइकला जागा देण्यात आली आहे. रियर पॅनल वर या फोन मध्ये फ्लॅगशिप लेवल चौकोनी क्वाड कॅमेरा मध्यभागी दिला आहे. फोनच्या उजिवाकडे वॉल्यूम रॉकर बटन आहे, ज्याच्या खाली पावर ऑन-ऑफ बटन पण आहे.

आहेत 6 कॅमेरे

कॅमेऱ्याबाबत बोलायचे तर यात फ्रंटला दोन आणि मागे चार सेंसर आहेत. मागे एक 119 डिग्री एंटी-डिस्ट्रोशन सुपर वाइड अँगल 8-मेगापिक्सल कॅमेरा आणि मॅक्रो लेंस सह 2-मेगापिक्सल डेप्थ सेंसर, 64-मेगापिक्सल सोनी IMX686 प्राइमरी कॅमेरा सेंसर, 2-मेगापिक्सल 1080p अल्ट्रा नाइट पोर्टेट लेंस सह LED आहे. Tecno Camon 16 Premier मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फी कॅमेऱ्यासाठी फ्रंटला दोन सेंसर आहेत. यातील एक 48-मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलची 105 डीग्री अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस आणि डुअल फ्रंंट फ्लॅश आहे.

स्पेसिफिकेशन्स

Techno Camon 16 Premier मध्ये 6.9-इंचाचा FHD dual डॉट-इन डिस्प्ले आहे जो 90Hz रिफ्रेश रेट, 20:5:9 आस्पेक्ट रेश्यो आणि HDR10+ ला सपोर्ट करते. तसेच फोन मध्ये मीडियाटेक MediaTek G90T चिपसेट सह Cortex-A76 CPU आणि माली G76 जीपीयू आहे. स्मार्टफोन मध्ये 8GB RAM आणि 128GB ची स्टोरेज देण्यात आली आहे.

हार्डवेयर सह हीट कमी करण्यासाठी फोन मध्ये नवीन टेक्नॉलॉजी पण देण्यात आली आहे. जी 2 डिग्री पर्यंत फोन थंड करू शकते. हँडसेट मध्ये पवार बॅकअपसाठी 4,500mAh ची नॉन-रिमूवेबल बॅटरी 33W फ्लॅश चार्जिंग सपोर्ट सह आहे. कंपनीचा दावा आहे कि फ्लॅश चार्जर 30 मिनिटांत 70 टक्के चार्ज करू शकतो.

कनेक्टिविटी बद्दल बोलायचे तर Tecno Camon 16 प्रीमियर मध्ये GSM, WCDMA, LTE (FDD, TDD), GPRS, HSPA +, FULL EDGE, GPS, WIFI, FM, BT, आणि OTG चा समावेश आहे. स्मार्टफोन एंड्रॉइड 10 वर HiOSसह चालतो. हा स्मार्टफोन ग्लेशियर सिल्वर, गोमेद ब्लॅक, आइस क्रिस्टल ब्लू, मिस्टी ग्रे, क्लाउड व्हाइट आणि प्यूरिस्ट ब्लू रंगात येतो. आतापर्यंत स्मार्टफोनची किंमत आणि उपलब्धताची घोषणा करण्यात आलेली नाही.

The post कमी किंमतीत 6 कॅमेरे, 8GB रॅम आणि 4500mAh बॅटरी सह आला हा फोन, Xiaomi-Realme ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-16-premier-launched-with-48mp-dual-selfie-cameras-know-full-specification-and-price/feed/ 0