Tecno Camon i Click 2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 03 Oct 2018 12:12:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4जीबी रॅम आणि 24-एमपी सेल्फी कॅमेरा सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले वाला टेक्नो कॅमोन आई क्लिक 2, किंमत फक्त 13,499 रुपये https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-i-click-2-launched-feature-specifications-and-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-i-click-2-launched-feature-specifications-and-price-in-marathi/#respond Wed, 03 Oct 2018 12:12:13 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2350 टेक्नो ने आपला नवीन फोन कॅमोन आई क्लिक2 नावाने लॉन्च केला आहे जो 13,499 रुपयांमध्ये आॅनलाईन प्लॅटफार्म सोबतच आॅफलाईन ​रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

The post 4जीबी रॅम आणि 24-एमपी सेल्फी कॅमेरा सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले वाला टेक्नो कॅमोन आई क्लिक 2, किंमत फक्त 13,499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने गेल्या महिन्यात एक्सक्लूसिव बातमी दिली होती की कंपनी टेक कंपनी टेक्नो 3 ऑक्टोबरला इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये नवीन फोन आणेल ज्यात 24-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असेल. त्यानुसार आज कंपनी ने आपला हा स्मार्टफोन समोर आणला आहे. टेक्नो ने आपला नवीन फोन कॅमोन आई क्लिक2 नावाने लॉन्च केला आहे जो 13,499 रुपयांमध्ये आॅनलाईन प्लॅटफार्म सोबतच आॅफलाईन ​रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

टेक्नो चा दावा आहे की कॅमोन आई क्लिक 2 एक अनोखा फोन आहे जो या किंमतीत 24-मेगापिक्सलच्या एआई फ्रंट कॅमेरा तसेच नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. कॅमोन आई क्लिक 2 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या सुपर फुलव्यू नॉच​ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 1500 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यात 3डी बॅक कवर सह ग्लास फिनिश आहे.

कॅमोन आई क्लिक 2 आईओएस 4.1 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर करण्यात आला आहे जो 2.0 गीगाहर्ट्ज़ आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलियो पी22 चिपसेट वर चालतो. कंपनी ने फोन 4जीबी रॅम सह सादर केला आहे. फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता कॅमोन आई क्लिक 2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात क्वॉड फ्लॅश लाईट आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 24-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. कंपनी ने सेल्फी कॅमेर्‍या सोबत पण फ्लॅश लाईट दिली आहे.

टेक्नो कॅमोन आई क्लिक 2 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. 4जी एलटीई व डुअल सिम सह हा फोन बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. तसेच पावर बॅकअप साठी कॅमोन आई क्लिक 2 मध्ये 3750एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. टेक्नो चा हा नवीन फोन 13,499 रुपयांमध्ये अॅक्वा ब्लू, मीडनाईट ब्लॅक तसेच हवाई ब्लू कलर मध्ये विकत घेता येईल.

The post 4जीबी रॅम आणि 24-एमपी सेल्फी कॅमेरा सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले वाला टेक्नो कॅमोन आई क्लिक 2, किंमत फक्त 13,499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-i-click-2-launched-feature-specifications-and-price-in-marathi/feed/ 0