Tecno Camon iSky 3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 18 Mar 2019 14:09:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लेटेस्ट एंडरॉयड आणि डुअल कॅमेऱ्यासह लॉन्च झाला टेक्नो कॅमोन आय स्काय 3 https://www.91mobiles.com/marathi/tecno-has-launched-camon-isky-3-in-india-price-features-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-has-launched-camon-isky-3-in-india-price-features-specifications/#respond Mon, 18 Mar 2019 14:09:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3886 कॅमोन आय स्काय 3 मीडनाईट ब्लॅक, ऍक्वा ब्लू, शॅम्पेन गोल्ड आणि नेबुला ब्लॅक कलर मध्ये 8,599 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post लेटेस्ट एंडरॉयड आणि डुअल कॅमेऱ्यासह लॉन्च झाला टेक्नो कॅमोन आय स्काय 3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी टेक्नो भारतात लो बजेट सेग्मेंट वाले स्मार्टफोन लॉन्च करते जे कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन्स देतात. टेक्नो ने इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये आपली स्मार्टफोन्स शृंखला वाढवत आज अजून एक नवीन डिवाईस कॅमोन आय स्काय 3 लॉन्च केला आहे. कॅमोन आय स्काय 3 कंपनी द्वारा 8,599 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो आनलाईन व आफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध होईल.

टेक्नो कॅमोन आय स्काय 3 चा लुक
कॅमोन आय स्काय 3 कंपनी आयफोन 10 सारख्या रेग्यूलर नॉच सह सादर केला गेला आहे. फोनच्या तिन्ही कडा नॅरो बेजल वाल्या आहेत तसेच खालच्या बाजूला बॉडी पार्ट आहे. डिस्प्ले वरील नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा व अन्य सेंसर देण्यात आले आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो फ्लॅश लाईट सह येतो. बॅक पॅनल वरच फिंगरप्रिंट सेंसर आहे. तसेच पावर बटण आणि वॉल्यूम रॉकर फोनच्या उजव्या पॅनल वर देण्यात आले आहेत.

टेक्नो कॅमोन आय स्काय 3 चे स्पेसिफिकेशन्स
कंपनी द्वारा कॅमोन आय स्काय 3 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे. हा फोन 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. कंपनीने हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9.0 पाई वर सादर केला गेला आहे जो हाईओएस 4.6 व्हर्जन सह येतो. तसेच प्रोसेसिंग साठी कॅमोन आय स्काय 3 मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेक हेलीयो ए22 चिपसेट देण्यात आला आहे.

कंपनीने कॅमोन आय स्काय 3 2जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला आहे. हा फोन 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवून 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता कॅमोन आय स्काय 3 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

टेक्नो कॅमोन आय स्काय 3 डुअल सिम फोन आहे जो डुअल 4जी वोएलटीई फीचरला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह पावर बॅकअप साठी 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कॅमोन आय स्काय 3 मीडनाईट ब्लॅक, ऍक्वा ब्लू, शॅम्पेन गोल्ड आणि नेबुला ब्लॅक कलर मध्ये 8,599 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post लेटेस्ट एंडरॉयड आणि डुअल कॅमेऱ्यासह लॉन्च झाला टेक्नो कॅमोन आय स्काय 3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-has-launched-camon-isky-3-in-india-price-features-specifications/feed/ 0