Tecno Camon - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 04 Feb 2020 14:22:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Exclusive : Tecno घेऊन येत आहे 48एमपी क्वॉड रियर कॅमेरा असलेला स्वस्त स्मार्टफोन, किंमत असेल खूप कमी https://www.91mobiles.com/marathi/new-tecno-camon-phone-with-48mp-quad-rear-camera-to-launch-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/new-tecno-camon-phone-with-48mp-quad-rear-camera-to-launch-in-india/#respond Tue, 04 Feb 2020 14:22:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6502 फ्लॅश लाईटच्या खाली ‘Camon 48M AI Quad Cam’ लिहिण्यात आले आहे. हा टेक्स्ट पण सिद्ध करतो कि टेक्नोचा हा आगामी स्मार्टफोन 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल.

The post Exclusive : Tecno घेऊन येत आहे 48एमपी क्वॉड रियर कॅमेरा असलेला स्वस्त स्मार्टफोन, किंमत असेल खूप कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Tecno ने अलीकडेच भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्टफोन Tecno Spark Go Plus लॉन्च केला होता जो 6,299 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. या फोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच, 4000एमएएच बॅटरी आणि डुअल रियर कॅमेरा आहे. कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन घेऊन येणारी Tecno आता भारतात लवकरच आपला नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहे जो क्वॉड रियर कॅमेऱ्यासह येईल. 91मोबाईल्सला Tecno च्या या आगामी स्मार्टफोनचा एक्सक्लूसिव फोटो मिळाला आहे, ज्यात फोनचा बॅक पॅनल स्पष्ट दिसतो.

91मोबाईल्सला माहिती मिळाली आहे कि Tecno लवकरच भारतीय बाजारात आपला क्वॉड रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेऊन येणार आहे आणि या स्मार्टफोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा दिला जाईल. आम्हाला या फोनच्या नावाची माहिती मिळाली नाही पण इतके नक्की कि हा डिवाईस ‘Tecno Camon’ सीरीज अंतर्गत येईल. फोन बाजारात येण्याआधी आम्हाला या फोनचा फोटो पण मिळाला आहे ज्यावरून फोनच्या डिजाईनचा खुलासा पण झाला आहे.

असा असेल लुक

आम्हाला मिळलेल्या फोटो मध्ये फोनचा बॅक पॅनल दिसत आहे. फोनच्या रियर पॅनल वर उजिवाकडे कॅमेरा सेटअप आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये उजवीकडे चार कॅमेरा सेंसर आहेत. या कॅमेरा सेंसर्सच्या डावीकडे वर्टिकल शेप मध्ये क्वॉड एलईडी लाईट देण्यात आली आहे. फ्लॅश लाईटच्या खाली ‘Camon 48M AI Quad Cam’ लिहिण्यात आले आहे. हा टेक्स्ट पण सिद्ध करतो कि टेक्नोचा हा आगामी स्मार्टफोन 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल.

या आगामी Tecno Camon फोनच्या बॅक पॅनल वर मधोमध फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फोनच्या उजव्या साईड पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण पण स्पष्ट दिसत आहे. तसेच फोनच्या डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. विशेष म्हणजे Tecno ब्रँड भारतात आपला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन पण आणणार आहे. पण अजूनतरी समोर आलेला 48एमपी क्चॉड रियर कॅमेरा असलेला फोनच पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला डिवाईस असेल कि नाही याची खात्री झालेली नाही.

Tecno Camon 12 Air

Tecno Camon 12 Air या सीरीजचा लेटेस्ट फोन अशे जो पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने या डिस्प्लेला डॉट-इन डिस्प्लेचे नाव दिले आहे. Tecno Camon 12 Air मध्ये 720 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.55 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित असेल जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालेल. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये पावरवीआर जीई8320 जीपीयू आहे.

Tecno Camon 12 Air बद्दल सांगण्यात आले आहे कि हा डिवाईस भारतात 3 जीबी रॅम वर लॉन्च होईल. या फोन मध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 500 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Tecno Camon 12 Air एआई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल.

त्याचप्रमाणे रियर कॅमेरा सेटअप मध्ये 120डिग्री क्षमता असलेली 5 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळेल. सेल्फीसाठी Tecno Camon 12 Air मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच पावर बॅकअपसाठी Tecno Camon 12 Air मध्ये 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 9,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे.

The post Exclusive : Tecno घेऊन येत आहे 48एमपी क्वॉड रियर कॅमेरा असलेला स्वस्त स्मार्टफोन, किंमत असेल खूप कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/new-tecno-camon-phone-with-48mp-quad-rear-camera-to-launch-in-india/feed/ 0
4जीबी रॅम आणि 24-एमपी सेल्फी कॅमेरा सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले वाला टेक्नो कॅमोन आई क्लिक 2, किंमत फक्त 13,499 रुपये https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-i-click-2-launched-feature-specifications-and-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-i-click-2-launched-feature-specifications-and-price-in-marathi/#respond Wed, 03 Oct 2018 12:12:13 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2350 टेक्नो ने आपला नवीन फोन कॅमोन आई क्लिक2 नावाने लॉन्च केला आहे जो 13,499 रुपयांमध्ये आॅनलाईन प्लॅटफार्म सोबतच आॅफलाईन ​रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

The post 4जीबी रॅम आणि 24-एमपी सेल्फी कॅमेरा सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले वाला टेक्नो कॅमोन आई क्लिक 2, किंमत फक्त 13,499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने गेल्या महिन्यात एक्सक्लूसिव बातमी दिली होती की कंपनी टेक कंपनी टेक्नो 3 ऑक्टोबरला इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये नवीन फोन आणेल ज्यात 24-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असेल. त्यानुसार आज कंपनी ने आपला हा स्मार्टफोन समोर आणला आहे. टेक्नो ने आपला नवीन फोन कॅमोन आई क्लिक2 नावाने लॉन्च केला आहे जो 13,499 रुपयांमध्ये आॅनलाईन प्लॅटफार्म सोबतच आॅफलाईन ​रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

टेक्नो चा दावा आहे की कॅमोन आई क्लिक 2 एक अनोखा फोन आहे जो या किंमतीत 24-मेगापिक्सलच्या एआई फ्रंट कॅमेरा तसेच नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. कॅमोन आई क्लिक 2 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या सुपर फुलव्यू नॉच​ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 1500 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यात 3डी बॅक कवर सह ग्लास फिनिश आहे.

कॅमोन आई क्लिक 2 आईओएस 4.1 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर करण्यात आला आहे जो 2.0 गीगाहर्ट्ज़ आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलियो पी22 चिपसेट वर चालतो. कंपनी ने फोन 4जीबी रॅम सह सादर केला आहे. फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता कॅमोन आई क्लिक 2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात क्वॉड फ्लॅश लाईट आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 24-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. कंपनी ने सेल्फी कॅमेर्‍या सोबत पण फ्लॅश लाईट दिली आहे.

टेक्नो कॅमोन आई क्लिक 2 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. 4जी एलटीई व डुअल सिम सह हा फोन बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. तसेच पावर बॅकअप साठी कॅमोन आई क्लिक 2 मध्ये 3750एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. टेक्नो चा हा नवीन फोन 13,499 रुपयांमध्ये अॅक्वा ब्लू, मीडनाईट ब्लॅक तसेच हवाई ब्लू कलर मध्ये विकत घेता येईल.

The post 4जीबी रॅम आणि 24-एमपी सेल्फी कॅमेरा सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले वाला टेक्नो कॅमोन आई क्लिक 2, किंमत फक्त 13,499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-i-click-2-launched-feature-specifications-and-price-in-marathi/feed/ 0
टेक्नो घेऊन येत आहे आपला पहिला नॉच डिस्प्ले वाला फोन, डुअल रियर कॅमेरा असेल यात https://www.91mobiles.com/marathi/tecno-to-launch-notch-display-smartphone-with-new-series-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-to-launch-notch-display-smartphone-with-new-series-in-marathi/#respond Thu, 20 Sep 2018 12:06:09 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2197 आशा आहे की टेक्नो चा हा आगामी स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च होईल.

The post टेक्नो घेऊन येत आहे आपला पहिला नॉच डिस्प्ले वाला फोन, डुअल रियर कॅमेरा असेल यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कमी किंमत आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या स्मार्टफोन्स बद्दल बोलायचे झाले तर या यादीत टेक कंपनी टेक्नो चे नाव सर्वात वर येते. टेक्नो ने गेल्या महिन्यात आपल्या कॅमोन आई सीरीज मध्ये एक साथ दोन स्मार्टफोन कॅमोन आई ऐस आणि कॅमोन आई स्काई2 स्मार्टफोन लॉन्च केले होते. हे फोन क्रमश: 6,799 रुपये तसेच 7,499 रुपयांमध्ये बाजारत सेल साठी उपलब्ध आहेत. तसेच टेक्नो कंपनी आता पुन्हा एकदा आपल्या यूजर्स साठी नवीन भेट घेऊन येत आहे आणि ही भेट असेल कंपनीचा पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन.

91मोबाईल्सला बातमी मिळाली आहे की टेक्नो लवकरच भारतीय बाजारात आपला एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन कंपनी द्वारा लॉन्च केला जाणारा पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन असेल जो ​एका नवीन स्मार्टफोन सीरीज अंतर्गत लॉन्च केला जाईल. जरी कंपनी ने अजून या फोनचे नाव सांगितले नसले तरी आम्हाला टेक्नो च्या या आगामी स्मार्टफोन चे फोटो मिळाले आहे ज्यावरून फोनच्या लुक व डिजाईन ची माहिती मिळाली आहे. हा फोन आयफोन 10 प्रमाणे बेजल लेस नॉच डिस्प्ले सह येईल.

टेक्नो च्या या आगामी फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल जो वर्टिकल शेप मध्ये असेल. या रियर कॅमेरा सेटअप च्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर असेल तसेच या सेंसर च्या खाली टेक्नो चा ब्रँड लोगो असेल. फोनचा डिस्प्ले पाहता यात बेजल लेस डिस्प्ले असेल ज्यावर नॉच ​देण्यात येईल. या फोनचे तिन्ही बाजू पूर्णपणे बेजल लेस असतील आणि खालच्या बाजूला बॉडी पार्ट देण्यात आला आहे.

टेक्नो फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात येईल तसेच खालच्या पॅनल वर हेडफोन जॅक आहे. टेक्नो कडून अजूनतरी फोन ची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत टेक्नो आपला हा पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये आॅफिशियली लॉन्च करेल. आशा आहे की टेक्नो चा हा आगामी स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च होईल.

The post टेक्नो घेऊन येत आहे आपला पहिला नॉच डिस्प्ले वाला फोन, डुअल रियर कॅमेरा असेल यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-to-launch-notch-display-smartphone-with-new-series-in-marathi/feed/ 0