Tecno Pova 4 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 07 Mar 2023 11:53:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6,000mAh ची बॅटरी, 8GB RAM सह Tecno Pova 4 Pro लाँच https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-and-6000mah-battery-mobile-phone-tecno-pova-4-pro-launched-check-price-specification-details/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-and-6000mah-battery-mobile-phone-tecno-pova-4-pro-launched-check-price-specification-details/#respond Mon, 10 Oct 2022 09:11:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13835 टेक्नोनं अलीकडेच भारतात ‘पोवा’ सीरीज अंतगर्त 5जी स्मार्टफोन Tecno Pova Neo 5G लाँच केला आहे. टेक्नो पोवा नियो 5जीची प्राइस 15,499 रुपये आहे, जो 6,000mAh Battery, 50MP Camera, 120Hz Display आणि MediaTek Dimensity 810 प्रोसेसरला सपोर्ट करतो. तर आता कंपनीनं टेक मंचावर या सीरीज अंतगर्त अजून एक नवीन मोबाइल फोन Tecno Pova 4 Pro देखील […]

The post 6,000mAh ची बॅटरी, 8GB RAM सह Tecno Pova 4 Pro लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक्नोनं अलीकडेच भारतात ‘पोवा’ सीरीज अंतगर्त 5जी स्मार्टफोन Tecno Pova Neo 5G लाँच केला आहे. टेक्नो पोवा नियो 5जीची प्राइस 15,499 रुपये आहे, जो 6,000mAh Battery, 50MP Camera, 120Hz Display आणि MediaTek Dimensity 810 प्रोसेसरला सपोर्ट करतो. तर आता कंपनीनं टेक मंचावर या सीरीज अंतगर्त अजून एक नवीन मोबाइल फोन Tecno Pova 4 Pro देखील लाँच केला आहे. टेक्नो पोवा 4 प्रो मध्ये 50एमपी कॅमेरा, 8जीबी रॅम, मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट तसेच 6,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, पुढे या हँडसेटची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

टेक्नो पोवा 4 प्रोचे स्पेसिफिकेशन्स

टेक्नो पोवा 4 प्रो स्मार्टफोन 6.66 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो फुलएचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. कंपनीनं याला डॉटइन डिस्प्ले असं नाव दिलं आहे. या नवीन टेक्नो मोबाइल फोनचं डायमेंशन 164.79x77x9.19 एमएम आहे. ज्याची थिकनेस 9.19 एमएम आहे. हे देखील वाचा: Airtel 5G Plus: फक्त ‘या’ स्मार्टफोन्सवर चालेल एयरटेल 5जी, पाहा तुमचा फोन आहे का या यादीत

50mp camera and 6000mah battery mobile phone Tecno Pova 4 Pro launched check price specification details

Tecno Pova 4 Pro अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो ऑक्टा-कोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली जी57 जीपीयू देण्यात आला आहे. टेक्नो पोवा 4 प्रो 8 जीबी रॅमवर लाँच झाला आहे जो 5जीबी एक्सटेंडेड रॅमला देखील सपोर्ट करतो. तसेच या टेक्नो मोबाइलमध्ये 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते.

फोटोग्राफीसाठी Tecno Pova 4 Pro मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी टेक्नो पोवा 4 प्रो स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

50mp camera and 6000mah battery mobile phone Tecno Pova 4 Pro launched check price specification details

Tecno Pova 4 Pro ड्युअल सिम 4जी फोन आहे जो एनएफसीसह अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्सला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी टेक्नो पोवा 4 प्रो मध्ये 6,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीवर चालते. हा टेक्नो मोबाइल 10वॉट रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजीला देखील सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Tata Tiago EV booking: सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची बुकिंग सुरु; फक्त 21 हजारांत करा बुक

टेक्नो पोवा 4 प्रोची किंमत

टेक्नो पोवा 4 प्रो कंपनीनं सिंगल व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे जो 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन सध्या बांग्लादेशात लाँच केला गेला आहे ज्याची किंमत भारतीय 21,500 रुपयांच्या आसपास आहे. टेक्नो पोवा 4 प्रो स्मार्टफोन Fluorite Blue कलरमध्ये आला आहे जो येत्या काही दिवसांमध्ये भारतात देखील लाँच होऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

The post 6,000mAh ची बॅटरी, 8GB RAM सह Tecno Pova 4 Pro लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-and-6000mah-battery-mobile-phone-tecno-pova-4-pro-launched-check-price-specification-details/feed/ 0