Tecno Spark 5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sat, 30 May 2020 14:14:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5000mAh बॅटरी आणि 5 कॅमेरा असलेला हा शानदार फोन, Xiaomi-Realme ला मिळाले आव्हान https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-5-launched-in-india-punch-hole-display-5000mah-battery-quad-rear-camera-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-5-launched-in-india-punch-hole-display-5000mah-battery-quad-rear-camera-specs-price-sale-offer/#respond Thu, 21 May 2020 14:08:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7171 भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत टेक्नोने अजून एक नवीन डिवाइस TECNO Spark 5 पण लॉन्च केला आहे.

The post फक्त 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5000mAh बॅटरी आणि 5 कॅमेरा असलेला हा शानदार फोन, Xiaomi-Realme ला मिळाले आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी टेक्नो त्या स्मार्टफोन्स ब्रँड्स पैकी एक आहे जे आपले डिवाइसेज लो बजेट मध्ये सादर करतात. टेक्नो ने अनेक सेग्मेंट्स मध्ये भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या ब्रँडने फेब्रुवारी मध्ये पंच-होल डिस्प्ले असलेला TECNO Camon 15 आणि पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला TECNO Camon 15 Pro बाजारात आणला होता, जे लोकांना आवडले होते. तर आज भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत टेक्नोने अजून एक नवीन डिवाइस TECNO Spark 5 पण लॉन्च केला आहे. हा फोन 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो उद्यापासून शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया सोबतच देशातील ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Tecno Spark 5

टेक्नो स्पार्क 5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च झाला आहे जो 1600 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या एचडी+ डॉट-इन डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.2 टक्के आहे तसेच हा डिस्प्ले 480 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोन स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्ले वर डावीकडे पंच-होल आहे आणि यात फोनचा सेल्फी कॅमेरा आहे.

Tecno Spark 5 कंपनीने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो हाईओएस 6.1 सह येतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या क्वॉड-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो ए22 चिपसेट देण्यात आला आहे. टेक्नोने आपला नवीन फोन 2 जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता टेक्नो स्पार्क 5 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर डावीकडे असलेल्या चौकोनात आहे. या सेटअप मध्ये चार कॅमेरा सेंसर वर्टिकल शेप मध्ये देण्यात आले आहेत तसेच उजवीकडे क्वॉड फ्लॅश आणि लेंस डिटेल लिहिण्यात आले आहेत. या रियर सेटअप मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 2 मेगापिक्सलची बोके लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एक एआई लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फीसाठी Tecno Spark 5 एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Tecno Spark 5 रियल डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा डिवाइस फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी टेक्नो स्पार्क 5 मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. इंडियन मार्केट मध्ये हा फोन Ice Jadeite आणि Spark Orange कलर मध्ये विकत घेता येईल.

The post फक्त 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5000mAh बॅटरी आणि 5 कॅमेरा असलेला हा शानदार फोन, Xiaomi-Realme ला मिळाले आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-5-launched-in-india-punch-hole-display-5000mah-battery-quad-rear-camera-specs-price-sale-offer/feed/ 0