Tecno Spark 6 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 28 Sep 2020 12:07:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4 जीबी रॅम, 6.8 इंचाचा पंच-होल डिस्प्ले, क्वॉड कॅमेरा आणि 5000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-6-launched-quad-camera-helio-g70-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-6-launched-quad-camera-helio-g70-5000mah-battery/#respond Mon, 28 Sep 2020 12:07:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8325 Tecno Spark 6 अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो हाईओएस 7.0 सह चालतो.

The post 4 जीबी रॅम, 6.8 इंचाचा पंच-होल डिस्प्ले, क्वॉड कॅमेरा आणि 5000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
TECNO ने काही दिवसांपूर्वीच भारतात आपला स्वस्त स्मार्टफोन Tecno Spark 6 Air लॉन्च केला होता जो 6,000एमएएच च्या पावरफुल बॅटरीला सपोर्ट करतो. भारतात हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्याची बेस किंमत 7,999 रुपये आहेत. भारतात स्पार्क 6 एयरच्या यशानंतर आता कंपनीने शेजारच्या पाकिस्तान मध्ये या सीरीजचा एक नवीन स्मार्टफोन Tecno Spark 6 नावाने लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेरा आणि 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

Tecno Spark 6

टेक्नो स्पार्क 6 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता, हा फोन 20.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 720 x 1640 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या एचडी+ डॉट-इन डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वर डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला होल आहे. टेक्नो स्पार्क 6 चा डिस्प्ले 264ppi पिक्सल डेनसिटी आणि 480nits ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

Tecno Spark 6 अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो हाईओएस 7.0 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर मीडियाटेक हीलियो जी70 चिपसेट देण्यात आला आहे. पाकिस्तान मध्ये हा फोन 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता टेक्नो स्पार्क 6 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो OnePlus 7T स्मार्टफोन सारख्या डिजाईन मध्ये आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्यासोबत 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एक AI scene लेंस आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Tecno Spark 6 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच या फोन मध्ये सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी टेक्नो स्पार्क 6 मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते.

किंमत

Tecno Spark 6 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज सह PKR 20,599 मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 9,200 रुपयांच्या आसपास आहे. बाजारात हा फोन Comet Black, Dynamic Orange, Misty Violet आणि Ocean Blue कलर मध्ये आला आहे. टेक्नो हा फोन भारतात लॉन्च करेल कि नाही हे अजून समजले नाही.

The post 4 जीबी रॅम, 6.8 इंचाचा पंच-होल डिस्प्ले, क्वॉड कॅमेरा आणि 5000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-6-launched-quad-camera-helio-g70-5000mah-battery/feed/ 0