Tenor D2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 22 Aug 2018 09:38:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 3जीबी रॅम आणि 3,200एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला टेनॉर चा स्वस्त स्मार्टफोन डी2 https://www.91mobiles.com/marathi/10-or-d2-india-launch-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/10-or-d2-india-launch-price-features-specifications-in-marathi/#respond Wed, 22 Aug 2018 09:38:20 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1792 फोन चा 2जीबी रॅम वेरिएंट 6,999 रुपये तसेच 3जीबी रॅम वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. टेनॉर डी2 येत्या 28 ऑगस्ट पासून अमेजॉन वरून विकत घेता येईल.

The post 3जीबी रॅम आणि 3,200एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला टेनॉर चा स्वस्त स्मार्टफोन डी2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेनॉर ने गेल्या वर्षी भारतात आपला स्वस्त स्मार्टफोन डी2 लॉन्च केला होता. आज भरपुर दिवसांनी टेनॉर ने आपला अजून एक स्मार्टफोन इंडियन टेक बाजारात लॉन्च केला आहे. टेनॉर ने डी2 स्मार्टफोन सादर केला आहे जो 2 रॅम वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. टेनॉर ब्रांड ई-कॉमर्स साइट अमेजॉन ने बनवला आहे. त्यामुळे हा फोन पण अमेजॉन वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

टेनॉर डी2 कंपनी ने 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला आहे. या फोन मध्ये 1440 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.45-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो पांडा 2डी ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे जो 1.4गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 308 जीपीयू देण्यात आला आहे.

कपंनी ने हा फोन दोन वेरिएंट मध्ये बाजारात आणला आहे. एक वेरिएंट मध्ये 2जीबी रॅम सोबत 16जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. दोन्ही वेरिएंट्स मध्ये इंटरनल स्टोरेज 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता डी2 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत एफ/2.0 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेर्‍याला सपोर्ट करतो.

टेनॉर डी2 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. टेनॉर ने आपल्या या फोन मध्ये फिजीकल फिंगरप्रिंट सेंसर दिला नाही पण सिक्योरिटी साठी हा फोन फेस अनलॉक फीचर ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये ओटीजी सपोर्ट सोबत 3,140एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी ने हा फोन आईपीएक्स2 रेटिंग सह सादर केला आहे म्हणजे हा पाण्याच्या थेंबांपासून आणि धूळिपासून सुरक्षित राहील.

टेनॉर डी2 बियॉड ब्लॅक आणि ग्लो गोल्ड कलर मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोन चा 2जीबी रॅम वेरिएंट 6,999 रुपये तसेच 3जीबी रॅम वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. टेनॉर डी2 येत्या 28 ऑगस्ट पासून अमेजॉन वरून विकत घेता येईल.

The post 3जीबी रॅम आणि 3,200एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला टेनॉर चा स्वस्त स्मार्टफोन डी2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/10-or-d2-india-launch-price-features-specifications-in-marathi/feed/ 0