TikTok Video - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 04 Jul 2019 13:22:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 3 वर्षांपूवी घरातून पळून गेलेला नवरा, बायकोने TikTok वीडियो वरून पकडेल https://www.91mobiles.com/marathi/tamilnadu-suresh-caught-by-wife-after-3-years-on-tiktok-video/ https://www.91mobiles.com/marathi/tamilnadu-suresh-caught-by-wife-after-3-years-on-tiktok-video/#respond Thu, 04 Jul 2019 13:22:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4733 हा ऍप वापरल्यामुळे 3 वर्षांपासून गायब एक व्यक्ति आपल्या पत्नी आणि कुटुंबाला भेटू शकला आहे.

The post 3 वर्षांपूवी घरातून पळून गेलेला नवरा, बायकोने TikTok वीडियो वरून पकडेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
TikTok ऍप भारतात जितका प्रसिद्ध आहे, तितकाच विवादास्पद पण आहे. अलीकडेच कॉग्रेस नेता शशी थरूर यांनी या ऍपला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका म्हणत म्हटले होते कि TikTok इंडियन यूजर्सचा डेटा बेकायदेशीररित्या चीन मध्ये पाठवत आहे. TikTok संबंधित असा वाद चालू असताना एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. TikTok संबंधित बातमी आली आहे कि हा ऍप वापरल्यामुळे 3 वर्षांपासून गायब एक व्यक्ति आपल्या पत्नी आणि कुटुंबाला भेटू शकला आहे.

TikTok संबंधित ये प्रकरण तामिळनाडू मधील आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार कृष्णानगर मधील सुरेश तीन वर्षांपूर्वी 2016 मध्ये आपल्या घरातून पळून गेला होता. सुरेश गायब झाल्यानंतर त्याची पत्नी आणि घरच्यांनी त्याला खूप शोधले पण तो कुठेच मिळाला नाही. पोलीसांत रिपोर्ट करूनही सुरेशचा थांगपत्ता लागला नाही. पण आता 3 वर्षानंतर सुरेशला एका TikTok वीडियो द्वारे त्याच्या पत्नीने पकडले आहे.

गायब झाल्यानंतर तीन वर्षांनी एके दिवशी सुरेशची पत्नी जयासुधाच्या नातेवाईकाने TikTok वर एक वीडियो बघितला ज्यात एक्टिंग करत असलेली एक व्यक्ती हुबेहूब सुरेश सारखी दिसत होती. त्या वीडियो मधील व्यक्ती एका किन्नरसोबत होती. संशय आल्यामुळे नातेवाईकाने जयासुधाला तो वीडियो दाखवला जो बघितल्यानंतर जयासुधाला खात्री झाली कि वीडियो मध्ये किन्नर सोबत असलेली व्यक्ति दुसरी कोणी नसून सुरेशच आहे.

TikTok वीडियो बद्दल जयासुधाने पोलिसांना सांगितले, त्यानंतर पोलिसांनी सुरेशच्या TikTok अकाउंट वर नजर ठेवली. काही दिवसांतच पोलिसांनी सुरेशला होसुर स्थानकावर पकडले. सुरेशने सांगितले कि त्याने कौटुंबिक कलहामुळे आपला परिवार सोडला होता. सुरेशने असे पण सांगितले कि तो वीडियो मधील किन्नर सोबत रिलेशनशिप मध्ये आहे आणि घरातून पळून गेल्यानंतर तो त्याच्यासोबत राहत होता.

किन्नरांसाठी काम करणाऱ्या एका NGO सोबत मिळून पोलिसांनी सुरेशला पकडले आणि त्याची काउंसलिंग केल्यानंतर त्याची पत्नी व घरच्यांच्या हवाली केले आहे. सुरेशला दोन मुलं आहेत. TikTok वर वीडियो बनवण्याचा हा नाद सुरेशसाठी किती चांगला ठरला हे तर आम्ही सांगू शकत नाही पण या ऍपने एक घरातून पळून गेलेला नवरा पुन्हा त्याच्या बायकोला भेटू शकला.

The post 3 वर्षांपूवी घरातून पळून गेलेला नवरा, बायकोने TikTok वीडियो वरून पकडेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tamilnadu-suresh-caught-by-wife-after-3-years-on-tiktok-video/feed/ 0