Top 5 devices - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 25 Jan 2019 17:01:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8,000 रुपयांच्या बजेट मधील 5 शानदार फोन https://www.91mobiles.com/marathi/top-smartphone-under-rs-8000-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/top-smartphone-under-rs-8000-in-marathi/#respond Fri, 25 Jan 2019 17:01:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3467 आम्ही 8,000 रुपयांच्या बजेट मधील 5 शानदार फोनचा उल्लेख केला आहे.

The post 8,000 रुपयांच्या बजेट मधील 5 शानदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कमी रेंज मध्ये आधी फोन घ्यायचा असल्यास प्रत्येक जण शाओमीचे नाव घेत होते पण सध्या शाओमी सोबत इतर अनेक पर्याय पण उपलब्ध आहे. सर्वात चांगली बाब शी कि सॅमसंगचा पण एक फोन आहे जो दमदार म्हणता येईल. तसेच ओपो आणि रियलमी सारख्या ब्रँडचे फोन पण चांगल्या स्पेसिफिकेशन सह येत आहेत. खाली आम्ही 8,000 रुपयांच्या बजेट मधील अशाच 5 शानदार फोनचा उल्लेख केला आहे.

1. सॅमसंग गॅलेक्सी एम10

सॅमसंग गॅलेक्सी ए10 याच महिन्यात 28 जानेवारीला लॉन्च होणार आहे आणि काही दिवसांत फोन सेल साठी पण उपलब्ध होईल आणि 8,000 च्या बजेट मध्ये सॅमसंग गॅलेक्सी एम10 एक चांगला फोन म्हणता येईल. या फोन मध्ये 6.2—इंचाची एचडी+ आईपीएस स्क्रीन देण्यात आली आहे. खास बाब अशी कि कंपनी ने हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो असलेल्या नॉच स्क्रीन सह सादर केला आहे. फोनच्या नॉच वर एक एलईडी लाइट आहे जी याला वेगळा लुक देते. याच्या स्क्रीन वर ड्रॅगॉन ट्रेल कोटिंग आहे जी छोट्या मोठ्या स्क्रॅच पासून वाचवते. सॅमसंग गॅलेक्सी एम10 एक्सनोस 7872 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये 1.6गीगाहट्र्ज चा हेक्साकोर प्रोसेसर आहे. सोबत 2जीबी रॅम आणि 16जीबी मेमरी आहे. फोटोग्राफी साठी फोन मध्ये 13-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला 5-मेगापिकसलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी कंपनी ने हा 3,400 एमएएच च्या बॅटरी ने सुसज्ज केला आहे.

2. रियलमी सी1

रियलमी सी1 मध्ये 6.2-इंचाची एचडी+ स्क्रीन आहे जी नॉच सह उपलब्ध आहे. कंपानी ने हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट सह सादर केला आहे आणि यात 1.8गीगाहट्र्ज चा कोर्टेक्स ए53 आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. यासोबत 2जीबी रॅम मेमरी आणि 16जीबी इंटरनल मेमरी आहे. कमी रेंजच्या रियलमी 2 प्रो मध्ये तुम्हाला 13-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो या रेंज मधील फोन मध्ये सहज मिळत नाही. तसेच याचा सेल्फी कॅमेरा 5-मेगापिक्सलचा आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,230 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

3. शाओमी रेडमी 6ए

शाओमी रेडमी 6ए मध्ये 5.45—इंचाचा एचडी+ (720 x 1440 पिक्सल रेजल्यूशन) स्क्रीन दिली आहे आणि कंपनी ने हा 18:9 फुल व्यू आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे. हा फोन मीयूआई 9 वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर आधारित आहे. कंपनी ने याला मीडियाटेक हेलिया ए22 चिपसेटची ताकद दिली आहे. फोन मध्ये तुम्हाला 2.0 गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर मिळेल. यात 2जीबी रॅम मेमरी सह 16जीबी व 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोटोग्राफी साठी रेडमी 6ए मध्ये 13-मेगापिक्सलचा रियर आणि 5—मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी कंपनी ने यात 3,000 एमएएच ची बॅटरी दिली आहे.

4. शाओमी रेडमी 6

या बजेट मध्ये तुम्ही शाओमी रेडमी 6 चा छोटा वेरियंट पण बघू शकता. शाओमी रेडमी 6 मध्ये पण 18:9 आस्पेक्ट रेशियो असलेला 5.45-इंचाचा एचडी+ (720 x 1440 पिक्सल रेजल्यूशन) बेजल लेस डिस्प्ले आहे. आणि हा पण मीडियाटेक हेलियो पी22 चिपसेट आधारित आहे ज्यात 2.0गीगाहर्ट्ज चा 64बिट्स असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनी ने हा 3जीबी आणि 4जीबी रॅम मेमरी सह सादर केला आहे आणि दोन्ही मॉडेल मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोटोग्राफी साठी यात 12—मेगापिक्सल + 5—मेगापिक्सल डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. या फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर पण आहे.

5. ओपो ए3एस

ओपो ब्रँड चा पण एक फोन आहे जो कमी रेंज मध्ये डुअल कॅमेरा सह येतो. कंपनी ने ओपो ए3एस सादर केला आहे. फोन मध्ये 6.2-इंचाचा एचडी+ नॉच डिस्प्ले आहे. कंपनी ने हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर सादर केला आहे आणि फोन मध्ये 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर आहे. यात 2जीबी रॅम आणि 16जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोटोग्राफी साठी यात 13-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एआई ब्यूटीफाई फीचर असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी ओपो ए3एस मध्ये 4,230एमएएच ची पावरफुल बॅटरी आहे.

The post 8,000 रुपयांच्या बजेट मधील 5 शानदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-smartphone-under-rs-8000-in-marathi/feed/ 0