Top 5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 26 Jun 2020 10:12:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5 बेस्ट Nokia स्मार्टफोन, 20,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये https://www.91mobiles.com/marathi/best-nokia-phone-under-rs-20000/ https://www.91mobiles.com/marathi/best-nokia-phone-under-rs-20000/#respond Fri, 26 Jun 2020 10:12:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7552 आम्ही 20 हजार रुपयांच्या बजेट मध्ये अश्याच 5 शानदार नोकिया फोनची माहिती दिली आहे जे तुम्हाला आवडतील.

The post 5 बेस्ट Nokia स्मार्टफोन, 20,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
प्रत्येकाचा एक आवडीचा ब्रँड असतो आणि त्या ब्रँडचे फोन आपल्याला घेण्यास आवडते. कोणाला शाओमी, कोणाला सॅमसंग, कोणाला वीवो तर कोणाला ओपो आवडतो. परंतु आज पण अनेक लोक असे आहेत जे नोकियाचे चाहते आहेत. लोक नोकिया फोन बाबत तक्रार करत असतात कि किंमतीनुसार महाग फोन्स आहेत किंवा थोडे अजून फीचर असते तर मजा आली असती. परंतु हि गोष्ट मात्र सत्य आहे कि भारतात आज पण लोकांचे नोकियावर खूप प्रेम आहे. जेव्हा एखादा नोकिया फोन येतो तेव्हा सर्वांचे त्याकडे लक्ष असते. तसेच एक असा वर्ग आहे जो आता पण नोकिया फोनच घेऊ इच्छितो. सर्वात चांगली बाब अशी कि भारतात मोठ्या प्रमाणात नोकिया फोन्स उपलब्ध पण आहेत. पुढे आम्ही 20 हजार रुपयांच्या बजेट मध्ये अश्याच 5 शानदार नोकिया फोनची माहिती दिली आहे जे तुम्हाला आवडतील.

नोकिया 8.1

हा फोन गेल्यावर्षी लॉन्च केला गेला होता. परंतु तेव्हा खुप महाग होता. परंतु आज जर या फोनचे फीचर्स आणि किंमत तुम्ही बघितले तर हा फोन महाग वाटणार नाही. तसेच याची स्मार्ट ऑपरेटिंग सिस्टम पण तुम्हाला खूप आवडेल. नोकिया फोन एंडरॉयडवन इंटीग्रेशन सह लॉन्च होतात त्यामुळे सर्वात आधी यांना नवीन एंड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टमचा अपडेट मिळतो. नोकिया 8.1 एंड्रॉयड 9 वर सादर केला गेला होता. परंतु आता हा एंड्रॉयड 10 वर चालत आहे आणि याला एंड्रॉयड 11 चा अपडेट पण मिळेल. नोकिया 8.1 मध्ये 6.18 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो जो खूप शानदार आहे. फोन मध्ये 12 MP + 13 MP डुअल प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच बरोबर 20 MP फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी 3500 mAh ची बॅटरी उपलब्ध आहे.

नोकिया 7.2 6जीबी

जर तुम्हाला जास्त स्मार्ट कॅमेरा आणि जास्त रॅम हवा असेल तर तुम्ही नोकिया 7.2 बघू शकता. या फोन मध्ये 6.39 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोन ग्लास फिनिश सह सादर केला गेला आहे आणि याची डिजाइन पण कॉम्पॅक्ट आहे. फ्रंट आणि बॅक दोन्हीकडे गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन आहे. राहिला प्रश्न परफॉर्मेंसचा तर नोकिया 7.2 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर सादर केला गेला आहे आणि यात 6जीबी रॅम देण्यात आला आहे. तसेच 64जीबी की इंटरनल स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी 48 MP + 8 MP + 5 MP ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटला 20 MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 3500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

नोकिया 5.1 प्लस

कमी रेंज मधील एखादा कॉम्पॅक्ट नोकिया फोन घेण्याचा विचार करत असाल तर 5.1 प्लस एक चांगला ऑप्शन आहे. या फोन मध्ये तुम्हाला 5.86 इंचाची एचडी+ स्क्रीन मिळेल आणि हि खूप कॉम्पॅक्ट आहे. पूर्ण फोनचा वापर तुम्ही एका हाताने करू शकता. फोटोग्राफीसाठी 13 MP + 5 MP चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल. हा फोन मीडियाटेक हेलियो पी60 चिपसेट वर चालतो आणि कंपनीने 6जीबी रॅम दिला आहे. पावर बॅकअपसाठी 3060 mAh ची बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

नोकिया 6.2

जर कमी रेंज मध्ये नोकियाचा मोठी स्क्रीन असलेला फोन तुम्हला घ्यायचा असेल तर नोकिया 6.2 बघू शकता. हा फोन परफॉर्मंस आणि कॅमेऱ्याच्या बाबतीत मागे राहत नाही. नोकिया 6.2 मध्ये 6.3 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे आणि कंपनीने फुल एचडी+ डिस्प्ले रेजल्यूशनचा वापर केला आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कोर्निंग गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. कॅमेरा पाहता हा फोन 16 MP + 8 MP + 5 MP च्या ट्रिपल कॅमेरा सेटअप सह येतो. तसेच फ्रंटला 8 MP चा सेंसर आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 3500 mAh ची बॅटरी आहे आणि हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर चालतो. त्याचबरोबर फोन मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी आहे.

नोकिया 7.1

कमी रेंज मध्ये नोकियाचा अजून एक फोन आहे ज्याची चर्चा केली जाऊ शकते आणि तो आहे नोकिया 7.1 मोबाईल. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर चालतो आणि यात 1.8 गीगाहट्र्जचा ऑक्टाकोर प्रोसेसर मिळेल. राहिला प्रश्न डिस्प्लेचा तर कंपनीने हा 5.84 इंचाच्या स्क्रीन सह सादर केला आहे. स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. फोटोग्राफीसाठी 12 MP + 5 MP चा डुअल कॅमेरा आहे आणि फ्रंटला 8 MP चा सेल्फी आहे. हा फोन 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी सह येतो. तसेच पावर बॅकअपसाठी 3060 mAh बॅटरी उपलब्ध आहे.

The post 5 बेस्ट Nokia स्मार्टफोन, 20,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-nokia-phone-under-rs-20000/feed/ 0