Top Xiaomi Phones - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 13 Feb 2020 13:25:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 मिळत नाही Redmi Note 8, रिटेलर्सचा आरोप कंपनी नोट 8 सोबत जुने फोन विकण्याचा टाकत आहे दबाव https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-price-hike-retailers-being-forced-to-sale-old-mi-phones-by-company/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-price-hike-retailers-being-forced-to-sale-old-mi-phones-by-company/#respond Thu, 13 Feb 2020 13:25:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6588 कंपनी Redmi Note 8 च्या 1 फोन सोबत 5 असे जुने फोन्स घेण्याचा दबाव टाकत आहेत ज्यांना आता मागणी नाही.

The post मिळत नाही Redmi Note 8, रिटेलर्सचा आरोप कंपनी नोट 8 सोबत जुने फोन विकण्याचा टाकत आहे दबाव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कमी किंमतीत दमदार स्पेसिफिकेशनमुळे शाओमी फोनची मागणी नेहमीच जास्त होती आहे पण कधी कधी हीच खासियत कंपनी वर भारी पडते. आणि अशीच बातमी आहे आमच्याकडे. गेल्या एक महिन्यापासून शाओमीचे रिटेल पार्टनर्स त्रस्त आहेत कारण त्यांना Redmi Note 8 4जीबी रॅम मॉडेलचा स्टॉक देण्यात आलेला नाही. याबाबत आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा आम्ही अजून तपास केला आणि विचित्रच गोष्ट ऐकायला आली जी कदाचित रिटेलस बिजनेससाठी चांगली म्हणता येणार नाही. अनेक रिटेलर्सने तक्रार केली आहे कि एक तर रेडमी नोट 8 चा स्टॉक दिला जात नाही आणि जेव्हा दिला जातो तेव्हा त्या सोबत कंपनीच्य अटी ठेवत आहे. नवीन फोन सोबत जुने फोन्स विकण्यास भाग पाडण्यात येत आहे.

काय झाले आहे

काल कंपनीने Xiaomi Redmi Note 8 ची किंमत वाढवली होती. हि माहिती आम्हाला मिळाली तेव्हा आम्ही रिटेलर्सशी संपर्क साधला आणि तिथून संपूर्ण बातमी मिळाली. सर्वात आधी तर दिल्ली करोलबाग मधील रिटेलर्सने आम्हाला सांगितले कि ‘हि सूचना तर आम्हाला मिळाली कि कंपनीने शाओमी रेडमी नोट 8 ची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. परंतु या बातमीचे काय करायचे जर आमच्याकडे स्टॉकच नसेल तर. गेल्या एक महिन्यापासून कंपनीने याचा स्टॉकच दिला नाही.”

आम्हाला हि बातमी मिळताच आम्ही दुसऱ्या ठिकाणाहून पण माहिती घेतली आणि तिथून पण काही नवीन गोष्टी समजल्या. याबाबत फरीदाबादच्या एका रिटेलरने आम्हाला माहिती दिली आहे कि ”हे सत्य आहे कि स्टॉक गेल्या एका महिन्यापेक्षा पण जास्त काळापासून दिला जात नाही. पण एकदा दिला जात होता तेव्हा 5 Redmi Note 8 सोबत 20 जुने फोन घेण्यासाठी भाग पाडले जात होते. तेव्हा आम्ही नकार दिला. कारण 20 जुने डिवाइस ते आहेत ज्यांना मागणीच नाही.”

याबाबत राजस्थानच्या रिटलेर्सने आम्हाला सांगितले कि ”कंपनी Redmi Note 8 च्या 1 फोन सोबत 5 असे जुने फोन्स घेण्याचा दबाव टाकत आहेत ज्यांना आता मागणी नाही. जर Xiaomi चे जुने फोन आम्ही घेतले तर आमचे पैसे अडकतील. कारण फोन विकले जाणार नाहीत आणि कंपनी पण जुना स्टॉक परत घेणार नाही. त्यामुळे फोन न घेण्यात आणि पैसे न अडकवण्यात आमचे भले आहे ”

कंपनी काय म्हणते

जेव्हा आम्हाला प्रकरण समजले तेव्हा म्ही कंपनीशी पण याबाबत संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला लिखित उत्तर दिले आहे. कंपनी म्हणते कि ”Redmi Note 8 4GB आमच्या लोकप्रिय डिवाईसेस पैकी एक आहे, आणि ऑफलाईन मागणी पाहता आम्ही आमच्या पद्धतीने हि मागणी पूर्ण करण्याचे प्रयत्न करत आहोत. पण याआधी आम्ही सांगितले आहे रिटेल स्टोर्ससाठी नवीन फोन विकण्यासोबत जुनी डिवाइस इन्वेंट्री संपवणे महत्वाचे आहे. अशी कोणतीही यात आम्ही नवीन फोन वर ठेवली नाही. रिटेलर्ससाठी आमच्याकडून कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही ज्यामुळे रिटेलर्स जुन्या इन्वेंटरी मध्ये अडकतील.”

रिटेलर्स कंपनी बद्दल काय म्हणतात

कंपनीशी बोलल्यानंतर आम्ही पुन्हा रिटलेर्सशी बोलणी केली आणि त्यांना माहिती दिली कंपनीने काय म्हटले आणि सर्व रिटलेर्सने हि बाब फेटाळून लावली. रिटेलर्स म्हणतात कि आमच्या स्टोर वर जुना स्टॉक काढण्यासाठी कंपनी का सांगेल. आमच्या स्टॉकमुळे त्यांना काय फरक पडतो. कारण शाओमी मध्ये नो रिटर्न पॉलिसी आहे. त्यामुळे आम्ही फोन विकले किंवा स्टोर वर ठेवले तरी त्यांना काही फरक पडत नाही. याबाबत लखनऊचे एक रिटेलर्स म्हणतात कि ”कंपनी इन्वेंटरी वाढवू नका असे सांगत आहे पण त्यांची जुनी इन्वेंटरी आम्हा रिटेलर्स वर टाकत आहे. यामुळे आम्हाला मोठे नुकसान होते.”

सुरवात जरी Xiaomi Redmi Note मुळे झाली असली तर हा वाद खूप आधीचा आहे जो वेळावेळी रिटेलर्सने उचलून धरला आहे पण आता ऑनलाइन रिटेल स्टोरच्या वाढत्या प्रभावामुळे रिटेलर्स मध्ये याचा राग पण आहे. काही दिवसांपूर्वी ऑफलाइन रिटेलर्सने सॅमसंग विरोधात निदर्शन केले आहे. त्यामुळे जर Xiaomi आताच सांभाळू शकली नाही तर पुढे जाऊन कंपनीला हे महाग पडू शकते कारण कंपनीचा आता मोठा यूजर बेस ऑफलाइन मध्ये पण बनला आहे.

The post मिळत नाही Redmi Note 8, रिटेलर्सचा आरोप कंपनी नोट 8 सोबत जुने फोन विकण्याचा टाकत आहे दबाव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-price-hike-retailers-being-forced-to-sale-old-mi-phones-by-company/feed/ 0
2019 मध्ये शाओमीचे हे 5 दमदार फोन होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/top-5-xiaomi-phone-to-launch-in-2019-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/top-5-xiaomi-phone-to-launch-in-2019-in-india-in-marathi/#respond Thu, 17 Jan 2019 09:01:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3403 आम्ही अशाच 5 दमदार शाओमी फोनचा उल्लेख केला आहे जे 2019 मध्ये येणार आहेत.

The post 2019 मध्ये शाओमीचे हे 5 दमदार फोन होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगला मागे टाकत शाओमी भारतातील नंबर एक मोबाईल फोन निर्माता कंपनी बनली आहे आणि आतापण त्यांचे फोन लोकांना आवडत आहेत. गेल्यावर्षी कंपनी ने एकापेक्षा एक फोन भारतात लॉन्च केले आणि या फोनचे लोकांनी कौतुक पण केले. यामुळेच नंबर एकची पोजिशन कंपनी ने अजूनच मजबूत केली. तसेच नवीन वर्षात पण शाओमीचा असाच प्लान आहे. एक पेक्षा एक शाओमी फोन येणार आहेत आणि त्यांची झलक आतापासूनच मिळायला सुरवात झाली आहे. खाली आम्ही अशाच 5 दमदार शाओमी फोनचा उल्लेख केला आहे जे 2019 मध्ये येणार आहेत.

1. रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो

शाओमी ने रेडमी ब्रँड वेगळा केला आहे अर्थात आता रेडमी फोन शाओमी रेडमी म्हणून ओळखेल जाणार नाहीत. तसेच रेडमी अंतर्गत कंपनी ने पहिला फोन नोट 7 चीन मध्ये सादर केला आहे. आशा आहे कि लवकरच हा फोन भारतात पण उपलब्ध होईल. याची सर्वात मोठी खासियत अशी कि फोन मध्ये डुअल कॅमेरा आहे आणि मेन सेंसर 48-मेगापिक्सलचा आहे जो एफ/1.8 अपर्चर सह येतो. तर दुसरा सेंसर 5-मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. कमी रेंजच्या फोन मध्ये इतका मोठा सेंसर आधी आलेला नाही. फोनचा फ्रंट कॅमेरा 13-मेगापिक्सलचा आहे. रेडमी नोट 7 मध्ये 4,000 एमएएच ची बॅटरी आहे आणि यात यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे. या फोन मध्ये 6.3-इंचाची स्क्रीन मिळेल. कंपनी ने हा 19:9.5 आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे. कंपनी ने हा मीडियाटेक चिपसेट सह सादर केला आहे आणि फोन मध्ये 6जीबी रॅम देण्यात आला आहे.

2. शाओमी मी मिक्स 3 5जी

शाओमी ने गेल्यावर्षी मी मिक्स 3 मॉडेल चीन मध्ये सादर केला होता आणि लॉन्चच्या वेळी कंपनी ने याच्या 5जी वेरियंटची घोषणा केली होती. बातमी आहे कि लवकरच हा फोन लॉन्च होणार आहे. माहितीनुसार कंपनी 24 फेब्रुवारीला हा फोन मोबाईल वर्ल्ड कॉन्ग्रेस मध्ये लॉन्च करू शकते. तसेच हा फोन मार्च मध्ये भारतात पण येऊ शकतो. माहितीनुसार फोन मध्ये 6.39-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनी हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर सादर करू शकते आणि फोन मध्ये 6जीबी रॅम मिळू शकतो. सोबत 12-एमपी+12-एमपी रियर आणि 24-एमपी+2-एमपी फ्रंट कॅमेरा असू शकतात.

3. शाओमी मी 9

शाओमी मी 9 ची पण चर्चा खूप जोरात सुरू आहे. 2019 च्या पहिल्या तिमाही पर्यंत हा पण सादर केला जाऊ शकतो. या फोन बद्दल पण आतापर्यंत अनेक स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. मी 9 कंपनी पूर्णपणे बेजल लेस बनवू शकते आणि हा 6.4-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार हा फोन 10जीबी रॅम सह येऊ शकतो. तसेच कंपनी हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर लॉन्च करू शकते जो 5जी सपोर्ट सह येतो. हा फोन 48-मेगापिक्सल + 13-मेगापिक्सल + 16-मेगापिक्सलच्या तीन कॅमेरा सेंसर सह लॉन्च होऊ शकतो. तसेच या फोन सह कंपनी वायरलेस चार्जिंग सादर करू शकते.

4. रेडमी वाय 3

गेल्यावर्षी कंपनी ने शाओमी रेडमी वाय 2 मॉडेल भारतात सादर केला होता. तसेच यावेळी वाय 3 लॉन्च केला जाऊ शकतो. जरी या फोनबद्दल सध्या कोणतेही लीक नसले तरी आपल्याला माहित आहे कि कंपनीची वाय सीरीज सेल्फी साठी खास असते. त्यामुळे वाय 3 मध्ये पण दमदार सेल्फी कॅमेरा असू शकतो. शाओमी ने 48-मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्याची सुरवात केली आहे त्यामुळे आशा करू शकतो कि रेडमी वाय3 अशाच काही फीचर्स सह येईल.

5. शाओमी मी ए3

आतापर्यंत शाओमी ने गूगल इंटीग्रेशन सह मी ए1 सर्वात आधी सादर केला होता. हा फोन वर्ष 2017 मध्ये लॉन्च झाला होता. तसेच 2018 मध्ये कंपनी ने याचा अपग्रेड वर्जन मी ए2 सादर केला होता. आशा करू शकतो कि 2019 मध्ये शाओमी मी ए3 सादर केला जाऊ शकतो. मिड रेंजचा हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस वर आधारित असेल सोबतच कंपनी याला क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर सादर करू शकते. तसेच फोन मध्ये दमदार सेल्फी कॅमेरा पण मिळू शकतो.

The post 2019 मध्ये शाओमीचे हे 5 दमदार फोन होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-5-xiaomi-phone-to-launch-in-2019-in-india-in-marathi/feed/ 0