Vivo 11 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 17 Aug 2018 08:04:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 वीवो घेऊन येत आहे ‘वी’ शेप नॉच वाला वी11 स्मार्टफोन, यात असेल 6जीबी रॅम, 6.41-इंचाचा एमोलेड डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/vivo-v11-renders-leak-with-specifications-features-display-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v11-renders-leak-with-specifications-features-display-in-marathi/#respond Fri, 17 Aug 2018 08:04:01 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1732 वीवो ने वीवो वी11 बद्दल कोणतीही घोषणा केली नाही पण एका लीक मधून या फोन चे आॅफिशियल डाक्यूमेंट आणि फोटो समोर आले आहेत.

The post वीवो घेऊन येत आहे ‘वी’ शेप नॉच वाला वी11 स्मार्टफोन, यात असेल 6जीबी रॅम, 6.41-इंचाचा एमोलेड डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो ने भारतात आपल्या नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन्सची सुरवात वी सीरीज च्या वी9 स्मार्टफोन पासून केली होती. हा स्मार्टफोन दिसायला जितका शानदार आहे त्याचे स्पेसिफिकेशन्स पण तितकेच दमदार आहेत. पण आता बातमी अशी येत आहे की कंपनी वी स्मार्टफोन सीरीज ला पुढे नेत नेक्स्ट जेनेरेशन स्मार्टफोन वी11 लॉन्च करण्याची तयारी करत आहे. वीवो ने वीवो वी11 बद्दल कोणतीही घोषणा केली नाही पण एका लीक मधून या फोन चे आॅफिशियल डाक्यूमेंट आणि फोटो समोर आले आहेत.

वीवो वी11 ची ही डाक्यूमेंट फाइल समोर आल्यामुळे फोन चे सर्व स्पेसिफिकेशन्स समजले आहेत. या डाक्यूमेंट मध्ये सांगण्यात आले आहे की वी11 स्मार्टफोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात येईल ज्यात 6.41-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात येईल. फोनचा डिसप्ले सुपर एमोलेड असेल तसेच वीवो नेक्स प्रमाणे या स्मार्टफोन मध्ये पण अंडर-डिसप्ले फिंगर​प्रिंट सेंसर असेल. तसेच फोन मध्ये ओपो एफ9 प्रो सारख छोटीशी ‘V’ आकाराची नॉच देण्यात येईल.

लीक नुसार वीवो वी11 फनटच ओएस सोबत एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर करण्यात येईल तसेच या फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट दिला जाऊ शकतो. कंपनी ने या फोन मध्ये 6जीबी रॅम देऊ शकते. तर फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येईल. सोबतच हा फोन डुअल सिम आणि 4जी एलटीई पण सपोर्ट करेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वी11 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर मिळतील. तर सेल्फी साठी फोन च्या फ्रंट पॅनल वर 25-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर मिळू शकतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,400एमएएच ची बॅटरी मिळू शकते. फोनची लॉन्च डेट आणि हा कोणत्या किंमतीत लॉन्च केला जाईल यासाठी वीवो च्या घोषणेची वाट बघावी लागेल.

The post वीवो घेऊन येत आहे ‘वी’ शेप नॉच वाला वी11 स्मार्टफोन, यात असेल 6जीबी रॅम, 6.41-इंचाचा एमोलेड डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v11-renders-leak-with-specifications-features-display-in-marathi/feed/ 0