Vivo APEX 2019 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 24 Jan 2019 13:21:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 12जीबी रॅम सह सादर झाला वीवोचा अपेक्स 2019, हा फोन आहे पूर्णपणे बटण आणि होल लेस https://www.91mobiles.com/marathi/vivo-apex-2019-official-12gb-ram-full-screen-fingerprint-sensor-button-less-design-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-apex-2019-official-12gb-ram-full-screen-fingerprint-sensor-button-less-design-in-marathi/#respond Thu, 24 Jan 2019 13:21:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3446 निश्चितच हा वीवोचा आतापर्यंत लॉन्च झालेल्या सर्व स्मार्टफोन्स पेक्षा वेगळा आणि शानदार आहे.

The post 12जीबी रॅम सह सादर झाला वीवोचा अपेक्स 2019, हा फोन आहे पूर्णपणे बटण आणि होल लेस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो ने काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि कंपनी फेब्रुवारी मध्ये नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे जो फक्त डिजाईन व लुक मध्ये खूप खास व अनोखा नसेल तर सोबतच या फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पण याला इतरांपेक्षा वेगळा आणि दमदार ठरवतील. जेव्हा पासून घोषणा झाली आहे कि वीवो अपेक्स 2019 स्मार्टफोन आणणार आहे तेव्हापासून समोरून टेक विश्व् व स्मार्टफोन यूजर्स या फोनची वाट बघत आहेत. पण आज सर्व टेक प्रेमींची प्रतीक्षा संपवत वीवो ने अपेक्स 2019 सादर केला आहे. निश्चितच हा वीवोचा आतापर्यंत लॉन्च झालेल्या सर्व स्मार्टफोन्स पेक्षा वेगळा आणि शानदार आहे.

वीवो ने अपेक्स 2019 कालच लॉन्च झालेल्या मीजू जीरो प्रमाणे सुपर यूनिबॉडी डिजाईन वर बनेलला आहे. या फोन मध्ये एकही फिजिकल बटण देण्यात आलेले नाही किंवा या फोन मध्ये कोणताही स्लॉट व होल नाही. म्हणजे अपेक्स 2019 मध्ये सिर्म कार्ड स्लॉट देण्यात आलेला नाही किंवा कोणताही यूएसबी पोर्ट नाही. तसेच कंपनी ने या फोन मध्ये ऑडियो जॅक व स्पीकर ​ग्रिल पण देण्यात आलेले नाही. वीवो अपेक्स 2019 मधून पावर बटण तसेच वाल्यूम रॉकर बटण पण गायब आहे. या फोन मध्ये कोणताही हार्डवेयर बटण पण देण्यात आलेले नाही.

अपेक्स 2019 जगातील पहिला फोन बनला आहे ज्यात फुल ​स्क्रीन फिंगरप्रिंट रेक्ग्नेशन आहे. म्हणजे या फोनच्या संपूर्ण डिस्प्ले वर कुठेही फिंगर टच केल्यास हा अनलॉक होईल. साधारणतः फोन डिस्प्ले वर खालच्या बाजूलाच हा सेंसर असतो. पण वीवो अपेक्स 2019 चा संपूर्ण डिस्प्लेच या सेंसर ने बनला आहे. कुठेही टच करा, हा फोन यूजरचे फिंरगप्रिंट रीड करेल आणि फोन अनलॉक होईल. वीवो अपेक्स 2019 वॉटर व डस्ट प्रूफ आहे.

फोन पूर्णपणे ग्लॉस वर बनला आहे जी दोन्ही बाजूला कर्व्ड आहे. मजबूती देण्यासाठी ​अपेक्स 2019 ला स्क्रीन लेयरने प्रोटेक्ट केले गेले आहे. या फोन ई-सिम सपोर्ट आहे म्हणजे सिम एकदा एक्टिव केल्यास ते मोबाईल मध्ये टाकण्याची गरज नाही. फोन आपोआप सिम नेटवर्क वर चालेल. वीवो ने आपला हा फोन ​स्क्रीन साउंड टेक्नॉंलॉजीने सुसज्ज केला आहे. या फोनचा डिस्प्लेचा ध्वनी निर्मिती करतो. फोन मध्ये स्पीकरची गरजच नाही.

स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर अपेक्स 2019 वीवो द्वारा 12जीबी च्या पावरफुल रॅम सह सादर केला गेला आहे तसेच हा फोन 512जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. प्रोसेसिंग बद्दल बोलायचे तर कपंनी ने अपेक्स 2019 क्वालकॉमच्या सर्वात नवीन आणि ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 ने सुसज्ज केला आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये पॉप-अप कॅमेरा आहे. हा कॅमेरा सेल्फीची कमांड देताच फोन बॉडीच्या बाहेर येतो.

वीवो अपेक्स 2019 वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन मीका व्हाईट, टायटेनियम सिल्वर आणि स्ट्रोनियम लाइम कलर मध्ये सादर केला आहे.

The post 12जीबी रॅम सह सादर झाला वीवोचा अपेक्स 2019, हा फोन आहे पूर्णपणे बटण आणि होल लेस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-apex-2019-official-12gb-ram-full-screen-fingerprint-sensor-button-less-design-in-marathi/feed/ 0
वीवोचा अनोखा फोन अपेक्स 2019 होत आहे 24 जानेवारीला लॉन्च, हा करेल नव्या टेक्नॉलॉजीची सुरवात https://www.91mobiles.com/marathi/vivo-apex-2019-to-launch-on-24-january-full-display-feature-specifications-technology-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-apex-2019-to-launch-on-24-january-full-display-feature-specifications-technology-in-marathi/#respond Fri, 18 Jan 2019 11:36:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3411 अपेक्स 2019 मध्ये सर्व आधुनिक फीचर्स व टेक्नॉलॉजी असेल तसेच या फोनचे फीचर्स वीवोच्या आगामी स्मार्टफोन्स मध्ये पण दिसतील.

The post वीवोचा अनोखा फोन अपेक्स 2019 होत आहे 24 जानेवारीला लॉन्च, हा करेल नव्या टेक्नॉलॉजीची सुरवात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी वीवो ने या आठवड्यात सोशल प्लॅटफॉर्म वर पोस्ट करून सांगितले होते ​कि कंपनी येत्या 24 जानेवारीला एक यूनिक आणि अनोखा स्मार्टफोन टेक विश्वासमोर सादर करणार आहे. वीवो ने या लॉन्चची ईमेज टीजर शेयर केली होती पण कंपनी ने फोनचे नाव गुलदस्त्यात ठेवले होते. पण आज याच माइक्रोब्लागिंग साइट वर अजून एक पोस्ट शेयर करत वीवो ने सांगितले आहे कि 24 जानेवारीला लॉन्च होणार हा शानदार स्मार्टफोन ‘वीवो अपेक्स 2019’ असेल.

वीवो ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो च्या माध्यमातून आगामी स्मार्टफोनचे नाव सार्वजनिक केले आहे. वीवो येत्या 24 तारखेला अपेक्स 2019 नावाने नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल. हा फोन गेल्यावर्षी सादर केलेल्या अपेक्स फोनचा नवीन वर्जन असेल जो आधीच्या मॉडेल पेक्षा जास्त एडवांस आणि स्मार्ट असेल. सर्वात आधी तुम्हाला वीवो अपेक्स बद्दल सांगायचे तर हा फोन पॉप-अप कॅमेऱ्यासह लॉन्च केला गेला होता.

अपेक्स 2019 मध्ये पण हीच टेक्नॉलॉजी असू शकते जी जुन्या मॉडेलपेक्षा पण एडवांस असेल. अपेक्स 2019 मध्ये डुअल फ्रंट कॅमेरा जो सेल्फी कमांड देताच फोनच्या बॉडीतून बाहेर येईल असे होऊ शकते. वीवो द्वारा शेयर केल्या गेलेल्या अपेक्स 2019 च्या फोटो मध्ये फोन पूर्णपणे बेजल लेस दाखवण्यात आला आहे. फोनच्या चारही किनारे कर्व्ड आहेत तसेच फ्रंट पॅनल वर इतर कोणताही बॉडी पार्ट दिसत नाही.

A year ago, the Vivo APEX introduced a new world with it's full-screen. Next, the Vivo APEX 2019 will take another leap into a minimalist future with the power of technology. Experience it January 24th.

Vivo यांनी वर पोस्ट केले गुरुवार, १७ जानेवारी, २०१९

वीवो द्वारा आधी शेयर केल्या गेलेल्या ईमेज टीजर मध्ये वॉटर ड्रॉप दाखवण्यात आली होती. पण फोनच्या टीजर ईमेज मध्ये फुल व्यू डिस्प्ले पण दाखवण्यात आला आहे त्यामुळे बोलले जात आहे कि या फोन मध्ये कोणतीही नॉच नसेल तसेच हा फोन वॉटरप्रूफ असेल. वीवो नेक्स पाहता या फोन मध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला होता. या फोनचा हा सेंसर डिस्प्लेच्या खालच्या भागात होता, त्यामुळे स्क्रीन वर कुठेही टच करताच हा अनलॉक होत होता.

वीवो अपेक्स 2019 मध्ये पण कंपनी आपली हि टेक्नोलॉजी पुन्हा आणू शकते. अपेक्स 2019 च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल वीवो ने अजूनतरी कोणतीही माहिती दिली नाही पण बोलले जात आहे कि कपंनी आपला हा अनोखा डिवाईस पण कॉसेप्ट फोन म्हणून सादर करेल. अपेक्स 2019 मध्ये सर्व आधुनिक फीचर्स व टेक्नॉलॉजी असेल तसेच या फोनचे फीचर्स वीवोच्या आगामी स्मार्टफोन्स मध्ये पण दिसतील.

The post वीवोचा अनोखा फोन अपेक्स 2019 होत आहे 24 जानेवारीला लॉन्च, हा करेल नव्या टेक्नॉलॉजीची सुरवात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-apex-2019-to-launch-on-24-january-full-display-feature-specifications-technology-in-marathi/feed/ 0