Vivo APEX Concept - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 24 Feb 2020 12:33:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 28 फेब्रुवारीला लॉन्च होईल वीवोचा सर्वात अनोखी डिजाईन असलेला फोन Vivo APEX 2020 https://www.91mobiles.com/marathi/vivo-apex-2020-to-launch-on-29-february-design-specifications-features/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-apex-2020-to-launch-on-29-february-design-specifications-features/#respond Mon, 24 Feb 2020 12:33:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6659 या फोन लॉन्चसाठी वीवो कोणत्याही ईवेंटचे आयोजन करणार नाही तर आनलाईन लॉन्चच्या माध्यमातून APEX 2020 बाजारात येईल.

The post 28 फेब्रुवारीला लॉन्च होईल वीवोचा सर्वात अनोखी डिजाईन असलेला फोन Vivo APEX 2020 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने गेल्यावर्षी आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत APEX 2019 स्मार्टफोन सादर केला होता. हा फोन इतक्या अनोख्या डिजाईन सह आला होता कि यात एक पण बटण किंवा पोर्ट नव्हते. यूनिबॉडी 3डी डिजाईन वर बनलेल्या Vivo APEX 2019 चे खूप कौतुक झाले होते. यावर्षी मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस 2020 मध्ये वीवो अपेक्स फोनचा नवीन मॉडेल सादर करणार होती पण MWC रद्द झाल्यामुळे त्यावर पाणी पडले. पंरतु आता वीवोने अधिकृतपणे घोषणा केली आहे कि Vivo APEX 2020 स्मार्टफोन येत्या 28 फेब्रुवारीला टेक विश्वासमोर सादर केला जाईल.

Vivo ने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट करत घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 28 फेब्रुवारीला आपला नवीन नेक्स्ट जेनरेशन स्मार्टफोन APEX 2020 सादर करेल. या फोन लॉन्चसाठी वीवो कोणत्याही ईवेंटचे आयोजन करणार नाही तर आनलाईन लॉन्चच्या माध्यमातून APEX 2020 बाजारात येईल. Vivo ने अजूनतरी अपेक्स 2020 चे स्पेसिफिकेशन्स सांगितले नाहीत पण लॉन्च टीजर वरून समजले आहे कि हा डिवाईस 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्ले सह येईल तसेच फोन मध्ये पेरिस्कोप झूम लेंस असलेला रियर कॅमेरा दिला जाईल.

Vivo Z6 5G

वीवोने गेल्याच आठवड्यात वेईबो वर एक पोस्ट शेयर करत सांगितले होते कि कंपनी 29 फेब्रुवारीला वीवो झेड6 5जी नावाचा एक नवीन स्मार्टफोन चीनी मार्केट मध्ये लॉन्च करेल. हा स्मार्टफोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल जो स्क्रीनच्या डावीकडे असेल. वीवो झेड6 चे डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस असतील तसेच खालच्या बाजूला थोडा रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे.

Vivo Z6 5G च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये तीन सेंसर एका रांगेत देण्यात आले आहेत तसेच चौथा सेंसर आणि फ्लॅश लाईट या रांगेत उजवीकडे आहेत. वीवो झेड6 5जी च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे तसेच पॅनल वर खालच्या बाजूला Vivo ची ब्रँडिंग देण्यात आली आहे जिथे 5G लिहिण्यात आले आहे. फोनच्या साईड पॅनल वर पावर बटण आणि वॉल्यूम रॉकर देण्यात आला आहे तसेच लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट व स्पीकर आहे.

वीवो झेड6 5जी च्या टीजर ईमेज मध्ये सांगण्यात आले आहे कि हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट वर लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे हा चिपसेट डुअल मोड 5जी नेटवर्क (SA-NSA)ला सपोर्ट करतो. ईमेज वर सांगण्यात आले आहे कि Vivo Z6 5G 5,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह बाजारात येईल तसेच हा फोन मोठ्या बॅटरी सोबतच 44वॉट फास्ट चार्जिंग फीचरला पण सपोर्ट करेल. समोर आलेल्या फोटो मध्ये Vivo Z6 5G ब्लॅक, ब्लू आणि पर्पल कलर मध्ये दिसला आहे. असे असले तरी Vivo Z6 5G भारतात लॉन्च होईल कि नाही यावर शंका आहे.

The post 28 फेब्रुवारीला लॉन्च होईल वीवोचा सर्वात अनोखी डिजाईन असलेला फोन Vivo APEX 2020 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-apex-2020-to-launch-on-29-february-design-specifications-features/feed/ 0