Vivo Nex Dual Screen Edition - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 12 Dec 2018 11:25:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 10जीबी रॅम, दोन डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेर्‍या सह लॉन्च झाला वीवो नेक्स ​डुअल स्क्रीन एडिशन https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-dual-screen-edition-launched-with-10gb-ram-and-tripal-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-dual-screen-edition-launched-with-10gb-ram-and-tripal-camera-in-marathi/#respond Wed, 12 Dec 2018 11:25:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3130 कंपनी ने हा नेक्स 2 ऐवजी वीवो नेक्स डु​अल डिस्प्ले एडिशन नावाने सादर केला आहे.

The post 10जीबी रॅम, दोन डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेर्‍या सह लॉन्च झाला वीवो नेक्स ​डुअल स्क्रीन एडिशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या अनेक दिवसांपासून वीवोच्या नवीन नेक्स फोनची चर्चा होती. बोलले जात होते की कंपनी डुअल स्क्रीन सह हा फोन सादर करू शकते. पण अशी माहिती देण्यात आली होती की हा नेक्स 2 नावाने सादर केला जाईल. कंपनी ने फोन लॉन्च केला पण नाव बदललेले. काल संध्याकाळी वीवो ने हा फोन सादर केला आहे. कंपनी ने हा नेक्स 2 ऐवजी वीवो नेक्स डु​अल डिस्प्ले एडिशन नावाने सादर केला आहे. या फोन मध्ये दोन फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूला स्क्रीन आहे. तसेच जुन्या नेक्स मॉडेल पेक्षा स्पेसिफिकेशनच्या बाबतीत हा थोडा अपग्रेडड पण आहे.

विशेष म्हणजे वीवो नेक्स जगातील पहिला फोन होता ज्यात पॉपअप कॅमेरा देण्यात आला होता. पण नवीन नेक्स डुअल स्क्रीन मध्ये तुम्हाला हे फीचर मिळणार नाही. पण यावेळी बॅक पॅनल वर तीन कॅमेरा आहेत. तर फ्रंटला कोणताही कॅमेरा नाही. बॅक कॅमेऱ्याने स्क्रीन च्या मदतीने तुम्ही सेल्फी घेऊ शकता. फोन मध्ये ​प्राइमरी सेंसर 12—मेगापिक्सलचा आहे. जो एफ/1.79 अपर्चर सह येतो. यासाठी कंपनी ने 1/2.56 ​इंच वाले डुअल पिक्सल सेंसरचा वापर केला आहे. तर दुसरा सेंसर 2—मेगापिक्सलचा आहे जो नाइट वीजन साठी आहे. तर फोन मध्ये तीसरा सेंसर टीओएफ अर्थात 3डी कॅमेरा आहे. फोनचा नाइट वीजन आणि टीओएस कॅमेरा एफ/1.8 आणि एफ/1.3 अपर्चरला सपोर्ट करतो.

या सोबत फोन मध्ये 4एक्स झूम आणि आॅप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सपोर्ट आहे. फोनच्या मागील पॅनल मध्ये फ्लॅश सोबत एलईडी लुनार रिंग देण्यात आली आहे जी सेल्फीच्या वेळी चमकते ज्यामुळे तुम्ही कमी प्रकाशात पण चांगली सेल्फी घेऊ शकता. तसेच यामुळे हा फोन वेगळाच वाटतो. अशा प्रकारचे इंटीग्रेशन तुम्हाला पहिल्यांदाच एका फोन मध्ये दिसेल.

वर सांगितल्याप्रमाणे वीवो नेक्स डुअल डिस्प्ले एडिशन मध्ये डुअल स्क्रीन आहे. फोनच्या फ्रंट पॅनल मध्ये 6.39-इंचाची सुपर एमोलेड स्क्रीन आहे जी 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह येते. तसेच फुल एचडी+ 1080 x 2340 पिक्सल रेजल्यूशन सह उपलब्ध आहे आणि याचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 91.63 टक्के आहे.

तर मागील पॅनल मध्ये पण कंपनी ने सुपर एमोलेड डिस्प्ले दिला आहे. मागील डिस्प्ले 5.49—इंचाचा आहे आणि हा पण 1920×1080 पिक्सल वाल्या फूल एचडी ला सपोर्ट करतो. पण मागे 16:9 आसपेक्ट रेशियो वाली स्क्रीन आहे. वीवोचा नवीन नेक्स फनटच ओएसला सपोर्ट करतो जो एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे.

डिस्प्ले आणि कॅमेर्‍या सह याचा प्रोसेसर आणि रॅम पण तुम्ही नोटिस कराल. फोन मध्ये 10जीबी रॅम देण्यात आला आहे. तर जुन्या नेक्स प्रमाणे हा पण क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो. यात 2.8गीगाहट्र्ज चा क्रयो आर्किटेक्चर वाला आॅक्टाकोर प्रोसेसर आहे जो दमदार आहे. फोनची इंटरनल स्टोरेज 128जीबी आहे. हा फोन वीवो टर्बो टेक्नोलॉजीला सपोर्ट करतो आणि कंपनीचा दावा आहे की गेमिंग परफॉर्मेंस याने चांगली होईल.

वीवो नेक्स डुअल डिसप्ले एडिशन मध्ये 3,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 22.5 वॉट वाल्या फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते. तर कंपनी ने यात यूएसबी टाइप सी 2.0 दिला आहे. इतर कनेक्टिविटी आॅप्शन म्हणून डुअल सिम एलटीई, वाईफाई, ब्लूटूथ आणि जीपीएस आहे. तसेच सिक्योरिटी साठी फेस अनलॉक सोबत इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

The post 10जीबी रॅम, दोन डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेर्‍या सह लॉन्च झाला वीवो नेक्स ​डुअल स्क्रीन एडिशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-dual-screen-edition-launched-with-10gb-ram-and-tripal-camera-in-marathi/feed/ 0