Vivo S6 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 01 Apr 2020 12:13:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4500 mAh बॅटरी सह लॉन्च झाला Vivo S6 5G, देईल का Xiaomi ला टक्कर https://www.91mobiles.com/marathi/vivo-s6-5g-launch-in-china-with-32mp-selfie-camera-4500-mah-battery-android-10-know-price-specification-and-everything/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s6-5g-launch-in-china-with-32mp-selfie-camera-4500-mah-battery-android-10-know-price-specification-and-everything/#respond Wed, 01 Apr 2020 12:13:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6958 Vivo S6 5G कंपनीने दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे.

The post 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4500 mAh बॅटरी सह लॉन्च झाला Vivo S6 5G, देईल का Xiaomi ला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने आपल्या घरच्या मार्केट मध्ये एक ऑनलाइन इवेंटचे आयोजन करून S6 5G फोन सादर केला आहे. हा डिवाइस कंपनीच्या Vivo S5 चा अपग्रेड म्हणून मार्केट मध्ये आला आहे. डिवाइस सुपर-फास्ट 5 जी सपोर्ट आणि Exynos 980 सह लॉन्च केला गेला आहे. चला जाणून घेऊया फोन बद्दल सर्वकाही.

डिजाइन

वीवो एस6 5जी कंपनीने हा 3डी कर्व्ड डिजाइन सह सादर केला आहे. फोन ग्रेडिएंट पर्पल-ब्लू आणि लाइट ब्लू कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे. डिवाइसच्या फ्रंटला कंपनीने वॉटर ड्रॉप नॉचचा वापर केला आहे. तर बॉटमला असलेले बेजल्स थोडे जाड आहेत. पण टॉप, लेफ्ट व राइट साइडला असलेले बेजल्स कमी आहेत. फोनच्या मागे हा फोन कंपनीने सर्कुलर कॅमेरा मॉड्यूल सह सादर केला आहे, ज्यात क्वाड कॅमेरा सेटअप आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाइट आणि त्याखाली वीवोची ब्रॅंडिंग आहे. यूजर्सना फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. डिवाइसच्या उजवीकडे पावर बटण आणि ऑन-ऑफ बटण आहे.

किंमत

Vivo S6 5G कंपनीने दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. डिवाइसच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 2698 yuan (जवळपास 28,766) आणि 8GB व 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 2998 yuan (जवळपास 31,925 रुपये) आहे. डिवाइस चीन मध्ये 3 एप्रिल पासून वीवोच्या अधिकृत स्टोर, टीमॉल, जेडी.कॉम आणि इतर अनेक मोठ्या ऑफलाइन स्टोर्स वर विकला जाईल.

स्पेसिफिकेशन्स

फोन मध्ये 6.44-inch AMOLED HDR10 सर्टिफाइड वॉटर ड्रॉप नॉच फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 2400 × 1080 पिक्सल आहे. त्याचबरोबर फोन मध्ये अपर मिड-रेंज 5G प्रोसेसर 8nm Exynos 980 आहे. सोबतच डिवाइसची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

पावर बॅकअपसाठी वीवो एस6 5जी मध्ये 4500mAh ची बॅटरी असेल जी वीवो S5 पेक्षा मोठी आहे. S6 5G मध्ये फक्त 18W चार्जिंग टेक्नोलॉजीचा सपोर्ट आहे. विशेष म्हणजे S5 मध्ये 22.5W चा चार्जर होता. Vivo च्या या फोन मध्ये कनेक्टिविटीसाठी डेडिकेटिड 3.5mm हेडफोन जॅक, वाई-फाई एसी आणि ब्लूटूथ 5.1 सारखे ऑफ्शन देण्यात आले आहेत. हा फोन एंड्रॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालेल.

कॅमेरा

कॅमेऱ्याबाबत बोलायचे तर कंपनीने या फोन मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलची डेप्थ ऑफ फिल्ड लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे जी 4cm अंतरावरून शॉट्स घेण्यासाठी आहे. वीवो एस 6 4K वीडियो शूटिंग आणि 1080 पी रियल-टाइम ब्यूटी मोड शूटिंगला पण सपोर्ट करतात.

Vivo S6 5G चे मुख्य आकर्षण याचा फ्रंट कॅमेरा आहे. यात 32MP सेल्फी शूटर देण्यात आला आहे, जो f / 2.08 अपर्चर सह येतो. S6 च्या फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये EIS सपोर्ट आहे. यात एक नवीन सुपर-क्लियर नाइट व्यू सेल्फी मोड आहे जो नवीन सुपर नाइट व्यू एल्गोरिदमचा वापर करतो आणि सेल्फी शूटर मध्ये सेल्फीसाठी 6 प्रीसेट ब्यूटी मेकअप मोड पण आहेत.

The post 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4500 mAh बॅटरी सह लॉन्च झाला Vivo S6 5G, देईल का Xiaomi ला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s6-5g-launch-in-china-with-32mp-selfie-camera-4500-mah-battery-android-10-know-price-specification-and-everything/feed/ 0