Vivo V1963A - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 06 Jan 2020 17:25:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo पण घेऊन येत आहे स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट असलेला 5G फोन, Redmi K30 आणि OPPO Reno 3 ला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/vivo-v1963a-5g-phone-listed-on-geekbench-with-snapdragon-765g-realme-x50-redmi-k30-oppo-reno-3/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v1963a-5g-phone-listed-on-geekbench-with-snapdragon-765g-realme-x50-redmi-k30-oppo-reno-3/#respond Mon, 06 Jan 2020 17:25:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6202 मीडिया मध्ये चर्चा आहे कि Vivo V1963A मॉडेल नंबर असलेला फोन वीवोच्या Z सीरीज किंवा S सीरीज मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Vivo पण घेऊन येत आहे स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट असलेला 5G फोन, Redmi K30 आणि OPPO Reno 3 ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवोने आलियाकडेच भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Vivo S1 Pro लॉन्च केला आहे. हा मोबाइल 19,900 रुपयांमध्ये मार्केट मध्ये आणला आहे जो 48मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेरा आणि 4500एमएएच बॅटरी सह 8 जीबी पावरफुल रॅमला सपोर्ट करतो. 4जी चे एकापेक्षा एक चांगले स्मार्टफोन आणल्यानंतर आता हि कंपनी कमी किंमतीचा 5G फोन आणण्याची तयारी करत आहे. Vivo चा एक नवीन स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट झाला आहे जिथे खुलासा झाला आहे कि वीवो एका नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो क्वॉलकॉमच्या 5जी चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 765जी वर लॉन्च केला जाईल.

Vivo चा हा स्मार्टफोन गीकबेंच वर Vivo V1963A मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग 3 जानेवारीची आहे ज्यात फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा पण झाला आहे. Vivo V1963A गीकबेंच वर Snapdragon 765G चिपसेट सह दाखवण्यात आला आहे. क्वॉलकॉमचा हा चिपसेट डुअल मोड 5जी (SA/NSA) ला सपोर्ट करतो. या चिपसेटमुळे 5G कनेक्टिविटी असलेले स्मार्टफोन मीड रेंज मध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे Redmi K30 5G आणि OPPO Reno3 5G या चिपसेट वर आधीच लॉन्च झाले आहेत आणि Realme X50 पण स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट सह उद्या लॉन्च होणार आहे.

Vivo च्या या आगामी स्मार्टफोनबद्दल बोलायचे तर गीकबेंच वर हा डिवाईस एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे. तसेच बेंचमार्किंग साइट वर हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम सह लिस्ट झाला आहे. गीकबेंचवरील स्कोर पाहता सिंगल-कोर मध्ये या फोनला 2129 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 5279 स्कोर देण्यात आला आहे. अजूनही फोनचे नाव व लॉन्च संबंधित इतर स्पेससिफिकेशन्स समोर आले नाहीत. मीडिया मध्ये चर्चा आहे कि Vivo V1963A मॉडेल नंबर असलेला फोन वीवोच्या Z सीरीज किंवा S सीरीज मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

Vivo S1 Pro

वीवो एस1 प्रो बद्दल बोलायचे तर हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.38 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड फुलव्यू डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन फनटच ओएस 9.2 आधारित एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च झाला आहे जो क्चॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. या फोन मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

फोनच्या बॅक पॅनल वर डायमंड शेपचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेंसर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Vivo S1 Pro डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4,500 एमएएच ची बॅटरी आहे.

The post Vivo पण घेऊन येत आहे स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट असलेला 5G फोन, Redmi K30 आणि OPPO Reno 3 ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v1963a-5g-phone-listed-on-geekbench-with-snapdragon-765g-realme-x50-redmi-k30-oppo-reno-3/feed/ 0