Vivo V20 (2021) - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 24 Dec 2020 13:09:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 44MP सेल्फी कॅमेरा आणि 8GB रॅम सह लॉन्च झाला Vivo V20 (2021), जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-2021-launch-with-64mp-triple-camera-sale-on-amazon-india/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-2021-launch-with-64mp-triple-camera-sale-on-amazon-india/#respond Thu, 24 Dec 2020 13:09:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9440 वीवो वी 20 (2021) कंपनीने 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज वेरिएंट मधेच सादर केला आहे. Vivo V20 (2021) मध्ये 44 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो एफ/2.0 अपर्चर सह चालतो.

The post 44MP सेल्फी कॅमेरा आणि 8GB रॅम सह लॉन्च झाला Vivo V20 (2021), जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि कंपनी V-सीरीजच्या नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे, जो V20 (2021) नावाने सादर केला जाईल. ऑफिशियल लॉन्चच्या आधी फोन गुगल प्ले कंसोल वर स्पॉट झाला होता, जिथे फोनच्या काही फीचर्सची माहिती पण समोर आली होती. आता हा फोन कोणत्याही अधिकृत घोषणेविना ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडिया वर विक्रीसाठी सादर करण्यात आला आहे. या फोनच्या आधी ऑक्टोबर मध्ये भारतीय बाजारात कंपनीने Vivo V20 आणि Vivo V20 SE स्मार्टफोन लॉन्च केले होते.

V20 (2021) आणि Vivo V20 मध्ये फरक

V20 (2021) लुकच्या बाबतीत अगदी Vivo V20 सारखाच आहे. या दोन्ही फोन्स मधील फरक फक्त प्रोसेसरचा मिळेल. वीवो वी20 (2021) मॉडेल मध्ये कंपनीने क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730G प्रोसेसर दिला आहे तर वीवो वी20 मध्ये कंपनीने स्नॅपड्रॅगॉन 720G एसओसी दिला होता. स्टोरेजच्या बाबतीत पण दोन्ही फोन मध्ये फरक दिसेल. कंपनीने वीवो वी20 8 जीबी रॅम सह 128 जीबी आणि 8 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज वर सादर केला होता. तर, वीवो वी 20 (2021) कंपनीने 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज वेरिएंट मधेच सादर केला आहे. लुकच्या बाबतीत दोन्ही एक सारखे आहेत.

हे देखील वाचा : Huawei ने लॉन्च केले दोन दमदार 5G स्मार्टफोन्स Nova 8 आणि Nova 8 Pro, येत आहेत जबरदस्त फीचर्ससह

V20 (2021) चा लुक व डिजाइन

हा फोन नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे, ज्यामुळे फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस होतात आणि बॉटमला रुंद चिन पार्ट मिळतो. तसेच डिवाइसच्या बॉटमला टाइप-सी चार्चिंग पोर्ट आणि स्पीकर ग्रिल आहे. फोनच्या मागे कॅमेरा सेटअप पॅनलच्या वर डावीकडे चौकोनी आकारात देण्यात आला आहे ज्यात एक मोठ्या आकाराच्या सेंसर सह तीन सेंसर्स आहेत. सोबतच फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन मिळतो.

फोटोग्राफी

Vivo V20 (2021) मध्ये 44 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो एफ/2.0 अपर्चर सह चालतो. हा एक हि ऑटोफोकस लेंस आहे जी डिस्प्लेच्या वर वॉटरड्रॉप नॉच मध्ये आहे. रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनलवर डावीकडे चौकोनी आकारात देण्यात आला आहे ज्यात एक मोठ्या आकाराच्या सेंसर सह तीन सेंसर्स आहेत. फोनचा रियर कॅमेरा सेटअप एफ/1.89 अपर्चर असलेल्या 64-मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरला सपोर्ट करतो. फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे जी बोका इफेक्ट आणि मोनो शॉट घेऊ शकते. वीवो वी20 (2021) चा थर्ड रियर कॅमेरा एक 2-मेगापिक्सलची मोनोक्रोम लेंस आहे जी एफ/2.4 अपर्चर सह येते.

स्पेसिफिकेशन्स

वीवो वी20 (2021) चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर झाला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.12 टक्के आहे. या फोन मध्ये 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आली आहे जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह येतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट केला गेला आहे.

हे देखील वाचा : 8GB रॅम आणि 5000mAh बॅटरी सह लॉन्च झाला हा बजेट फोन, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Vivo V20 अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला गेला आहे जो फनटचओएस 11 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट देण्यात आला आहे. Vivo V20 (2021) एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या स्क्रीन वरच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी वीवो 20 (2021) मध्ये 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जो 33वॉट फ्लॅशचार्ज फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येतो.

किंमत

वीवो वी 20 (2021) कंपनीने 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज वेरिएंट मधेच सादर केला आहे. हा फोन अमेझॉन इंडिया वरून 24,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फोन दोन कलर ऑप्शन Sunset Melody आणि Midnight Jazz मध्ये येतो.

The post 44MP सेल्फी कॅमेरा आणि 8GB रॅम सह लॉन्च झाला Vivo V20 (2021), जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-2021-launch-with-64mp-triple-camera-sale-on-amazon-india/feed/ 0