Vivo Y12 2020 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 07 Jul 2020 10:06:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4 जीबी रॅम सह गूगल वर लिस्ट झाला हा नवीन स्मार्टफोन, लो बजेट मध्ये होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-y12-2020-v1926-google-play-console-specs-leaked-4gb-ram-snapdragon-665/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y12-2020-v1926-google-play-console-specs-leaked-4gb-ram-snapdragon-665/#respond Tue, 07 Jul 2020 10:06:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7603 Vivo Y12 2020 गूगल प्ले कंसोल वर दिसला आहे. या पेज वर हा फोन V1926 मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे.

The post 4 जीबी रॅम सह गूगल वर लिस्ट झाला हा नवीन स्मार्टफोन, लो बजेट मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने अलीकडेच भारतीय बाजारात आपली ‘वाय सीरीज’ वाढवत नवीन स्मार्टफोन Vivo Y30 लॉन्च केला आहे. हा फोन 14,490 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो 4 जीबी रॅम आणि क्वॉड रियर कॅमेऱ्यासह येतो. वीवो वाय30 नंतर आता या सीरीजच्या अजून एका नवीन स्मार्टफोनची माहिती समोर येत आहे ज्याचे नाव Vivo Y12 2020 सांगण्यात आले आहे. वीवो चा हा आगामी फोन गूगल सर्टिफिकेशन्स पेज वर लिस्ट झाला आहे जिथे लॉन्चच्या आधीच याच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

Vivo Y12 2020 गूगल प्ले कंसोल वर दिसला आहे. या पेज वर हा फोन V1926 मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे. या लिस्टिंग मध्ये आगामी वीवो फोन एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे. लिस्टिंग मध्ये फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर असल्याचे सांगण्यात आले आहे ज्या सोबतच V1926 मॉडेल नंबर असलेल्या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट असल्याचे समोर आले आहे.

कथित वीवो वाय12 2020 गूगल प्ले कंसोल वर 4 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू असल्याचे सांगण्यात आले आहे. लिस्टिंग मधील फोनच्या फोटो वरून समजले आहे कि हा वीवो डिवायस बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल तसेच फोनचे स्क्रीन रेज्ल्यूशन 1544 × 720 म्हणजे एचडी+ असेल. Vivo Y12 2020 बाबत कंपनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

Vivo Y30

वीवो वाय30 पाहता यात पंच होल डिस्प्ले सह 19.5:9 आस्पेक्ट रेशियो असलेला 6.47 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला एचडी+ डिस्प्ले मिळेल. हा फोन एंड्रॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो आणि यात तुम्हाला वीवोचा फन टच ओएस मिळेल. Vivo Y30 मीडियाटेक हेलिया पी35 चिपपसेट वर सादर केला गेला आहे आणि यात 2.3गीगाहट्र्जचा ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 4जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोन मध्ये तुम्हाला मेमरी कार्ड सपोर्ट पण मिळेल.

Vivo Y30 च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 13एमपी + 8एमपी + 2एमपी + 2एमपी चा कॅमेरा सेंसर मिळेल. फोनचा मुख्य सेंसर एफ/2.2 अपर्चर सह येतो. तसेच सेल्फीसाठी कंपनीने यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. ड्युअल सिम आधारित या फोन मध्ये 4जी वोएलटीई सपोर्ट आहे आणि त्याचबरोबर वायफाई आणि ब्लूटूथ पण मिळेल. सिक्योरिटीसाठी मागच्या पॅनल मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. तसेच फेस अनलॉक पण तुम्हाला मिळेल. राहिला प्रश्न बॅटरीचा तर कंपनीने यात 5,000 एमएएच ची मोठी बॅटरी दिली आहे.

The post 4 जीबी रॅम सह गूगल वर लिस्ट झाला हा नवीन स्मार्टफोन, लो बजेट मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y12-2020-v1926-google-play-console-specs-leaked-4gb-ram-snapdragon-665/feed/ 0