Vivo Y15 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 12 Nov 2019 11:50:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 VIVO ने भारतात पूर्ण केले 5 वर्ष, सेलिब्रेशन साठी देत आहे स्मार्टफोन्स वर भरभक्कम डिस्काउंट आणि 2999 रुपयांचे हेडफोन फ्री https://www.91mobiles.com/marathi/vivo-celebrates-5-years-in-india-sale-discount-free-offer-v17-v15-pro-s1-y17-y15-y12-price/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-celebrates-5-years-in-india-sale-discount-free-offer-v17-v15-pro-s1-y17-y15-y12-price/#respond Tue, 12 Nov 2019 11:50:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5749 आईसीआईसीआई तथा एचडीएफसी बॅंकेच्या ग्राहकांना फोनच्या खरेदीवर डिस्काउंट पण मिळेल. Vivo चा हा सेल 30 नोव्हेंबर पर्यंत चालू राहील.

The post VIVO ने भारतात पूर्ण केले 5 वर्ष, सेलिब्रेशन साठी देत आहे स्मार्टफोन्स वर भरभक्कम डिस्काउंट आणि 2999 रुपयांचे हेडफोन फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी कंपनी VIVO ने वर्ष 2014 मध्ये भारतीय बाजारात पाऊल ठेवले होते. या वर्षी कंपनी भारतात आपले 5 वर्ष पूर्ण करत आहे. या 5 वर्षात VIVO ने वेगवेगळ्या बजेट मध्ये अनेक स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, जे लोकांना आवडले आहे. VIVO ने वेळोवेळी भारतात आपली एडवांस टेक्नॉलॉजी पण दाखवली आहे आणि यात पॉप-अप कॅमेरा, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, डुअल पॉप-अप आणि पंच-होल डिस्प्ले यांचा पण समावेश आहे. VIVO 5 वर्षांचे यश साजरे करत आहे आणि आपल्या फॅन्स सोबत हा आनंद वाटत कंपनीने सेलचे आयोजन केले आहे.

अश्या आहेत ऑफर

आपल्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने वीवो ने Vivo Z1x चा नवीन वेरिएंट पण भारतात लॉन्च केला आहे. हा वेरिएंट 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो. कंपनीने हा नवीन फोन वेरिएंट 15,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तसेच डिस्काउंट ऑफर पाहता Vivo Z1x च्या 6 जीबी रॅम + 64 जीबी वेरिएंटची किंमत 16,990 रुपये तर 6 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 18,990 रुपये आहे. पण सेल मध्ये फोनचा 64 जीबी मेमरी वेरिएंट 15,990 रुपये आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 17,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

5,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Vivo चा स्वस्त स्मार्टफोन Vivo U10 या सेल मध्ये अजून स्वस्त मिळत आहे. फोनचा 3 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता पण सेल मध्ये हा वेरिएंट फक्त 9,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 10,990 रुपयांमध्ये लॉन्च झालेला Vivo U10 चा 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट सेल मध्ये फक्त 9,990 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.

एक्स्ट्रा बेनिफिट

डिस्काउंट सोबत Vivo शॉपिंग साइट अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि वीवो डॉट कॉम वरून ब्रँडच्या स्मार्टफोन्सच्या खरेदीवर 1,000 रुपयांचा कॅशबॅक पण देत आहे. जर ग्राहकांनी फोन विकत घेताना प्रीपेड पेयमेन्ट केले तर फोनच्या किंमतीती अतिरिक्त डिस्काउंट पण मिळेल. Vivo Z1 Pro आणि Vivo Z1x च्या खरेदीवर कंपनी 1,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देत आहे जो प्रीपेड पेमेंट करताना मिळेल. त्याचप्रमाणे Vivo U10 च्या खरेदीवर प्रीपेड पेमेंट मध्ये 500 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल.

हे देखील वाचा: 4जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज सह लॉन्च झाला 4500एमएएच बॅटरी आणि 32 एमपी सेल्फी कॅमेरा असलेला Vivo Z1x

Vivo Vivo V17 Pro तसेच Vivo V15 Pro च्या खरेदीवर एक्सचेंज ऑफर अंतर्गत 1,000 रुपयांची सूट देत आहे. त्याचप्रमाणे एक्सचेंज ऑफर अंतर्गत Vivo S1 स्मार्टफोन विकत घेतल्यास 700 रुपयांचा फायदा होईल. Vivo कडून एक्सचेंज ऑफर अंतर्गत Vivo Y17, Vivo Y15 आणि Vivo Y12 स्मार्टफोन विकत घेतल्यास 500 रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळत आहे.

3,000 रुपयांचे हेडफोन पण फ्री

Vivo आपले फोन स्वस्तात विकत पण आहे आणि एक्सचेंज अंतर्गत अतिरिक्त डिस्काउंट पण देत आहे. पण सोबतच वीवो एक्सचेंज ऑफर अंतर्गत ब्लूटूथ हेडफोन पण फ्री मध्ये देत आहे. म्हणजे जुन्या फोनच्या बदल्यात नवीन फोन विकत घेतल्यास Vivo कडून फ्री हेडफोन पण मिळत आहेत. Vivo V17 Pro तसेच Vivo V15 Pro एक्सचेंज ऑफर मध्ये विकत घेतल्यास कंपनी कडून से 2999 रुपयांचे ब्लूटूथ हेडफोन फ्री मिळतील आणि सोबत 1000 रुपयांचा डिस्काउंट पण मिळेल.

हे देखील वाचा: 4920एमएएच बॅटरी आणि 8जीबी रॅम सह लिस्ट झाला Vivo Z5i, ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह होईल लॉन्च

तसेच Vivo V15 आणि Vivo S1 च्या खरेदीवर कंपनी 1,999 रुपयांचे हेडफोन आणि 700 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत Vivo Y17, Vivo Y15 आणि Vivo Y12 स्मार्टफोन विकत घेतल्यास 500 रुपयांच्या डिस्काउंट सोबत 999 रुपयांचे हेडफोन पण मिळतील. विशेष म्हणजे आईसीआईसीआई तथा एचडीएफसी बॅंकेच्या ग्राहकांना फोनच्या खरेदीवर डिस्काउंट पण मिळेल. Vivo चा हा सेल 30 नोव्हेंबर पर्यंत चालू राहील.

The post VIVO ने भारतात पूर्ण केले 5 वर्ष, सेलिब्रेशन साठी देत आहे स्मार्टफोन्स वर भरभक्कम डिस्काउंट आणि 2999 रुपयांचे हेडफोन फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-celebrates-5-years-in-india-sale-discount-free-offer-v17-v15-pro-s1-y17-y15-y12-price/feed/ 0
ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5,000एमएएच बॅटरी सह Vivo Y15 लॉन्च, किंमत 13,990 रुपये https://www.91mobiles.com/marathi/vivo-y15-launch-in-india-with-triple-rear-camera-and-notch-display-price-rs-13990/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y15-launch-in-india-with-triple-rear-camera-and-notch-display-price-rs-13990/#respond Tue, 28 May 2019 09:33:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4421 कंपनीने 13,990 रुपयांमध्ये हा डिवाइस सादर केला आहे.

The post ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5,000एमएएच बॅटरी सह Vivo Y15 लॉन्च, किंमत 13,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने आपल्या Y सीरीज मध्ये एक नवीन फोन सादर केला आहे, ज्याला Y15 नाव देण्यात आले आहे. 91मोबाईल्स ने अलीकडेच Vivo Y15 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन बद्दल एक्सक्लूसिव माहिती दिली होती. या माहिती नंतर काही दिवसांनी कंपनीने आता ऑफिशियली डिवाइस भारतीय मार्केट मध्ये लॉन्च केला आहे.

किंमत
किंमत आणि स्पेसिफिकेशन सह Vivo Y15 कंपनीच्या ई-स्टोर वर लिस्ट आहे. तसेच कंपनीने प्रेस रीलीज पाठवून फोनच्या लॉन्चची माहिती दिली आहे. पण फोन ई-स्टोर वर सध्या सोल्ड आउट दाखवला जात आहे. किंमतीबद्दल बोलायचे तर कंपनीने 13,990 रुपयांमध्ये हा डिवाइस सादर केला आहे.

डिजाइन
Vivo Y15 ची डिजाइन पाहता हा स्मार्टफोन ट्रेंड मधील वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वरच ही लॉन्च केला गेला आहे. डिस्प्लेवर ‘वी’ शेप नॉच आहे आणि या नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा आहे. Vivo Y15 Vivo Y15 चे तिन्ही कडा बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. Vivo हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo Y15 चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y15 कंपनीने 19.3:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे. सोबत फोन मध्ये स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89 टक्के आहे. तसेच फोन 720 X 1544 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.35-इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो.

कंपनीने Vivo Y15 को एंडरॉयड 9.0 आधारित फनटच ओएस 9 वर सादर केला आहे. तसेच ऑक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो. Vivo चा हा फोन 4जीबी रॅम मेमरी आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो.

तसेच Vivo Y15 डुअल सिम तसेच 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Vivo Y15 मध्ये 5,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

The post ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5,000एमएएच बॅटरी सह Vivo Y15 लॉन्च, किंमत 13,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y15-launch-in-india-with-triple-rear-camera-and-notch-display-price-rs-13990/feed/ 0
एक्सक्लूसिव : लॉन्चच्या आधीच बघा Vivo Y15 चे फुल स्पेसिफिकेशन्स आणि किंमत https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-y15-full-specifications-price-features-details-before-india-launch/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-y15-full-specifications-price-features-details-before-india-launch/#respond Fri, 24 May 2019 11:42:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4386 हा आगामी स्मार्टफोन 15,000 रुपयांपर्यंतच्या बजेट लॉन्च करेल

The post एक्सक्लूसिव : लॉन्चच्या आधीच बघा Vivo Y15 चे फुल स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने Vivo Y सीरीज मध्ये लॉन्च होणाऱ्या आगामी स्मार्टफोन Vivo Y15 बद्दल आधीपण एक्सक्लूसिव माहिती दिली आहे. आम्हीच सर्वात आधी सांगितले होते कि वीवो भारतात आपली वी सीरीज वाढवत दोन नवीन स्मार्टफोन Vivo Y15 आणि Vivo Y12 लॉन्च करेल. आमच्या रिपोर्ट मध्ये आम्ही या दोन्ही स्मार्टफोन्सच्या फीचर्स आणि किंमतीची माहिती पण दिली आहे. कंपनीने अजूनही आपल्या आगामी स्मार्टफोनची लॉन्च डेट सांगितलेली नाही, पण फोन बाजारात येण्याआधीच आज आम्ही Vivo Y15 चा फोटो आणि याचे फुल स्पेसिफिकेशन्स घेऊन आलो आहोत.

लुक व डिजाईन
सर्वात आधी Vivo Y15 च्या लुक बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन ट्रेंड मधील वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वरच लॉन्च केला जाईल. डिस्प्लेच्या वर ‘वी’ शेप नॉच दिली जाईल आणि याच नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा असेल. Vivo Y15 चे तिन्ही कडा बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट दिला जाईल. Vivo चा हा आगामी स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

फोनच्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये तीन कॅमेरा सेंसर दिले जातील जे डावीकडे असतील. या कॅमेरा सेटअपच्या खाली एलईडी फ्लॅश पण दिली जाईल. Vivo Y15 च्या बॅक पॅनल वरच फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर असेल. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण फोनच्या उजवीकडील पॅनल वर असतील फोनच्या डाव्या पॅनल वर सिम ट्रे दिली जाईल. तसेच Vivo Y15 च्या खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट आणि स्पीकर असतील.

शानदार कॅमेरा
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y15 ट्रिपर रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. वीवोचा हा फोन इतक्याच अपर्चर असलेल्या 8-मेगापिक्सलच्या सेकेंडरी आणि एफ/2.4 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलच्या दुसऱ्या सेंसरला सपोर्ट करेल. त्याचबरोबर सेल्फी साठी Vivo Y15 मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळेल.

स्पेसिफिकेशन्स
Vivo Y15 कंपनी द्वारा 19.3:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल तसेच फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89 टक्के असेल. हा फोन 720 X 1544 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.35-इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करेल ज्याच्या प्रोटेक्शन साठी ग्लास कोटिंग केली जाईल. कंपनी Vivo Y15 एंडरॉयड 9.0 आधारित फनटच ओएस 9 वर सादर करेल जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालेल. Vivo चा हा आगामी स्मार्टफोन 4जीबी रॅम वर लॉन्च होईल तसेच यात 64जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल.

Vivo Y15 डुअल सिम तसेच 4जी वोएलटीई सपोर्ट सह बाजारात येईल. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करेल. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Vivo Y15 मध्ये 5,000एमएएच ची दमदार बॅटरी दिली जाईल. आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार Vivo Y15 एक्वा ब्लू आणि रेड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल. फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे तर आशा आहे कि वीवो आपला हा आगामी स्मार्टफोन 15,000 रुपयांपर्यंतच्या बजेट लॉन्च करेल. अशा आहे​ कि आगामी आठवड्यातच Vivo Y15 इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये येईल.

The post एक्सक्लूसिव : लॉन्चच्या आधीच बघा Vivo Y15 चे फुल स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-y15-full-specifications-price-features-details-before-india-launch/feed/ 0