Vivo Y17s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 03 Oct 2023 15:29:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 11,499 रुपयांमध्ये लाँच झाला Vivo Y17s, ह्यात आहे 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/vivo-y17s-launched-in-india-with-50mp-rear-camera-5000mah-battery-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y17s-launched-in-india-with-50mp-rear-camera-5000mah-battery-price-specification/#respond Tue, 03 Oct 2023 15:23:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22631 Vivo नं अधिकृतपणे भारतात Vivo Y17s लाँच केला आहे. हा डिवाइस मिड-रेंज कॅटेगरीमध्ये सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे फोनमध्ये वॉटरड्रॉप डिजाइनसह 6.65 इंचाची एलसीडी स्क्रीन मिळते. तसेच, विवो Y17s स्मार्टफोन भारतात ग्रेटर नोयडा मधील प्लांटमध्ये बनला आहे. म्हणजे हा एक स्वदेशी फोन आहे. पुढे आम्ही ह्याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. Vivo Y17s […]

The post 11,499 रुपयांमध्ये लाँच झाला Vivo Y17s, ह्यात आहे 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y17s ची विक्री ऑनलाइन आणि ऑफलाइन केली जाईल.
  • फोन Glitter Purple आणि Forest Green कलरमध्ये आला आहे.
  • ह्या डिवाइसमध्ये Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Vivo नं अधिकृतपणे भारतात Vivo Y17s लाँच केला आहे. हा डिवाइस मिड-रेंज कॅटेगरीमध्ये सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे फोनमध्ये वॉटरड्रॉप डिजाइनसह 6.65 इंचाची एलसीडी स्क्रीन मिळते. तसेच, विवो Y17s स्मार्टफोन भारतात ग्रेटर नोयडा मधील प्लांटमध्ये बनला आहे. म्हणजे हा एक स्वदेशी फोन आहे. पुढे आम्ही ह्याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Vivo Y17s ची किंमत आणि उपलब्धता

  • Vivo Y17s दोन मॉडेलमध्ये सादर करण्यात आला आहे.
  • ह्या हँडसेटच्या 4GB+64GB मॉडेलची किंमत 11,499 रुपये आहे.
  • फोनच्या 4GB+128GB व्हेरिएंटची किंमत 12,499 रुपये आहे.
  • हा डिवाइस ग्लिटर पर्पल आणि फॉरेस्ट ग्रीन ह्या दोन रंग कलर ऑप्शनमध्ये विकला जाईल.
  • फोनची की विक्री ऑफलाइन व ऑनलाइन केली जाईल जी 2 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे.

Vivo Y17s चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: विवोचा नवीन स्मार्टफोन 6.56 इंचाच्या एचडी प्लस स्क्रीनसह येतो. जी 1612 × 720 पिक्सल रेजोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि 269PPI ला सपोर्ट करते.
  • प्रोसेसर: Vivo Y17s फोन 12 नॅनोमीटर प्रोसेसर वर आधारित आहे. ह्यात Mali-G52 MC2 GPU सह मीडियाटेक हीलियो जी85 एसओसी देण्यात आली आहे.
  • स्टोरेज: डिवाइस 4GB रॅमसह 64GB स्टोरेज/128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. डिवाइसमध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील आहे.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता Vivo Y17s मध्ये युजर्सना ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात f/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलची अन्य लेन्स मिळते. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी f/2.0 अपर्चरसह 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी: फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित फन टच ओएस 13 वर चालतो.
  • अन्य: Vivo Y17s मध्ये आयपी 54 रेटिंग, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम 4G, वाय-फाय, ब्लूटूथ सारखे फीचर्स मिळत आहेत.

The post 11,499 रुपयांमध्ये लाँच झाला Vivo Y17s, ह्यात आहे 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y17s-launched-in-india-with-50mp-rear-camera-5000mah-battery-price-specification/feed/ 0