Vivo Y27 4G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 07 Jul 2023 07:15:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo Y27 4G ह्या महिन्याच्या अखेरीस होईल लाँच, असे आहेत लीक स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-4g-india-launch-timeline-specs-design-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-4g-india-launch-timeline-specs-design-exclusive/#respond Fri, 07 Jul 2023 07:15:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22279 विवो लवकरच भारतात Vivo Y27 4G सादर करण्याची तयारी करत आहे. टिपस्टर ईशान अग्रवालनं 91mobiles ला फोनच्या फुल स्पेसिफिकेशन, कलर ऑप्शन आणि रेंडरची माहिती दिली आहे. तर आज आमच्या हाती फोनच्या भारतीय लाँचची टाइमलाइन लागली आहे. पुढे तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. विवो Y27 4G इंडिया लाँच टाइमलाइन ईशाननं दिलेल्या माहितीनुसार, Vivo […]

The post Vivo Y27 4G ह्या महिन्याच्या अखेरीस होईल लाँच, असे आहेत लीक स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन Green, Burgundy आणि Black कलरमध्ये सादर केला जाईल.
  • फोनमध्ये 6.64-इंचाचा मोठा डिस्प्ले मिळू शकतो.
  • डिवाइसमध्ये Helio G85 SoC आणि 50MP चा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो.

विवो लवकरच भारतात Vivo Y27 4G सादर करण्याची तयारी करत आहे. टिपस्टर ईशान अग्रवालनं 91mobiles ला फोनच्या फुल स्पेसिफिकेशन, कलर ऑप्शन आणि रेंडरची माहिती दिली आहे. तर आज आमच्या हाती फोनच्या भारतीय लाँचची टाइमलाइन लागली आहे. पुढे तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली आहे.

विवो Y27 4G इंडिया लाँच टाइमलाइन

ईशाननं दिलेल्या माहितीनुसार, Vivo Y27 4G ह्या महिन्याच्या अखेरीस भारतात लाँच होईल. कंपनी पुढील काही दिवसांत फोन टीज करण्यास सुरुवात करेल. परंतु कंपनीनं याबाबत अद्याप कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही.

विवो Y27 4G डिजाइन आणि कलर ऑप्शन

  • सेल्फी शूटरसाठी फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच असेल. तसेच स्क्रीन पॅनलच्या खाली एक बडी चिन आहे आणि फोन प्लास्टिक बॅकसह येईल.
  • वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन (फिंगरप्रिंट सेन्सरसह) उजवीकडे देण्यात आला आहे.
  • फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेन्सरसाठी दोन मोठे वर्तुळाकार रिंग असतील. रिंग्सच्या बाजूला एक एलईडी फ्लॅश असेल.
  • रेंडरर्समध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, स्पिकर ग्रिल आणि सिम ट्रे सेक्शन दिसले नाहीत, परंतु ते खाली असू शकतात.
  • तसेच Vivo Y27 4G ग्रीन, बरगंडी आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध येऊ शकतो.

विवो Y27 4G स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : फोनमध्ये 600-निट्स लोकल पीक ब्राइटनेससह 6.64-इंचाचा IPS LCD FHD+ डिस्प्ले असेल.
  • प्रोसेसर : विवो Y27 4G मीडियाटेक हेलियो G85 SoC दिली जाईल.
  • रॅम आणि स्टोरेज : फोन सिंगल 6GB + 128GB मॉडेलमध्ये येईल. 6GB एक्सपांडेबल रॅम सपोर्ट असेल.
  • ओएस : अँड्रॉइड 13-आधारित फनटच ओएस 13 कस्टम स्किन आउट ऑफ द बॉक्स चालेल.
  • कॅमेरा : Vivo Y27 4G 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP सेकंडरी सेन्सरसह येईल. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी फ्रंटला 8MP चा शूटर आहे.
  • साइज : आगामी विवो फोनचा आकार 164×76.2×8 मिमी आणि वजन 190 ग्राम असेल.
  • अन्य : विवो फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट आणि IP54 रेटिंग मिळेल.

The post Vivo Y27 4G ह्या महिन्याच्या अखेरीस होईल लाँच, असे आहेत लीक स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-4g-india-launch-timeline-specs-design-exclusive/feed/ 0