Vivo Y27 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 20 Jul 2023 11:01:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 50MP Camera आणि 12GB RAM सह Vivo Y27 ची भारतात एंट्री; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-y27-launched-in-india-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y27-launched-in-india-know-price-and-specifications/#respond Thu, 20 Jul 2023 11:01:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22487 विवोनं आज भारतीय बाजारात आपला नवीन बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. Vivo Y27 स्मार्टफोनची भारतात एंट्री झाली आहे. वाय सीरिजमधील हा नवा मॉडेल फक्त आकर्षक दिसत नाही तर स्पेसिफिकेशन्स देखील दमदार आहेत. फोनमध्ये फिजिकली 6GB RAM आणि MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे, सविस्तर माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. Vivo Y27 ची किंमत विवो […]

The post 50MP Camera आणि 12GB RAM सह Vivo Y27 ची भारतात एंट्री; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन Extended RAM 3.0 सह येतो.
  • ह्यात 44W Fast Charging मिळते.
  • फोन स्क्रीन 2.5D ग्लासनं प्रोटेक्टेड आहे.

विवोनं आज भारतीय बाजारात आपला नवीन बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. Vivo Y27 स्मार्टफोनची भारतात एंट्री झाली आहे. वाय सीरिजमधील हा नवा मॉडेल फक्त आकर्षक दिसत नाही तर स्पेसिफिकेशन्स देखील दमदार आहेत. फोनमध्ये फिजिकली 6GB RAM आणि MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे, सविस्तर माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Vivo Y27 ची किंमत

विवो वाय27 स्मार्टफोन भारतात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. ह्यात 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 14,999 रुपये आहे. हा विवो फोन ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्मवर सेलसाठी उपलब्ध होईल जो Burgundy Black आणि Garden Green कलरमध्ये विकत घेता येईल.

Vivo Y27 स्पेसिफिकेशन्स

  • 6.64″ FHD+ Display
  • 12GB RAM (6GB+6GB)
  • MediaTek Helio G85
  • 50MP Rear Camera
  • 5,000mAh Battery
  • 44W Fast Charging

  • स्क्रीन : विवो वाय27 मध्ये 2388 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.64 इंचाचा फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे ज्यावर 2.5डी ग्लासची लेयर देण्यात आली आहे.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ह्यात एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर : Vivo Y27 अँड्रॉइड 13 आधारित फनटच ओएस 13 वर लाँच झाला आहे जो मीडियाटेक हीलियो जी85 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. हा मोबाइल 6जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह येतो जो फोनच्या इंटरनल 6जीबी रॅमसह मिळून 12जीबी रॅमची पावर देतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी विवो वाय27 स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी कंपनीनं आपला नवीन फोन 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे.

The post 50MP Camera आणि 12GB RAM सह Vivo Y27 ची भारतात एंट्री; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y27-launched-in-india-know-price-and-specifications/feed/ 0