Vivo Y51A - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 12 Jan 2021 12:31:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo Y31 होणार आहे भारतात लॉन्च, 6 जीबी रॅम आणि 48एमपी कॅमेर्‍यासह असेल 5,000एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/vivo-y31-to-launch-in-india-soon-with-6gb-ram-48mp-camera-5000mah-battery-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y31-to-launch-in-india-soon-with-6gb-ram-48mp-camera-5000mah-battery-price-sale/#respond Tue, 12 Jan 2021 12:31:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9628 Vivo Y31 मध्ये पावर बॅकअपसाठी 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी असल्याचे पण सांगण्यात आले आहे.

The post Vivo Y31 होणार आहे भारतात लॉन्च, 6 जीबी रॅम आणि 48एमपी कॅमेर्‍यासह असेल 5,000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo चा एक स्मार्टफोन गेल्या महिन्यात वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्स साइट वर दिसला होता ज्याचे नाव Vivo Y31 असल्याचे सांगण्यात आले होते. वीवो वाय31 थायलंड आणि सिंगापुरच्या सर्टिफिकेशन साइट सोबतच गूगल प्ले कंसोल वर पण लिस्ट करण्यात आला होता जिथे फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली होती. तसेच आता बातमी येत आहे की Vivo Y31 लवकरच भारतात पण लॉन्च होणार आहे. या फोनचे प्रोमोशनल पोस्टर इंटरनेट लीक झाले आहेत ज्यात फोटो व स्पेसिफिकेशन्स सोबतच सेल ऑफर्स पण दिसत आहेत.

Vivo Y31 चे ऑफिशियल पोस्टर्स टेक वेबसाइट एमएसपीने शेयर केले आहेत. या पोस्टर्स मध्ये फोनचा फोटो आणि त्याचे फीचर्स लिहिण्यात आले आहेत तसेच वीवो वाय31 च्या स्पेसिफिकेशन्स सह बॅंक ऑफर, बजाज फिनसर्व ऑफर आणि जियो ऑफरची माहिती लिहिण्यात आली आहे. हे पोस्टर काही दिवसांत मोबाईल दुकानात व रिटेल स्टोर्स वर पण दिसतील. म्हणजे महिन्याच्या शेवटापर्यंत किंवा पुढल्या महिन्याच्या सुरवातीला वीवो वाय31 इंडियन मार्केट मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

असे असतिल स्पेसिफिकेशन

वीवो वाय31 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या पोस्टर वरून समजले आहे की हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च होईल जो 1080 पिक्सल्स असलेल्या फुलएचडी+ रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे. पोस्टर मध्ये फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या साईड पॅनल वर दाखवण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला वाल्यूम रॉकर आहे. या पोस्टर मध्ये फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे सांगण्यात आले आहे.

Vivo Y31 मध्ये पावर बॅकअपसाठी 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी असल्याचे पण सांगण्यात आले आहे. पोस्टर्सनुसार वीवो वाय31 च्या खरेदीवर बजाज फिनर्सव 101 रुपयांचा ईएमआय देईल आणि यूजर्सना रिलायंस जियोचे 7,000 रुपयांचे बेनिफिट पण मिळतील. Vivo Y31 सोबत एचडीएफसी बॅंकेचा नो-कॉस्ट ईएमआय पण मिळेल. आशा आहे की वीवो लवकरच फोन लॉन्चची घोषणा करेल.

Vivo Y51A

भारतात कालच लॉन्च झालेल्या वीवो वाय51ए बद्दल बोलायचे झाले तर हा फोन 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. जो एंडरॉयड 11 आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 662 चिपसेटसह 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर चालतो. डुअल सिम आणि 4जी वोएलटीई सोबत Vivo Y51A मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Vivo Y51A ट्रिपल रियर कॅमेर्‍यासह लॉन्च केला गेला आहे ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. वीवो वाय51एस 17,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Vivo Y31 होणार आहे भारतात लॉन्च, 6 जीबी रॅम आणि 48एमपी कॅमेर्‍यासह असेल 5,000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y31-to-launch-in-india-soon-with-6gb-ram-48mp-camera-5000mah-battery-price-sale/feed/ 0