Vivo Y70s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 29 May 2020 11:45:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4420एमएएच बॅटरी सह Vivo Y70s वेबसाइट वर लिस्ट, लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-y70s-v2002a-listed-on-tenna-4420mah-battery-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y70s-v2002a-listed-on-tenna-4420mah-battery-specs-leaked/#respond Mon, 25 May 2020 11:38:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7140 टेना लिस्टिंग वरून Vivo Y70s चे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

The post 4420एमएएच बॅटरी सह Vivo Y70s वेबसाइट वर लिस्ट, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo कंपनी आपल्या वाय सीरीजच्या नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो बाजारात Vivo Y70s नावाने येईल. अलीकडेच या मोबाईलचा प्रोमोशनल पोस्टर समोर आला होता ज्यात वाय70एस चा फोटो शेयर केला गेला होता. हा फोटो समोर आल्यामुळे फोनच्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली होती, तसेच आता हा फोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर पण लिस्ट झाला आहे. टेना लिस्टिंग वरून Vivo Y70s चे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

Vivo Y70s चे स्पेसिफिकेशन्स पाहता टेना वर हा डिवायस 6.53 डिस्प्ले सह येणार असलचे सांगण्यात आले आहे जो फुल एचडी+ पॅनल सह येईल. सर्टिफिकेशन्स साइटनुसार या फोनचे डायमेंशन 162.07×76.61×8.46एमएम असेल. वीवो वाय70एस एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,420एमएएच ची बॅटरी असल्याचे टेना वर समोर आले आहे.

Vivo Y70s

वीवो वाय70एस चा लीक झालेला पोस्टर पाहता हा फोन पंच-होल डिस्प्ले सह दाखवण्यात आला होता. हा होल स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे देण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो पॅनलच्या डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. फोनच्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला नाही. तसेच पोस्टर मध्ये Vivo Y70s ग्रेडिएंट कलर ऑप्शन-पिंक आणि ब्लू मध्ये दाखवण्यात आला होता.

Vivo Y70s बाबत कंपनीने सांगितले आहे कि डिवाइस Exynos 880 5G चिपसेट सह येईल. SoC बद्दल बोलले जात आहे कि हा Exynos 980 अंडर-क्लॉक वर्जन आहे, जो गेल्या वर्षी डिसेंबर 2019 मध्ये Vivo X30 सीरीज मध्ये दिसला होता. बातमी अशी आहे कि या फोन मध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज दिली जाईल.

तसेच फोनच्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप मध्ये 48-मेगापिक्सलची मेन लेंस दिली जाईल. 3सी सर्टिफिकेशन साइट वर समोर आले होते कि या फोन मध्ये 18W फास्ट चार्जर असेल. कंपनीने अजूनतरी Vivo Y70s च्या लॉन्च डेट बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. पण अशा आहे कि लवकरच ही हा फोन सादर केला जाईल.

The post 4420एमएएच बॅटरी सह Vivo Y70s वेबसाइट वर लिस्ट, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y70s-v2002a-listed-on-tenna-4420mah-battery-specs-leaked/feed/ 0