Vivo Y72 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 23 Mar 2021 12:41:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8GB रॅम, 5000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेर्‍यासह लॉन्च झाला वीवोचा स्वस्त 5G फोन Vivo Y72 https://www.91mobiles.com/marathi/vivo-y72-5g-phone-launched-mediatek-dimensity-700-soc-64mp-cameras-5000mah-battery-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y72-5g-phone-launched-mediatek-dimensity-700-soc-64mp-cameras-5000mah-battery-price-specifications/#respond Tue, 23 Mar 2021 12:41:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10381 Vivo Y72 5G कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर तीन कडा बेजल लेस दाखविण्यात आल्या आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे.

The post 8GB रॅम, 5000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेर्‍यासह लॉन्च झाला वीवोचा स्वस्त 5G फोन Vivo Y72 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने आज इंटरनेशनल मार्केटमध्ये आपला 5जी पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Vivo Y72 5G सादर केला आहे. हा मोबाईल फोन सध्या थाईलँडच्या बाजारात आणला आहे जो 8जीबी रॅम, मीडियाटेक डायमनसिटी 700 चिपसेट, 64एमपी ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5,000एमएएच बॅटरी सारख्या फीचर्ससह येतो. वीवो वाय72 5जी फोनची किंमत THB 9,999 म्हणजे भारतीय करंसीनुसार 23,000 रुपयांच्या आसपास आहे जी येत्या काही दिवसांत थाईलँडच्या बाहेर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन
Vivo Y72 5G कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर तीन कडा बेजल लेस दाखविण्यात आल्या आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वर मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेली नॉच देण्यात आली आहे. तसेच, फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर चौकोनी आकारात आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकरसोबत फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स
Vivo Y72 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर करण्यात आला आहे जो 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ आईपीएस एलसीडी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.6 टक्के आहे. वीवोने आपला फोन एंडरॉयड 11 आधारित फनटच ओएस 11 वर लॉन्च केला आहे जो मीडियाटेक डायमनसिटी 700 चिपसेटवर चालतो. हा फोन 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनच्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी वीवो वाय72 5जी फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनमध्ये डुअल सिम, वोएलटीई आणि 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स आहेत. Vivo Y72 5G फोन साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरसह 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post 8GB रॅम, 5000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेर्‍यासह लॉन्च झाला वीवोचा स्वस्त 5G फोन Vivo Y72 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y72-5g-phone-launched-mediatek-dimensity-700-soc-64mp-cameras-5000mah-battery-price-specifications/feed/ 0