Vivo Y78 Plus 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 24 Apr 2023 06:10:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo Y78+ 5G फोन 50MP कॅमेऱ्यासह लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन https://www.91mobiles.com/marathi/vivo-y78-plus-5g-launched-with-50mp-camera-price-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y78-plus-5g-launched-with-50mp-camera-price-specifications-details/#respond Mon, 24 Apr 2023 06:10:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20409 Vivo Y78+ 5G स्मार्टफोन सर्वप्रथम चीनमध्ये लाँच झाला आहे. कंपनीनं हा स्मार्टफोन कोणताही गाजावाजा न करता बाजारात आणले आहे. या फोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. तर प्रोसेसिंगसाठी यात Snapdragon 695 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे, जोडीला 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. फोनची बॅटरी 4,500mAh ची आहे, जी 44W […]

The post Vivo Y78+ 5G फोन 50MP कॅमेऱ्यासह लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y78+ 5G मध्ये मिळतो 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट
  • हा फोन 50MP ड्युअल कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे
  • प्रोसेसिंगसाठी Snapdragon 695 चिपसेटचा वापर केला आहे.

Vivo Y78+ 5G स्मार्टफोन सर्वप्रथम चीनमध्ये लाँच झाला आहे. कंपनीनं हा स्मार्टफोन कोणताही गाजावाजा न करता बाजारात आणले आहे. या फोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. तर प्रोसेसिंगसाठी यात Snapdragon 695 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे, जोडीला 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. फोनची बॅटरी 4,500mAh ची आहे, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. चला जाणून घेऊया Vivo Y78+ 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन.

विवो वाय 78+ 5जीचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.78 inch Full HD+ OLED
  • 120Hz Refresh rate
  • 1000 nits Peak Brightness

Vivo Y78+ 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा Full HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक OLED पॅनल आहे जो 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1,000 nits आहे.

  • Snapdragon 695 SoC
  • 12GB RAM, 256GB Storage
  • Android 13

तसेच, हा फोन Snapdragon 695 प्रोसेसरसह येतो, जोडीला 12GB LPDDR4x RAM आणि 256GB UFS 2.2 स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन Android 13 OS बेस्ड OriginOS OS 3 UI वर चालतो.

  • 50MP Dual Camera
  • OIS

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर 50MP चा असून ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनला सपोर्ट करतो. जोडीला एक 2MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. रियर कॅमेरा सेटअपमध्ये ड्युअल एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे.

  • 4500mAh Battery
  • 44W Fast Charging

फोनची बॅटरी 4,500mAh ची आहे, जोडीला 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल-सिम, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, 3.5mm आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. फोनचे डायमेंशन 162.24 x 74.79 x 7.89mm आणि 177 ग्राम आहे.

विवो वाय 78+ 5जी ची किंमत

  • 8GB RAM + 128GB = CNY 1,599 (जवळपास 19,029 रूपये)
  • 8GB RAM + 256GB = CNY 1,799 (जवळपास 21,409 रुपये)
  • 12GB RAM + 256GB = CNY 1,999 (जवळपास 23,790 रुपये)

Vivo Y78+ 5G फोन 3 व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. 8GB RAM + 128GB स्टोरेजची किंमत CNY 1,599 (जवळपास 19,029 रूपये) आहे. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज ऑप्शन किंमत CNY 1,799 (जवळपास 21,409 रुपये) आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 1,999 (जवळपास 23,790 रुपये) ठेवण्यात आली आहे. कंपनीनं फोन Moon Shadow Black, Warm Sun Gold आणि Sky Blue कलरमध्ये सादर केला आहे.

The post Vivo Y78+ 5G फोन 50MP कॅमेऱ्यासह लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y78-plus-5g-launched-with-50mp-camera-price-specifications-details/feed/ 0