Vivo Y97 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 12 Sep 2018 08:47:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला वॉटरड्रॉप नॉच असलेला वीवो वाय97 https://www.91mobiles.com/marathi/vivo-y97-official-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y97-official-feature-specifications-price-in-marathi/#respond Wed, 12 Sep 2018 08:47:40 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2057 या फोनची किंमत 1998 युआन ठेवण्यात आली आहे जी भारतीय करंसी नुसार जवळपास 21,100 रुपये आहे.

The post 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला वॉटरड्रॉप नॉच असलेला वीवो वाय97 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो चा वॉटरड्राप डिस्प्ले असलेला स्मार्टफोन वाय97 बद्दल नुकताच एक लीक समोर आला होता. या लीक मध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली होती तसेच सांगण्यात आले होते की कंपनी 20 सप्टेंबरला हा फोन लॉन्च करू शकते. पण आपल्या फॅन्सना सरप्राइज ​देत वीवो ने आपला नवीन स्मार्टफोन वाय97 आॅफिशियल केला आहे. वीवो ने वाय97 स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला आहे.

वीवो वाय97 पण वी11 प्रो प्रमाणे ‘वी’ शेप वाल्या नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या डिस्प्ले ला वीवो ने हेलो नॉच नाव दिले आहे. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 90 टक्क्यांच्या स्क्रीन-टू-बॉडी रेशियोला सपोर्ट करतो. फोन मध्ये 6.3-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2,280 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो. हा फोन फनटच ओएस सोबत एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर करण्यात आला आहे.

कंपनी ने फोन मध्ये 4जीबी रॅम दिला आहे त्या सोबतच हा फोन आॅक्टा-प्रोसेसर आणि मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट वर चालतो. वीवो वाय97 मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन डुअल रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेर्‍याला सपोर्ट करतो.

वीवो वाय97 डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3315एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीन मध्ये हा फोन आॅरोरा ब्लू, स्टारी नाइट ब्लॅक आणि ड्रीम पाउडर कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या फोनची किंमत 1998 युआन ठेवण्यात आली आहे जी भारतीय करंसी नुसार जवळपास 21,100 रुपये आहे.

The post 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला वॉटरड्रॉप नॉच असलेला वीवो वाय97 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y97-official-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0