Vivo Z5i - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 08 Nov 2019 12:59:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4920एमएएच बॅटरी आणि 8जीबी रॅम सह लिस्ट झाला Vivo Z5i, ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-z5i-specifications-leaked-8gb-ram-4920mah-battery-triple-rear-camera/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-z5i-specifications-leaked-8gb-ram-4920mah-battery-triple-rear-camera/#respond Fri, 08 Nov 2019 12:58:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5733 समोर आलेल्या माहितीनुसार Vivo Z5i वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल ज्यात ‘यू’ शेप नॉच देण्यात येईल.

The post 4920एमएएच बॅटरी आणि 8जीबी रॅम सह लिस्ट झाला Vivo Z5i, ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने यावर्षी भारतीय बाजारात आपला पहिला पंच होल डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोनच्या रूपात Vivo Z1 Pro स्मार्टफोन लॉन्च केला होता. भारतात कंपनीच्या ‘झेड सीरीज’ मध्ये सध्या Vivo Z1 Pro आणि Vivo Z1X स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत. पण लवकरच Vivo या सीरीज मध्ये अजून एक नवीन डिवाईस अनु शकते. वीवो यू सीरीजचा एक नवीन स्मार्टफोन Vivo Z5i नावाने समोर आला आहे. Vivo Z5i चीनी वेबसाइट वर लिस्ट केला गेला आहे जो ईशारा करतो कि वीवो लवकरच Vivo Z5i नावाचा नवीन डिवाईस अंर्तराष्ट्रीय बाजारात येऊ शकतो.

Vivo Z5i चीनी टेलीकॉम साइट वर दिसला आहे. या वेबसाइट वर Vivo Z5i V1941A मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. एमएसपी ने आपल्या रिपोर्ट मध्ये Vivo Z5i चे लिस्टिंग डिटेल्स शेयर केले आहेत. या लिस्टिंग मध्ये फोनच्या डिजाईन सोबत फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण मिळाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार Vivo Z5i वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल ज्यात ‘यू’ शेप नॉच देण्यात येईल.

लिस्टिंग मध्ये समजले आहे कि Vivo Z5i ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाऊ शकतो तर फोनचा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये दिला जाईल. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. Vivo Z5i च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे ज्याच्या एका बाजूला स्पीकर तर दुसऱ्या बाजूला 3.5एमएम जॅक आहे. फोनच्या उजवीकडे पावर व वाल्यूम बटण तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट देण्यात आला आहे.

Vivo Z5i

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता Vivo Z5i 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशनच्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. लिस्टिंग मध्ये फोनचे डायमेंशन 162.15×76.47×8.89एमएम आणि वजन 193 ग्राम सांगण्यात आले आहे. लिस्टिंग मध्ये Vivo Z5i च्या स्क्रीन प्रोटेक्शनची माहिती समोर आली नाही पण इथे फोनच्या कलर वेरिएंटची माहिती आहे. लिस्टिंग नुसार Vivo Z5i Agate Black, Spar Blue, Jade Green कलर मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

Vivo Z5i च्या लिस्टिंग मध्ये फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह दाखवण्यात आला आहे. फोन मध्ये माइक्रोएसडी कार्डचा वापर करता येईल कीनाही हे स्पष्ट झाले नाही. आशा आहे कि बाजारात Vivo Z5i चे एकापेक्षा जास्त वेरिएंट येतील. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लिस्टिंग नुसार Vivo Z5i मध्ये 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल ज्यासोबत 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर असेल.

तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Vivo Z5i मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे समोर आले आहे. Vivo Z5i च्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलॉक फीचर सह येईल. लिस्टिंग नुसार Vivo Z5i मध्ये पावर बॅकअप साठी 4920एमएएच ची मोठी बॅटरी दिली जाईल. Vivo Z5i च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च डेट साठी कंपनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post 4920एमएएच बॅटरी आणि 8जीबी रॅम सह लिस्ट झाला Vivo Z5i, ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-z5i-specifications-leaked-8gb-ram-4920mah-battery-triple-rear-camera/feed/ 0